Health benefits of salt in Ayurveda and its role in cancer recovery: माणसाच्या आणि प्राणीमात्रांच्या आयुष्यात पाण्याइतकेच मीठही महत्त्वाचे आहे. अनेकदा डॉक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात, पण आयुर्वेदानुसार मिठाचे योग्य प्रमाण शरीरासाठी संजीवनी ठरू शकते. अनेकांना प्रत्येक पदार्थावर मीठ पेरून खाण्याची सवय असते. मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि अधिकचे खाल्ले तर अडचण. तर मग काय करावे?

मीठ : खावे की न खावे?

मीठमिरची, मीठभाकरी, मिठाला जागणे, नावडतीचे मीठ अळणी इत्यादी प्रकारे मीठ शब्द रोजच्या जीवनात आहाराव्यतिरिक्त सारखा वापरात येत असतो. मिठावाचून कोणाचेच चालत नाही इतके महत्त्व मिठाला आहे. मसाल्याच्या पदार्थात मीठ हे पाहिजेच. मीठ नाही म्हणजे सर्व बेचव. हिंदी भाषेत मिठाला ‘सबरस’ किंवा सर्व रसांचा राजा म्हणतात. आयुर्वेदात लवण वर्गाचे वर्णन करताना शरीरात द्रव वाढवणारे, खोलवर स्रोेतसांत पोचणारे, मलप्रवृत्ती साफ करणारे, मृद्गुणयुक्त व वातनाशक असे सांगितले आहे.

हेही वाचा

मिठाचे सात प्रकार

लवण अन्न लवकर पचविते. तसेच मिठाच्या वापराने जखम लवकर पिकते. रुची उत्पन्न करते. आपल्या तीक्ष्ण-उष्ण गुणांमुळे शरीरात पित्त वाढवते, रक्त वाढवते तसेच ओलावा निर्माण करून कफ वाढवते. आपण रोजच्या वापरात जे मीठ वापरतो त्याशिवाय आयुर्वेदात आणखी सात प्रकार सांगितले आहेत. यातील सैंधव-खाणीतील मीठ, पादेलोण- जमिनीतील विशेष गंध असणारे मीठ, सरोवरातील सांबरलवण, खाजण वगैरे ठिकाणच्या कचरा व खराब जागेतील बीडलवण यांचे वेगवेगळे गुण आहेत.

Award Banner
Benefits of salt in cancer treatment English | Ayurvedic types of salt for health | कॅन्सर उपचारात मिठाचे महत्त्व | आयुर्वेदानुसार मिठाचे आरोग्यदायी फायदे
आरोग्यासाठी गुणकारी मीठ आणि त्याचे औषधी उपयोग. (Photo- ChatGpt AI)

मिठाचे प्रमाण योग्य असेल तर…

शरीरात मिठाचे योग्य प्रमाण असेल तर शरीरात ताकद राहते. त्याअभावी अशक्तपणा येतो. त्यामुळे जुलाब, कॉलरा, हगवण या विकारांत शरीरातील जलद्रव्याबरोबर मीठ खूप प्रमाणात बाहेर गेले असेल तर मीठ, साखर, पाणी घेऊन रसक्षय थांबवावा लागतो. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील आवश्यक क्षार निघून जाणेच होय. मीठ दातांकरिता व हाडांकरिता आवश्यक आहे. शरीरातील मीठ कमी प्रमाणात गेले तर दात लवकर किडतात. हाडे ठिसूळ होतात.

मिठाचे काम काय?

मिठामुळे रूक्ष शरीराला ओलावा मिळतो. मिठाची शरीराला आवश्यकता केव्हा हे पाहण्याकरिता पावसाळ्यात एखाद्याा मातीच्या मडक्यात मीठ धरून ठेवल्यावर त्याला पाणी कसे सुटते व मडक्याच्या बाहेर मिठाचा पांढरट थर कसा बसतो हे बघावयास हवे. त्याप्रमाणे मिठाची जडणघडण कोणत्या पंचमहाभूतांपासून बनली आहे त्याचाही विचार करावयास हवा. कारण शरीरातील जिभेच्या शेंड्यावर मिठाचा प्रवेश झाल्याबरोबर, कणभर मिठाचीही शरीरात पाण्याचा स्राव निर्माण करण्याचे, शरीरातील सूक्ष्मातील सूक्ष्म स्रोेतसांत पोचण्याचे, त्याबरोबर कफपित्त यांचे प्रमाण वाढवणे, वाताचे अनुमोलन करणे, रुची आणणे, भूक उत्पन्न करणे, पूर्वी खाल्लेले पचवणे, शरीरात उष्णता व ऊब निर्माण करणे, रक्तवर्धक इत्यादी चांगली कामे सुरू होतात. त्याचबरोबर फाजील धातूंपासून रक्षण करणे, मलप्रवृत्ती साफ करणे, घामाचे प्रमाण वाढवणे, फाजील कफाला शरीरातून बाहेर पडायला मदत करणे इत्यादी कार्येही होतात.

अग्निमांद्यावर मीठ गुणकारी

रोगांचा विचार करताना ज्या विकारात मीठ हे अत्यावश्यक आहे. एवढेच नव्हे तर केवळ मीठ हा प्रमुख घटक रोगनिवारणाचे काम करतो. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अग्निमांद्य या विकारात कणभर मीठ तात्काळ, तात्पुरती का होईना भूक उत्पन्न करते. त्याच्या जोडीला अनुपान म्हणून आले, लिंबू, आवळा, चिंच, तूप, दही, ताक, ओवा, बाळंतशोपा, मुळा, कोकम काहीही वापरा.

खोकल्यावर मिठाचा उतारा

अजीर्ण विकारातही याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांच्या अजीर्णाकरिता योग्य ते अनुपान घेऊन मीठ वापरावे. कफ घट्ट झाला असेल, कोरडा खोकला हैराण करीत असेल तर कणभर मीठ कफ मोकळा करते. कान कोरडे पडले असतील, कानातून आवाज येत असतील व कान कधीच वाहत नसतील तर थोडेसे मीठ उत्तम काम करते.

कॅन्सरच्या उपचारांमध्ये मिठाचे महत्त्व

नको त्या ठिकाणी लव येत असली, सर्वांगावर केस वाढत असले तर आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. उपयोग होतो. नाना तऱ्हेच्या कॅन्सर विकारात जेव्हा बल कमी पडते, अ‍ॅण्टिबायोटिक औषधांनी शरीर क्षीण होते, त्यावेळेस शरीररक्षणार्थ मीठ आवश्यकच आहे. खूप थंड प्रदेशात शरीर गार पडते, अन्नाचा पुरवठा पुरेशी ऊब देत नाही त्यावेळी थोडे-अधिक प्रमाणातील मीठ शरीरातील शीतप्रतिकारशक्ती वाढवते.

मीठ-पाणी केव्हा उपयुक्त?

पोटात वायुगोळा त्रास देत असेल तर चिमूटभर मीठ वायू मोकळा करून आराम देते. शरीरातून आवश्यक तेवढा घाम बाहेर पडत नसेल तर मीठ-पाणी घ्यावे. घाम येतो. शरीर हलके, मोकळे वाटते. जुलाबाने क्षीणता येत असली तर कोणत्या तरी स्वरूपात मीठ खावे म्हणजे शरीरात पृथ्वी व आपतत्त्वाची भरपाई होते. कृमी, जंत, चिकट मलप्रवृत्ती, पोटात वायू धरणे या तक्रारीत मीठ, मिरपूड, ताक, लसूण इत्यादी पदार्थांबरोबर रोगपरत्वे वापरले की मलभेदन, मळाचा अवरोध दूर करण्याचे काम होते.