scorecardresearch

सतीश कौशिक ठरले अनपेक्षित हृदयविकाराचे बळी! कार्डियक अरेस्टची ‘ही’ लक्षणे सर्वात आधी दिसतात

Heart Attack Signs: हृदयविकाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या काय आहेत हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं

Satish Kaushik dies of heart attack Early signs of heart attack you should not ignore as per age group Know From health Expert
कार्डियक अरेस्टची 'ही' लक्षणे ओळखा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Satish Kaushik Death Cardiac Arrest Signs: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश चंद्र कौशिक यांचा आज (9 मार्च) वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.अलिकडेच ते दिल्लीत होळीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून सोशल मीडियावरही दुःख व्यक्त केले जात आहे. हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमावलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत आता सतीश चंद्र कौशिक यांचंही नाव येणार आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होतेय. त्यामुळे तुम्हीही हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

भारतात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ

अभिनेते सतीश कौशिक यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या अचानक निधनानाने पुन्हा एकदा आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव यांच्यापासून गायक केके पर्यंत गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक मृत्यू झाले. अलीकडेच अभिनेत्री सुष्मिता सेनलाही हृदयविकाराचा झटका आला होता.

भारतात हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये ६० टक्के प्रकरणं ही भारतात आहे. याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. ही लक्षणे कोणती चला जाणून घेऊया ..

हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं (Heart Attack Early Signs)

छातीत दुखणे
धाप लागणे आणि अस्वस्थ वाटणे
जबड्यात वेदना
मान आणि खांद्यामध्ये वेदना होणे
थकवा येणे
सतत मळमळ होणे

वर नमूद केलेली लक्षणे तुम्हाला आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटा आणि खूप उशीर होण्यापूर्वी समस्या सोडवा!

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 08:30 IST