Breakfast for Diabetics: मधुमेहींसाठी रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी सकाळचा नाश्ता करणं खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन गुंतागुंतीचे होते आणि दीर्घकालीन गुंतागूंत होण्याचा धोका वाढतो.

आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा सांगतात की, सकाळी ऑफिसला जाण्याची गडबड आणि डाएट करण्याचा ट्रेंड असूनही नाश्त्याचे महत्त्व समजून घेणे सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Find out if you should have curd on an empty stomach Benefits when had on an empty stomach
रोज सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्यानं आरोग्यावर काय परिणाम होतात? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच

रक्तातील साखर नियंत्रण व्यत्यय

नाश्ता वगळल्याने दिवसानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. कारण शरीर रात्रभर दीर्घकाळ उपवास करते. जेव्हा सकाळचा नाश्ता चुकतो तेव्हा त्यानंतरचे जेवण अधिक मजबूत ग्लुकोज प्रतिसादास उत्तेजन देऊ शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. कालांतराने हा पॅटर्न ग्लायसेमिक परिवर्तनशीलता वाढवतो.

इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढणे

इन्सुलिन प्रतिरोध टाइप २ मधुमेहाचे वैशिष्ट्य आहे. मल्होत्रा म्हणाले की, न्याहारी वगळल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते, ज्यामुळे ग्लुकोजचे नियमन आणखी आव्हानात्मक होते. ही स्थिती कायम राहिल्यास मधुमेहाच्या प्रगतीला गती देऊ शकते आणि हृदयरोगासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

दीर्घकालीन आरोग्य जोखीम

मल्होत्रा यांच्या मते, नियमितपणे नाश्ता न केल्याने त्याचे व्यापक परिणाम होतात. दीर्घकाळ उच्च रक्तातील साखरेची पातळी धोका वाढवते. तसेच प्री-डायबेटिक व्यक्तींसाठी नाश्ता वगळल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका जलद गतीने वाढू शकतो.

पोषण आणि चयापचय असंतुलन

नाश्ता फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारख्या पोषक तत्वांचा वापर करण्याची एक महत्त्वाची संधी प्रदान करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते, असे मल्होत्रा यांनी सांगितले. नाश्ता वगळण्यामुळे दुपारचे जेवण जास्त प्रमाणात खाल्ले जाते, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

मानसिक प्रभाव

मल्होत्रा यांच्या मते, नाश्ता न केल्याने शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडू शकतो.

भूक वाढते : जास्त खाणे किंवा चिप्स, शेव, बिस्कीट असे स्नॅक्स खाणे.

चिडचिड होणे : नाश्ता न केल्याने तुमची चिडचिड होऊ शकते.

कामाकडे दुर्लक्ष : नाश्ता न केल्यास सातत्यपूर्ण ऊर्जा पुरवठ्याच्या अभावामुळे कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते.

मधुमेहींसाठी हेल्दी ब्रेकफास्ट टिप्स

मल्होत्रा यांनी सांगितले की, रक्तातील साखरेचे नियंत्रण अनुकूल करण्यासाठी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संतुलित नाश्त्याला प्राधान्य दिले पाहिजे.

  • कमी ग्लायसेमिक इंडेक्स : यामध्ये धान्य, ओट्स यांचा समावेश असतो; यामुळे आरोग्याला अधिक ऊर्जा मिळते.
  • रक्तातील साखर स्थिर करण्यासाठी अंडी, ग्रीक दही किंवा टोफू यांचे सेवन करू शकता.
  • सतत ऊर्जा प्रदान करण्यासाठी एवोकॅडो, नट किंवा बिया यांचा समावेश करू शकता.
  • तसेच प्रक्रिया केलेले किंवा साखरयुक्त पदार्थ टाळा, ज्यामुळे जलद ग्लुकोज वाढू शकते आणि चयापचयात व्यत्यय येऊ शकतो.

Story img Loader