भारतातील कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाच्या दुसर्‍या लाटेच्या भीषण आठवणी अजूनही ताज्या आहे. त्या काळात डोलो ६५० या पॅरासिटामॉल औषधाची विक्री प्रचंड वाढली. डोलो ६५० ब्रँड हा महामारीच्या काळात तापासाठी जणू समानार्थी शब्दच झाला होता. डोलो-650 टॅब्लेट 15मध्ये पॅरासिटामॉल वेदनाशामक आणि अँटीपायरेटिक समाविष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे औषध ताप कमी करण्यासाठी आणि सौम्य ते मध्यम वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. तसेच, डोकेदुखी, मायग्रेन, दातदुखी, मासिक पाळीचे दुखणे, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे औषध संपूर्ण भारतात घराघरात पोहोचले आहे. आता प्रश्न असा पडतो की, प्रत्येक वेळी वेदना आणि तापासाठी हे औषध सेवन करता येईल का? तर डॉक्टर याबाबत सहमत नाही.

प्रत्येक त्रासासाठी डोलो ६५० घेणे योग्य आहे का?

“डोलो ६५० हे आश्चर्यकारक औषध नाही. हे मूलभूत स्थिती बरे करत नाही, फक्त लक्षणात्मक आराम देते. योग्य प्रिस्क्रिप्शनशिवाय फिल्टर न केलेले आणि तपासणी न करता वापरल्यास दीर्घकाळ सहनशीलता कमी होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये यकृत/मूत्रपिंड निकामी होणे अशी गुंतागुंत होऊ शकते,” असे कूपर हॉस्पिटल आणि एचबीटीचे न्यूरोसर्जन सल्लागार, डॉ.सिद्धार्थ गौतम यांनी फायन्सशिअल एक्सप्रेसला सांगितले.

‘डोलो किंवा क्रोसिन किंवा कॅल्पोल हे त्रासासाठी घेतले जाणारे सर्वात सामान्य औषध आहे’

मुंबईतील भाटिया हॉस्पिटलचे इंटर्निस्ट सल्लागार, डॉ सम्राट शाह यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले की, पॅरासिटामोल म्हणजे एसीटामिनोफेन नावाचे औषध, जे डोलो किंवा क्रोसिन किंवा कॅल्पोल या ब्रॅड नावाने विकले जाते, जे लक्षण आणि परिणामाचा विचार न करता त्रासावर घेतले जाणारे सर्वात सामान्य औषध आहे.

स्वत:हून औषध घेण्यामागे, पालकांचा सल्ला (जरी ते उच्च शिक्षित असले तरी), डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळेचा अभाव, किंमतीने स्वस्त, रोगाबद्दल जागरूकता नसणे, जुन्या प्रिस्क्रिप्शनचा पुनर्वापर, त्वरित आराम देते आणि सहज उपलब्ध होणे अशी सर्वात सामान्य कारणे आहेत,” असे डॉ. शाह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Health Tips: चांगली झोप येण्यासाठी मुठभर पिस्ता खाणे फायदेशीर? आयुर्वेद काय सांगते, जाणून घ्या

पॅरासिटामॉलचे दुष्परिणाम

काही सामान्य दुष्परिणामांमध्ये हे समाविष्ट आहे:

मळमळ
उलट्या
अतिसार
बद्धकोष्ठता
अपचन
कधीकधी अति संवेदनशीलता
यकृताचे अधूनमधून नुकसान होऊन यकृतातील एंजाइम वाढतात
कधी थ्रोम्बोसाइटोपेनिया
न्यूट्रोपेनिया

पॅरासिटामॉलचा सर्वात गंभीर प्रतिकूल परिणाम म्हणजे हेपॅटोटॉक्सिसिटी आणि त्यानंतर इतर सामान्य दुष्परिणाम जसे:
जठरावक सूज येणे
अर्टिकेरिया
अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया
पँसिटोपेनिया

हेही वाचा : भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ व पद्धत

G6 PD च्या कमतरतेच्या रुग्णांनी, मद्यपी आणि तीव्र कुपोषणा असल्यास हे औषध सावधगिरीने वापरावे.

खार येथील पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी, इंटर्नल मेडिसिन, सल्लागार, डॉ. अनिल बल्लानी यांच्या मते, डोलो दर ४ तासांपेक्षा जास्त वेळा पुनरावृत्ती करु नये आणि ते ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस घेऊ नये

“पॅरासिटामॉलचा जास्त प्रमाणातील डोस, (१२ ग्रॅमपेक्षा जास्त) घेणे यकृत पेशींच्या नेक्रोसिससाठी कारणीभूत ठरते. कधीकधी डोलो घेतल्याने स्थिती बिघडू शकते उदा. जर अतिसार असताना डोलो घेतला असेल तर स्थिती बिघडू शकते. तसेच, डोलो हे अँटी-हिस्टामिनिकशिवाय सामान्य सर्दीमध्ये नुसती घेतल्यास फारसा आराम मिळत नाही. त्यामुळे, वैद्यकीय देखरेखीखाली डोलो वापरणे नेहमीच शहाणपणाचे असते,” असे डॉ. बल्लानी यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should dolo 650 be consumed for everything here is what doctors say snk
First published on: 25-03-2023 at 11:51 IST