scorecardresearch

Premium

सफरचंद सोलून खावे की न सोलता? तुम्ही रोज सफरचंद खायला हवे का? डॉक्टरांनी सांगितला आरोग्याचा मंत्रा

Perfect Way To Ear Apples: फळांच्या सालीची चव काहींना आवडत नाही तर काहींना आवडते पण आवडीपेक्षा त्याचे फायदे व तोटे काय आहेत याची माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे.

Should you Eat Apple Daily is Peeled Apple Good Or Unpeeled Doctor Suggest Perfect Way for Health What Is Better For Body
सफरचंद खाण्याची योग्य पद्धत, ज्याने मिळतील खूप फायदे.. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Peeled vs Unpeeled apple: सफरचंद खा आणि डॉक्टरकडे जाण्याच्या फेऱ्या वाचवा असं एक प्रसिद्ध वाक्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का आहारशास्त्रानुसार तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती व कसं खाता याला खूप जास्त महत्त्व आहे. आज आपण सफरचंदाच्या बाबत हा ‘किती व कसा’ नियम लागू होतो का हे पाहणार आहोत. डॉ. निरुपमा राव, पोषणतज्ञ, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सफरचंद सोलून खावे की न सोलता याविषयी मार्गदर्शन केले आहे. अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने फळं खाण्याची सवय असते. फळांच्या सालीची चव काहींना आवडत नाही तर काहींना आवडते पण आवडीपेक्षा त्याचे फायदे व तोटे काय आहेत याची माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे.

डॉ. निरुपमा सांगतात की, सफरचंदातील व्हिटॅमिन सी हे अधिक प्रमाणात सालीच्या खाली आढळते. म्हणून, फळाची साल काढून टाकल्याने पोषक मूल्यांचे नुकसान होऊ शकते. सालीमध्ये इतर अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी व आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.

Consuming dark tea manage blood sugar levels and reduce the risk of developing diabetes Benefits of Black Tea Without Milk
कोरा चहा नेहमी प्यायल्याने डायबिटीक रुग्णांना मिळतात ‘हे’ मोठे फायदे; अभ्यासातून समोर आली माहिती
Blood Cancer Awareness Month 2023 Early signs and symptoms you must watch out for Lukemia Limphoma Look Out For Change
Blood Cancer: रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे व चिन्हे ओळखा; ‘या’ लोकांना असतो सर्वाधिक धोका
Parenting Tips on How To Make Children Emotionally Strong and mentally strong
पालकांनो, मुलांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवायचे असेल तर ‘या’ गोष्टीं ठेवा लक्षात
How_squats_can_help_you_strengthen_legs
स्क्वॅट्समुळे तुमचे पाय कसे होतील मजबूत? कसे करावे स्क्वॅट्स? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

डॉ उषाकिरण सिसोदिया, नोंदणीकृत आहारतज्ञ आणि क्लिनिकल पोषणतज्ज्ञ, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, एक बाब लक्षात घ्यायला हवी, अनेकदा विक्रेते सफरचंद चमकदार दिसावे म्हणून सालीवर मेण वापरतात. शिवाय शेतकरी सुद्धा काहीवेळा कीटकनाशक वापरतात. यामुळे फळ खाण्याआधी स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. निरुपमा राव यांच्या माहितीनुसार, न सोलता सफरचंद खाल्ल्यास हे आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत ठरते. फायबर आणि अनेक पोषक द्रव्ये त्वचेमध्ये किंवा अगदी खाली असतात. तर डॉ राव यांच्या मते, ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी सोलून फळाचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे जर तुमचे पोट सालीचे पचन करू शकत असेल तर तुम्ही सालीसहित फळाचे सेवन करू शकता. शेवटी न सोलता किंवा सोळूनही सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत फक्त तुम्ही किती प्रमाणात सेवन करता हे लक्षात घ्यायला हवे.

हे ही वाचा<< Blood Cancer: रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे व चिन्हे ओळखा; ‘या’ लोकांना असतो सर्वाधिक धोका

दिवसाला किती सफरचंद खावे? (How Many Apples To Eat in a Day)

दिवसाला एक मध्यम आकाराचे सफरचंद खाणे हा सल्ला दिला जातो. डॉ. सिसोदिया सांगतात की, “निरोगी असताना तुमच्या रोजच्या आहारात १-२ मध्यम आकाराच्या सफरचंदांचा समावेश करणे उत्तम. फक्त एका फळावर अवलंबून न राहता अनेक फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Should you eat apple daily is peeled apple good or unpeeled doctor suggest perfect way for health what is better for body svs

First published on: 20-09-2023 at 12:15 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×