Side Effect of Raisins Can Work Like Poison in Body Should we Soak Black Raisins Before Eating How it Affects Blood | Loksatta

‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?

Side Effect of Raisins: मनुक्यांचे सेवन अनेकांच्या शरीराला अपायकारक ठरण्याचे कारण काय व नक्की कोणी, कसे व किती प्रमाणात मनुके खायला हवेत हे आज आपण जाणून घेणार आहोत…

‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?
'या' तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके? (फोटो: Pixabay)

Side Effect of Raisins: काळे व तपकिरी मनुके हे सुपरफूड म्हणून ओळखले जातात. अगदी मासिक पाळीच्या समस्यांपासून ते केसाच्या त्वचेच्या काळजी घेण्यापर्यंत सर्वच बाबतीत मनुक्यांचे फायदे सर्वमान्य आहेत. वैद्यकीय तज्ञांनुसार अॅनेमिया व उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांवर सुद्धा मनुक्यांचे सेवन रामबाण ठरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की प्रमाणापेक्षा अधिक मनुक्यांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते, मनुक्यांचे सेवन अनेकांच्या शरीराला अपायकारक ठरण्याचे कारण काय व नक्की कोणी, कसे व किती प्रमाणात मनुके खायला हवेत हे आज आपण जाणून घेणार आहोत…

जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असेल तर अशा रुग्णांनी मनुक्याचे सेवन करणे टाळावे. मनुक्यांमध्ये उच्च ग्लाइसेमिक घटक असतात, यामुळेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर आपण मनुक्यांपासून अंतर राखणेच हिताचे ठरेल. एम्स रुग्णालयाचे माजी सल्लागार व हार्ट केअर संस्थापक डॉ. बिमल छाजेर यांच्या माहितीनुसार १०० ग्रॅम मनुक्यांमध्ये तब्बल ३०० कॅलरीज असतात. शिवाय मनुके खाल्ल्यावर पॉट भरल्यासारखे वाटत नाही उलट किंचित खाऊन भूक वाढू शकते परिणामी जर तुम्हाला काही किलो वजन कमी करायचे असेल तर तुम्ही मनुक्याचे सेवन करणे टाळायला हवे.

जर तुम्हाला मळमळ किंवा यापोटी बिघडल्याचे समस्यां जाणवत असेल तर मनुके खाणे टाळावे. lybrate.com वर प्रकाशित एका अहवालानुसार काही व्यक्तींना मनुके खाल्ल्याने शरीरावर लाल चट्टे उमटणे व पुरळ येण्याची समस्या जाणवते.

मनुक्यांना का म्हंटले जाते सुपरफूड?

मनुक्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन व मिनरल्स असतात, जर आपण १०० ग्रॅम मनुक्यांचे प्रमाण घेतले तर यात तब्बल ३०० कॅलरीज,७४९ पोटॅशियम, ७९ ग्रॅम कार्बोहायड्रेट व ३.१ ग्रॅम प्रोटीन असते. मनुक्यांमध्ये ३ टक्के व्हिटॅमिन सी, १० टक्के लोह, ८ टक्के मॅग्नेशियम व १० टक्के व्हिटॅमिन बी सुद्धा आढळून येते.

हे ही वाचा<< मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

एका दिवसात किती मनुके खाणे ठरेल योग्य?

डॉ बिमल छाजेर यांच्या माहितीनुसार, वरील आजारांचा व त्रासांचा अपवाद वगळता एका स्वस्थ व्यक्तीने, एका दिवसात ४ ते ६ मनुके खाणे हे आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. शक्यतो मनुके खाण्याआधी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावे व थोडे हलके फुगल्यावर त्यांचे सेवन करावे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:47 IST
Next Story
मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला