वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात 'या' भाज्या; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश | Spinach Cabbage Cucumber Pumpkin These Vegetables can be helpful for weight loss know its health benefits | Loksatta

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ‘या’ भाज्या; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर ठरतात जाणून घ्या

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ‘या’ भाज्या; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करावा जाणून घ्या (फोटो: Freepik)

वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यासाठी काही भाज्यादेखील फायदेशीर ठरतात. रोजच्या जेवणात कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते जाणून घ्या.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या भाज्या

आणखी वाचा: उलट चालण्याचे फायदे माहित आहेत का? कंबरदुखी, गुडघेदुखीवर ठरते सोपा उपाय; लगेच जाणून घ्या कारण

काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. काकडीमुळे पोट लगेच भरल्यासारखे वाटते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

दुधी भोपळा
दुधी भोपळ्यामध्ये ९० टक्के पाणी असते. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. ज्यामुळे मेटाबॉलिजम बुस्ट होते, पचनक्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

पालक
पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. तसेच पालक आयरनचे ही उत्तम स्रोत मानले जाते. यासह पालकमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

आणखी वाचा: नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

कोबी
कोबीमध्ये असणारे फायबर शरीरात असणारी चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जेवणात कोबीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही कच्चा कोबी किंवा भाजी अशाप्रकारे आहारात समावेश करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 20:58 IST
Next Story
युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा