Stomach Cancer Early Symptoms: ओटीपोटात दुखणे, अपचन किंवा जडपणा बऱ्याचदा साधारण वाटत असतील तरी जेव्हा या समस्या वरच्या वर उद्भवतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञ आणि ऑन्कोलॉजिस्टच्या मते, पोटाच्या कॅन्सरच्या सुरूवातीला खूप साधी वाटणारी लक्षणं दिसतात. जी अनेकदा जठरासंबंधी आहेत असं म्हणून टाळली जातात. मात्र यावर यशस्वी उपचारासाठी ही लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विनय गायकवाड यांच्या मते, पोटाशी संबंधित काही समस्यांकडे वेळेत लक्ष देणे आवश्यक आहे. जर एखादी समस्या वारंवार येत असेल, वजन कमी होत असेल किंवा त्यासोबत वजन कमी होत असेल, भूक न लागणे आणि सतत अशक्तपणा येत असेल तर शरीरात दिसणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. पोटाचा कॅन्सर म्हणजे काय आणि त्याच्या शरीरातील सुरूवातीची लक्षणे कोणती आहेत, ती वेळेवर खूप महत्त्वाचे आहे.

पोटाचा कॅन्सर म्हणजे काय?

पोटाचा कॅन्सरला वैद्यकीय भाषेत गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणतात. पोटाच्या या कॅन्सरमध्ये पोटाच्या अस्तरातील पेशी असाधारणपणे वाढू लागतात आणि ट्यूमरचे रूप घेतात. हा कॅन्सर हळूहळू विकसित होतो. म्हणूनच सुरूवातीच्या अवस्थेत तो ओळखणे कठीण आहे. या कॅन्सरच्या प्रमुख जोखमीच्या घटकांमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्गाचा समावेश आहे. हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. त्यामुळे पोटाच्या आतील अस्तरांमध्ये संक्रमण होऊ शकते. जर हा संसर्ग बराच काळ अस्तित्वात असेल तर पोटात तीव्र जठराची सूज उद्भवू शकते. यामुळे पोटातील पेशींमध्ये बदल होऊ शकतात आणि कालांतराने पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

पोटाच्या कॅन्सरची लक्षणे

वारंवार अपचन, आंबटपणा

वारंवार अपचन, छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा खाल्ल्यानंतर खूप पोट भरणे बे अनेकदा पचनाशी संबंधित असू शकते. मात्र या समस्या वारंवार होत असतील आणि नेहमीच्या उपायांनी बरं वाटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाच्या कॅन्सरमध्येही अशी लक्षणे दिसू शकतात.

थोडे खाल्ल्यानंतर पोट भरणे

जर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटू लागले किंवा पूर्वीपेक्षा कमी अन्न खाल्ल्यानंतर खाण्याची इच्छा कमी झाली तर त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. पोटाच्या कॅन्सरमध्ये दिसणाऱ्या संभाव्य लक्षणांपैकी एक ही समस्या असू शकते.

सतत मळमळ किंवा उलट्या

अधूनमधून मळमळ किंवा उलट्या होणे सामान्य असू शकते. मात्र जर ही समस्या वारंवार होत असेल आणि तेदेखील खाल्ल्यानंतर तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

विनाकारण वजन कमी होणे

जर आहार किंवा व्यायामामध्ये कोणताही बदल न करता वजन वेगाने कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाच्या कॅन्सरसह इतर अनेक आजारांमध्ये कणत्याही स्पष्ट कारणांशिवाय वजन कमी होणे हेसुद्धा एक कारण आहे.

सतत थकवा किंवा रक्तस्त्राव होण्याची चिन्हे

सतत थकवा, अशक्तपणा किंवा शरीरात ऊर्जेचा अभाव जाणवण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही प्रकरणांमध्ये पोटातून रक्तस्त्राव होण्यामुळे शरीरात रक्त कमी होऊ शकते, त्यामुळे थकवा जाणवतो. उलटीमध्ये रक्त येणे किंवा मलाचा रंग नेहमीपेक्षा गडद होणे ही गंभीर लक्षणं असू शकतात.

कॅन्सरचा धोका कसा कमी करावा?

पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्गाची वेळेवर तपासणी आणि उपचार करणे महत्त्वपूर्ण ठरू शकते. या दीर्घकाळ टिकणाऱ्या संसर्गामुळे पोटातील पेशींमध्ये जळजळ आणि बदल होऊ शकतात. जर संसर्ग ओळखला गेला आणि योग्य वेळेवर योग्यरित्या उपचार केला गेला तर कोलन कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.