Summer baby care: उन्हाच्या तीव्रतेवरुन उन्हाळा सुरु झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत जाते. यंदाच्या वर्षी वातावरण तुलनेने अधिक गरम होणार असल्याचे म्हटले जात आहे. दिवसात घराबाहेर फिरताना शरीरावर प्रखर सूर्यप्रकाश पडून त्रास होऊ नये म्हणून बहुतांश लोक Summer Skincare फॉलो करतात. उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त लहान मुलांच्या शरीरावर होत असतो. या काळात लहान बाळांना त्वचेशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशात डिहायड्रेशन, हीटस्ट्रोक यांमुळे ते आजारी पडू शकतात. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची काळजी घेण्यासाठी Baby care tips ची मदत घेता येते. चल तर मग या सोप्या पण महत्त्वपूर्ण टिप्सविषयी जाणून घेऊयात..

दूध हा सर्वोत्तम आहार

उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असणे सामान्य असते. पण हे प्रमाण खूप कमी असल्यास आजारी पडण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना पाण्यासह आईचे दूध नियमितपणे पाजावे. असे केल्याने शरीरामध्ये पाणी टिकून राहील आणि दूधातील पौष्टिक घटकांचा त्यांना फायदा होईल. ६ महिन्यांपर्यंतच्या बाळांना आईचे दूध पाजणे आवश्यक असते. यामुळे आईदेखील हायड्रेटेड राहते असे म्हटले जाते.

Video 5 Minutes Jugaad to Clean Water Tanki At Home Remove All Dirt Stickiness
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
healthy food to babies
सहा ते बारा महिनांच्या बाळाला आहार देताना ‘अशी’ घ्या काळजी…
उन्हाळा आणि लघवीचा त्रास!

घराबाहेर घेऊन जाणे टाळावेत.

सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीमध्ये उन्हाचा अधिक प्रभाव असतो. या चार तासांमध्ये लहान मुलांना उन्हात घेऊन जाणे टाळावे. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा उष्णतेच्या प्रभावामुळे ते आजारी पडू शकतात. जर खूप महत्त्वाच्या कामासाठी त्यांना बाहेर घेऊन जायचे असेल, तर त्यांचे संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्यावी. सध्या बाजारामध्ये लहान मुलांसाठीचे सनस्क्रीन लोशन उपलब्ध असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर करु शकता.

आणखी वाचा – त्वचेसाठी सनस्क्रीन वापरणे का आहे गरजेचे? जाणून घ्या कारण

कमी कपडे घालावेत.

काही पालक त्यांना बाळाला खूप कपडे घालत असतात. बाळांची त्वचा नाजूक असते. कडक उन्हाळ्यात जास्त प्रमाणात कमी घातल्यावर त्यांना त्रास होऊ शकतो. अशा वेळी मऊ, सुती कपड्याचा वापर करणे फायदेशीर ठरते. सुती कपड्यांपासून तयार केलेले अंथरुण वापरणेही योग्य मानले जाते.

आणखी वाचा – पुरुषांनो तुम्हीसुद्धा टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग ही सवय आजच बंद करा, अन्यथा…

लहान बाळांच्या शरीरामध्ये घामाच्या ग्रंथी पूर्णपणे विकसित नसतात. त्यामुळे त्यांना गरम होत आहे की नाही हे ओळखणे कठीण असते. अशा वेळी ते चिडचिड करत असेल किंवा त्वचा काहीशी कोरडी झाली असेल तर, त्यांना उकडत आहे असे समजून जावे. दूध न पिणे किंवा लघवी न करणे यावरुनही त्यांच्यावर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम झाला आहे असे कळते. अशा वेळी त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.