मागील काही वर्षांपासून तरुण महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. बदलती जीवनशैली चुकीचा आहार, व्यसनाधिनता असे अनेक घटक याला जबाबदार आहेत. शिवाय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला नुकताच हृदयविकाराचा झटका आल्याने पुन्हा या समस्येबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मागील एका अभ्यासानुसार, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुप्पट असते. तर शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक तरुणींना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणात पूर्वीच्या तुलनेत जास्त वाढ झाली आहे.

महिलांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकाराच्या घटनांबाबत बोलताना, डॉ. वनिता अरोरा, वरिष्ठ सल्लागार, कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, बदलत्या जीवनशैलीच्या विविध सवयींमुळे तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येणे सामान्य होत आहे. शहरांमधील तरुण महिला मोठ्या प्रमाणात धूम्रपान करतात. वेगवेगळ्या कंपन्यामध्ये कामाच्या ठिकाणी असणाऱ्या तणावाच्या वातावरणामुळे त्याचे धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

हेही वाचा- लठ्ठपणामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते? जाणून घ्या काय सांंगतात तज्ञ…

सुष्मिता सेनच्या केसबद्दल बोलताना डॉ अरोरा म्हणाल्या की, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे आणि लक्षणे वेगळी असतात, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे स्त्रियांमध्ये कधीच वैशिष्ट्यपूर्ण नसतात, त्यांना डाव्या बाजूने छातीत दुखत नाही. उलट, त्यांना एपिगॅस्ट्रिक वेदना, खांद्यामध्ये वेदना, जबडा आणि हाताच्या दोन्ही बाजूंना वेदना आणि घाम आणि अस्वस्थता अशी लक्षने दिसून येतात. स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असताना, पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुप्पट असते असं म्हटलं जातं पण त्यात तत्थ नाही. कारण अलिकडच्या काही उदाहरणांवरुन स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही हृदयविकाराचा धोका तितकाच असल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा- पुरुष नपुंसक होण्याचं प्रमाण का वाढतंय? लठ्ठपणा तर कारणीभूत नाही…

स्त्रियांना हृदयविकाराच्या झटक्यापासून ऑस्ट्रोजेन (स्त्री संप्रेरक) द्वारे संरक्षित केलं जायचं. परंतु स्त्रियांच्या जीवनशैलीतील झालेला बदल, तणाव, काम आणि कौटुंबिक संतुलन, जंक फूडच्या सवयी, बैठे जीवन, धूम्रपानआणि गर्भधारणा प्रतिबंधक गोळ्यांमुळे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. हृदयविकाराचा धोका होऊ नये यासाठी ज्या महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत आहेत त्यांनी धूम्रपान करणं टाळावे. आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी विश्रांतीसाठी थोडा वेळ काढायला हवा, ज्याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतोच आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारत असंही अरोरा यांनी सांगितलं.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, हृदयविकारांबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)