Bread Omelette Recipe : सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील महत्त्वाचा आहारा असतो. काही मिनिटांत तयार होणारा, पोटभरीचा आणि चवीला उत्तम लागणारा पर्याय म्हणजे ब्रेड ऑम्ले. हा अनेकांच्या सकाळच्या नाश्चासाठीचे ‘कन्फर्ट फूड’ बनला आहे. भाजलेल्या ब्रेडची कुरकरीत चव आणि मऊऑम्लेटचा यांची जोडी अगदी अत्त्यंत संतुलित मानली जाते. पण हा सोपा पदार्थ जर रोजचा नाश्ता झाला, तर शरीरावर त्याचे नेमके परिणाम कसे होतात?

न्यूट्रसी लाइफस्टाइलच्या संस्थापक आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. रोहिणी पाटील दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात सांगतात, “दररोज ब्रेड-ऑम्लेट नाश्त्याला घेणे पूर्णपणे सामान्य आणि आरोग्यदायी असू शकते, फक्त त्यातील साहित्य आणि त्याचे प्रमाण योग्य असले पाहिजे.”

तुमच्या ब्रेडवरच ठरते पोषणमूल्य (Your bread makes all the difference)

अंडी हा पोषणाचा उत्तम स्रोत मानला जातो. उच्च प्रतीचे प्रोटीन, व्हिटॅमिन बी, कोलीन आणि अमिनो अॅसिडस्—हे सर्व घटक स्नायूंच्या वाढीस, चयपचयाला आणि मेंदूच्या कार्यक्षमतेला मदत करतात. मात्र ब्रेड-ऑम्लेट किती पौष्टिक ठरेल हे मोठ्या प्रमाणावर तुमच्या ब्रेडच्या प्रकारावर आणि स्वयंपाकाच्या पद्धतीवर अवलंबून असते.

Award Banner

पांढरा ब्रेड – अतिशय रिफाइन्ड, फायबर कमी, पटकन पचणारा. त्यामुळे रक्तातील साखर झटपट वाढते आणि पुन्हा लवकर भूक लागते.
ब्राउन ब्रेड – अनेकदा हा फक्त रंगासाठी कॅरेमल घातलेला पांढरा ब्रेड असतो. जर या ब्रेडच्या लेबलवर ‘होल व्हीट’ (संपूर्ण गव्हापासून बनवलेला) पहिला घटक म्हणून नमूद नसेल तर तो फायदेशीर नाही.
होल व्हीट ब्रेड – फायबर आणि सूक्ष्मपोषकांनी समृद्ध असलेला हा ब्रेड पचनक्रिया मंदावते, पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत होते.
मल्टिग्रेन ब्रेड – या ब्रेडचा फायदा तेव्हा तो विविध प्रकारच्या ‘होल ग्रेन’ (संपूर्ण धान्यापासून बनवला) असेल तेव्हाच त्याचा फायदा मिळतो. अनेक ब्रँडमध्ये फक्त वरून विविध धान्याच्या बिया शिंपडलेल्या असतात, पण आतमध्ये रिफाइन्ड मैदा वापरलेला असतो.ृ

डॉ. पाटील सांगतात की, अत्याधिक तेल, लोणी किंवा पांढरा ब्रेड यांचे प्रमाण टाळणे महत्त्वाचे आहे. ही संयुगे केवळ कॅलरी वाढवत नाहीत, तर रक्तातील साखरेलाही अनियमित करतात.

त्या सांगतात, “एकासारखेपणा टाळण्यासाठी अधूनमधून साहित्य बदलणे, भाज्या वाढवणे आणि संपूर्ण धान्याचे ब्रेड वापरणे हे अधिक पौष्टिक पर्याय आहेत.” घरात बनवलेले ऑम्लेट हे सर्वोत्तम, कारण रस्त्यावरचे किंवा कँटीनमधले ऑम्लेट प्रामुख्याने परत वापरलेल्या तेलात, भरपूर लोणी-मार्जरीन आणि कमी प्रतीच्या ब्रेडसह तयार केले जाते. त्यामुळे ट्रान्स फॅट आणि कॅलरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

वजन वाढू शकते का? (Can it lead to weight gain?)

डॉ. पाटील स्पष्ट करतात की,”अंडी वजन-व्यवस्थापनासाठी अनुकूल आहेत. प्रोटीनमुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, रक्तातील साखर स्थिर राहते आणि मधल्या वेळचे खाणे कमी होते.

एका व्यक्तीसाठी दिवसाला एक अंडे सुरक्षित मानले जाते. वजन वाढते की नाही हे मात्र ब्रेड आणि तेलाच्या प्रमाणावर ठरते.

पांढरा ब्रेड + जास्त तेल = जास्त कॅलरी मिळतात ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
होल ग्रेन ब्रेड + नियंत्रित तेल = चांगली तृप्ती मिळते, स्थिर इन्सुलिन प्रतिसाद, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते

त्यांच्या मते, योग्य प्रमाण, नियंत्रित तेल आणि थोडेसे फायबर (भाज्या किंवा फळांचा समावेश) असेल, तर ब्रेड-ऑम्लेट वजन नियंत्रणात ठेवण्यातही मदत करू शकते.

ब्रेड-ऑम्लेट हा नाश्त्याचा पोषणयुक्त आणि सोपा पर्याय असू शकतो. पण त्याची गुणवत्ता प्रामुख्याने ब्रेडच्या प्रकारावर, तेलाच्या प्रमाणावर आणि साहित्याच्या संतुलनावर अवलंबून असते. रोज खाल्ल्यासही तो घातक नाही, उलट योग्य पर्याय निवडल्यास शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळू शकतात.

होल व्हीट ब्रेड, कमी तेल, भरपूर भाज्या आणि घरगुती ऑम्लेट — हा कॉम्बो रोजच्या नाश्त्यासाठी सुरक्षित, संतुलित आणि आरोग्यदायी ठरतो.