Disadvantages of Drinking Tea Or Coffee On An Empty Stomach : सकाळची सुरुवात जर चुकीच्या पेयाने केली तर संपूर्ण दिवस पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड होतो. आपण नेहमी निरोगी रागण्यासाठी रिकाम्यापोटी ज्यूस पितो किंवा झोप घालवण्यासाठी चहा कॉफी पितो पण त्याच्या पोटाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याच कधी विचार केलाय का??गॅस्ट्रोएटेरोलॉजिस्टच्या मते, ज्यांना पूर्वीपासून आजार आहेत, त्यांनी रिकाम्या पोटी चहा, कॉफी आणि फळांचा रस प्यायल्या पोटाच्या आतील आवरणाला गंभीर इजा होऊ शकते.
पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी अलीकडेच एका व्हिडिओमध्ये सल्ला दिला आहे की, अननस, सफरचंद यांसारखी लिंबूवर्गीय फळे, ग्रीन टी, चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ आणि फळांचा रस यांसारख्या सवयीने दिवसाची सुरुवात करत असाल तर ही सवय वेळीच बदला. कारण या पेयांमुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते, गॅस आणि आम्लपित्त होऊ शकते. आता प्रश्न असा येतो की, पोषणतज्ज्ञ किरण यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे. याबाबत ठाणे येथील आयएमएस हॉस्पिटल्सचे वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी आणि एंडोस्कोपी सल्लागार डॉ. सुजित नायर के यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.
डॉ. सुजित नायर के यांच्या मते, काही विशिष्ट पेयांचे सेवन पचनासाठी हानिकारक असते ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, हा विषय अनेकदा अतिरंजित करून सांगितला जातो. डॉ. नायर नमूद करतात की, “बहुतेक निरोगी लोकांसाठी सफरचंद, लिंबूवर्गीय फळे, अननस यांचा रस, चहा, कॉफी किंवा फळांचा रस पिणे मुळातच हानिकारक नसते.
रिकाम्या पोटी चहा, कॉफी आणि लिंबूवर्गीय फळांचा रस पिणे हानिकारक आहे की फायदेशीर, हे तज्ञांकडून जाणून घेऊया. या पेयाचा परिणाम व्यक्तीच्या पचनक्षमतेवर आणि वैद्यकीय इतिहासावर अवलंबून असतो.
लिंबूवर्गीय फळे आणि अननसाचे पचनावरील परिणाम (Effects of citrus fruits and pineapple on digestion)
तज्ञांच्या मते, काही पदार्थ संवेदनशील लोकांना अस्वस्थता निर्माण करू शकतात, परंतु सकाळी रिकाम्यापोटी सेवन करणे हे सर्व लोकांसाठी हानिकारक असतात याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. संत्री, उन्हाळी फळे, लिंबू आणि अननस यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिक आम्ल (ॲसिड) असते. ज्यांना ॲसिड रिफ्लक्स, गॅस्ट्रायटीस किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी या फळांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू शकते. ज्यांना पचनाशी संबंधित कोणतीही समस्या नाही, त्यांच्यासाठी सकाळी अननस आणि लिंबूवर्गीय फळांचा रस पिणे प्रभावी ठरले आहे. ज्यांना पूर्वीपासून कोणताही आजार नाही, त्यांच्यासाठी ही फळे जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत.
रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे काय परिणाम होतात?(What are the effects of eating apples on an empty stomach?)
डॉ. नायर यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे अत्यंत फायदेशीर आहे. सफरचंदात फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात, जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे, रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने सहसा कोणतेही नुकसान होत नाही; त्यामुळे गॅस किंवा आम्लपित्त होत नाही.
रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिण्याचे परिणाम (Effects of drinking tea and coffee on an empty stomach)
अनेकदा लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे पोटातील आम्लाचे उत्पादन वाढू शकते. ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे, त्यांना चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर पोटात आम्लपित्त, पोट फुगणे, मळमळ किंवा अस्वस्थता यांसारख्या समस्या जाणवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांच्या शरीराला कॅफीन सहज सहन होते, त्यांना कोणताही त्रास होत नाही.
मसालेदार पदार्थ आणि फळांच्यारसाच्या सेवनाचा पोटाच्या खालच्या भागावर होणारा परिणाम (Effects of spicy foods and fruit juices on the lower abdomen)
सकाळी मसालेदार भाजी, भुजिया, पुरी आणि इतर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने संवेदनशील व्यक्तींच्या पोटात जळजळ होऊ शकते. यामुळे गॅस्ट्रायटीस, ॲसिड रिफ्लक्स आणि पोटदुखीची समस्या वाढू शकते. फळांचा रस आरोग्यदायी मानला जात असला तरी, त्यात संपूर्ण फळांपेक्षा खूपच कमी फायबर असते. रस प्यायल्याने पोटाच्या खालच्या भागात रक्तातील साखर वेगाने वाढू शकते आणि पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटत नाही.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय खावे?(What should you eat first thing in the morning when you wake up?)
डॉ. नायर यांच्या मते, जर तुम्हाला तुमची पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर सकाळच्या नाश्त्यामध्ये पुरेसे पाणी, प्रथिने (प्रोटीन), तंतूमय पदार्थ (फायबर) आणि आरोग्यदायी चरबी (हेल्दी फॅट्स) यांचा समावेश असावा. तज्ज्ञांच्या मते, नाश्त्यासाठी तुम्ही ताजी फळे, भिजवलेले बदाम, सुकामेवा, दही, मोड आलेली कडधान्ये, अंडी, भाज्यांचे पदार्थ, मूग डाळीचा धिरडे, पोहे इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ तुमचे शरीर निरोगी ठेवतात, तुमची ऊर्जा वाढवतात आणि पचनसंस्थाही सुदृढ ठेवतात.
कोणी अधिक काळजी घ्यावी? (Who should be more careful?)
ज्या लोकांना ॲसिड रिफ्लक्स, गॅस्ट्रायटीस, पेप्टिक अल्सर, इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) आणि मधुमेह यांसारख्या पचनाच्या समस्यांचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांनी सकाळी जास्त आम्लयुक्त पदार्थ, अतिरिक्त कॅफीन आणि साखरयुक्त पेये यांचे सेवन टाळावे. पोटावर चहा, कॉफी, फळे किंवा रस पिणे प्रत्येकासाठी हानिकारक नसते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या पचनक्षमतेवर आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतो.
