Urine Odor Problem: लघवीला अधूनमधून दुर्गंधी येण्याची समस्या सामान्य आहे, परंतु ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास त्रास होऊ शकतो. महिलांचे मूत्रमार्ग पुरुषांच्या तुलनेत लहान असते, त्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे लघवीच्या नळीमध्ये प्रवेश करतात आणि अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. कधीकधी येणारा लघवीचा वास ही चिंतेची बाब नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लघवीला वास येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की चहा-कॉफीचे अतिसेवन, कमी पाणी पिणे, डिहायड्रेशनमुळेही लघवीला वास येतो. साहस होमिओपॅथिकचे डॉ.नवीन चंद्र पांडे यांच्या मते, जेव्हा शरीरातील ऍसिड शरीरातून बाहेर पडू शकत नाही तेव्हाच लघवीला जास्त वास येतो. मधुमेह यांसारख्या काही आजारांमध्ये आणि औषधांच्या अतिसेवनामुळेही लघवीला वास येतो.

काहीवेळा महिलांच्या लघवीमध्ये अमोनियाचा वास येणे सामान्य असते, परंतु जेव्हा अशी स्थिती अनेक दिवस सतत राहते, तेव्हा अनेक रोगांची लक्षणे दिसू शकतात. लघवीला वास येण्याची कोणती कारणे असू शकतात ते जाणून घेऊया.

यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन: (urinary tract infection)

आचार्य बालकृष्ण यांच्या मते, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा यूटीआयची समस्या असल्यास महिला आणि पुरुषांच्या लघवीला दुर्गंधी येते. यूटीआयची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येते. या आजाराने महिलांना जास्त त्रास होतो. बहुतेक UTI संसर्ग ई-कोलाय बॅक्टेरियामुळे होतात.

या आजारात मूत्रमार्गात सूज येते, त्यामुळे लघवी करताना वेदना होतात आणि लघवीला वास येतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असणे, स्टोनमुळे, गर्भनिरोधकांचा जास्त वापर आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्याने यूटीआयची समस्या उद्भवू शकते.

( हे ही वाचा: पाणी प्यायल्याने High Blood Pressure झपाट्याने नियंत्रणात येईल? सेवनाची पद्धत एकदा जाणून घ्या)

यीस्टच्या संसर्गामुळे लघवीतून दुर्गंधी येऊ शकते (due to yeast infection Odor can come from urine)

यीस्ट संसर्गामुळे लघवीला दुर्गंधी येऊ शकते. यीस्टचा संसर्ग योनीतून जाड, पांढरा, चिकट स्त्राव झाल्यामुळे होतो. बहुतेक यीस्ट संसर्गामुळे योनीमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला खाज सुटणे, जळजळ होणे आणि लालसरपणा येतो आणि दुर्गंधीयुक्त लघवी होते. जेव्हा या बुरशीचे प्रमाण वाढू लागते तेव्हा लघवीच्या वासासोबत सूज येणे, पांढरा स्त्राव यांसारख्या समस्याही सतावू लागतात. यीस्ट संसर्गावर त्वरित उपचार करणे महत्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The smell of womans urine can be a sign of these two disease know from doctor gps
First published on: 07-02-2023 at 19:49 IST