These food habits may harm your kidneys know how to protect kidney gps 97 | Loksatta

दोन प्रकारचे पदार्थ किडनीवर विषाप्रमाणे परिणाम करतात, किडनी निरोगी कशी ठेवावी जाणून घ्या…

kidney cure: तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर आहारात जंकफूड टाळा.

दोन प्रकारचे पदार्थ किडनीवर विषाप्रमाणे परिणाम करतात, किडनी निरोगी कशी ठेवावी जाणून घ्या…
फोटो: संग्रहित

किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. किडनी शरीरातील मीठ, खनिजे आणि पाणी संतुलित करण्यास मदत करते. किडनी शरीरातील टॉक्सिन तर काढून टाकतेच शिवाय ब्लड प्रेशरही सामान्य ठेवते. किडनीशिवाय शरीरातील नसा, पेशी आणि स्नायू नीट काम करत नाहीत. खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार आणि उत्तम जीवनशैली आवश्यक आहे. जंक फूड, तेलकट, मसालेदार आणि जास्त मिठाचा आहार यांसारख्या आहारातील काही पदार्थ किडनीला हानी पोहोचवतात. आहारात काही पदार्थ घेतल्यास किडनीला हानी पोहोचते. योगगुरू बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया की काही पदार्थ किडनीच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकतात आणि त्यापासून बचाव करून किडनीला निरोगी कसे बनवता येईल.

कोणते पदार्थ किडनीचे शत्रू आहेत?

मीठ किडनीचा शत्रू आहे

आहारात मिठाचे जास्त सेवन केल्याने किडनीला हानी पोहोचते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेवणात मिठाचे जास्त सेवन केल्याने किडनीच्या आजाराचा धोका वाढतो. मीठामध्ये सोडियम असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील सोडियमची पातळी खराब होते. सोडियमचे जास्त सेवन केल्याने किडनीचे कार्य बिघडते, त्यामुळे किडनीला जास्त काम करावे लागते. किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास कमी सक्षम असते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. आहारात सोडियम कमी प्रमाणात घेतल्यास किडनी निरोगी ठेवता येते. डब्ल्यूएचओच्या मते, दिवसभरात एक चमचे मीठ घेणे पुरेसे आहे.

( हे ही वाचा: केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश)

साखरेचे जास्त सेवन किडनीसाठी विष आहे

साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज किडनीचे बारीक फिल्टर खराब करते, ज्यामुळे किडनी निकामी होते. डब्ल्यूएचओच्या मते, एका दिवसात फक्त ६ ते १० चमचे साखर खाणे आवश्यक आहे. बेकरी उत्पादने जास्त सेवन केल्याने किडनीचे आरोग्य बिघडते. साखरेऐवजी सुकी द्राक्षे, खजूर, गूळ, अंजीर खा.

किडनी निरोगी कशी करावी

वजन नियंत्रित करा

किडनी निरोगी ठेवायची असेल तर वजनावर नियंत्रण ठेवा. वाढत्या वजनामुळे रक्तदाब, साखर आणि थायरॉईड सारखे अनेक जुनाट आजार होतात. या आजारांमुळे किडनीवरही परिणाम होतो. किडनी निरोगी ठेवायची असेल तर वजनावर नियंत्रण ठेवा. वजन कमी करण्यासाठी कपालभाती, पवनमुक्तासन आणि अर्धहलासन करा, वजन झपाट्याने कमी होईल.

धूम्रपानाची सवय सोडा

किडनी निरोगी ठेवायची असेल तर धूम्रपानाची सवय सोडा. धूम्रपानाच्या सवयीमुळे किडनीवर दबाव येतो. धूम्रपानामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो.

( हे ही वाचा: युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा)

ही योगासने करा

बाबा रामदेव यांनी किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही योगासन सांगितले आहेत, जसे की गोमुखासन, मंडुकासन, शष्कासन, किडनी निरोगी राहील. या योगासनांमुळे तणाव आणि चिंता दूर होतात.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:13 IST
Next Story
केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश