Fatty Liver Tips: लिव्हर हा आपल्या शरीराचा एक असा भाग आहे, त्याच्याशी संबंधित काही समस्या असल्यास त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, अन्यथा तो तुमचा जीवही घेऊ शकतो. म्हणूनच लिव्हरच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देतात. सध्या वाईट जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना वजन वाढण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

फॅटी लिव्हरमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात. काही लोकांना जेवल्यानंतर लगेच शौचाला होतं. जर तुमच्या शरीरात यकृताच्या समस्या वाढत असतील तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जे तुम्हाला लिव्हरच्या समस्येने त्रस्त असल्यास तात्पुरता आराम देऊ शकतात..

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

तुमच्या खाण्याच्या सवयी बदला

ज्या लोकांना कधीही खाण्यापिण्याची सवय असते, त्यांना फॅटी लिव्हरची समस्या असते. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर खाण्याचा सराव केला पाहिजे. दिवसातून एकावेळी जास्त वेळा खाण्याऐवजी, दिवसातून चार ते पाच वेळा थोडं थोडं जेवायची सवय लावा. त्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे मिळू शकतात.

हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय

जर तुम्हाला हिरव्या भाज्या खाण्याची सवय असेल तर शरीराच्या इतर समस्यांसोबतच तुमच्या लिव्हरच्या समस्येवरही मात करता येते. हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक घटक असतात. जर तुम्ही तुमच्या आहारात कोबी, पालक या भाज्यांचा समावेश केलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणूनच दिवसातून एकदा तरी या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. या भाज्यांसोबतच तुमच्या आहारात गाजर आणि टोमॅटोचा समावेश करा.

( हे ही वाचा: रात्री ‘या’ गोष्टी खाल्ल्यास युरिक ॲसिड झपाट्याने वाढू शकते; संधिवात होण्यापूर्वी ‘या’ गोष्टींपासून दूरच राहा)

लसूण खा

जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण वापरत असाल तर शरीरात एन्झाइम नावाचा द्रव सक्रिय होतो. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण वापरत असाल तर ते तुमच्या लिव्हरसाठी फायदेशीर आहे.

भरपूर पाणी प्या

शरीरातील कोणत्याही समस्येवर पाणी हा रामबाण उपाय असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. जर कोणाला लिव्हरचा त्रास असेल तर अशा रुग्णांनी अधिकाधिक पाणी प्यावे आणि एखाद्याला फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर अशा रुग्णांनी दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

फॅटी लिव्हर असल्यास या गोष्टींपासून लांब राहा

  • डाळी आणि शेंगा खाणे बंद करा, विशेषतः काळे हरभरे, उडीद, राजमा आणि चणे.
  • तुम्ही दही, सर्व प्रकारचे व्हिनेगर, ताक आणि अल्कोहोल यांचे सेवन देखील बंद केले पाहिजे.
  • आंबट फळे दुधासोबत खाऊ नयेत. तसेच दुधासोबत मीठ किंवा खारट पदार्थ खाणे टाळावे.
  • फळे आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज आणि दही यांच्यासोबत बीन्स खाऊ नये. मासे, मांस आणि अंडी सोबत शेंगा खाणे टाळा.
  • गोमांस, डुकराचे मांस, मटण, मासे, हिरवे वाटाणे, कोबी, मशरूम यांसारख्या प्युरीनयुक्त अन्नाचे सेवन टाळावे.
  • गोड गोष्टी टाळा.