scorecardresearch

नखांमध्ये आणि केसात होणारे ‘हे’ बदल थायरॉईड आजाराचे संकेत असू शकतात; ‘ही’ लक्षणे दिसतात वेळीच सावध व्हा

“थायरॉईड रोगाचे निदान झालेल्या लोकांना आयुष्यभर औषधोपचार करण्यास सांगितले जाते” असे डॉ. स्मृती कोचर (gut health expert) यांनी इंस्टाग्रामवर सांगितले आहे.

thyroid causes
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

जगभरात थायरॉईड हा आजार सामान्य बनत चालला आहे. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असते. भारतातही थायरॉईडच्या आजाराचे निदान झालेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. भारतात अंदाजे ३२ टक्के लोकं थायरॉईडच्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त आहेत. थायरॉईड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. तसंच भारतीय थायरॉईड सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हायपोथायरॉईडीझमचे प्रमाण अधिक आहे.

थायरॉईड ग्रंथी मानेच्या तळाशी असतात आणि शरीरातील चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करतात. थायरॉईड ग्रंथी कमी सक्रिय झाल्यामुळे हायपोथायरॉईडीझम होतो, तर थायरॉईड संप्रेरकाच्या अतिउत्पादनामुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.

परंतु, थायरॉईड आजार नेमका कशामुळे होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? “थायरॉईड रोगाचे निदान झालेल्या लोकांना आयुष्यभर औषधोपचार करण्यास सांगितले जाते” असे स्मृती कोचर (gut health expert) यांनी इंस्टाग्रामवर सांगितले आहे. त्या पुढे असंही म्हणाल्या की, जर तुम्हाला तुमचे शरीर कसे कार्य करते आणि तुमच्या बायोकेमिस्ट्रीमागील विज्ञान समजले तर, थायरॉईड आजारासह बर्‍याच समस्या वेळीच दूर होऊ शकतात.

थायरॉईड आजाराची लक्षणे

थायरॉईड आजार झाल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसू शकतात जसे की,

  • वजन वाढणे
  • थकवा
  • बद्धकोष्ठता
  • चिडचिड
  • केस कोरडे होणे किंवा पातळ होणे
  • भुवया विरळ होणे
  • नखे ठिसूळ होणे
  • निद्रानाश

तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब TSH (thyroid stimulating hormone) चाचणी, छातीचा एक्स-रे, T4 किंवा थायरॉक्सिन चाचणी करा.

( हे ही वाचा: किडनीचे रुग्ण हळदीचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात)

उपचार

हायपरथायरॉईडीझमवर अनेक प्रकारे उपचार केले जाऊ शकतात. तथापि, डॉ गुप्ता यांनी स्पष्ट केले की हायपरथायरॉईडीझमचे मूळ कारण, रुग्णाचे वय, थायरॉईड ग्रंथीचा आकार यासारख्या अनेक बदलांच्या आधारावर उपचार केले जाऊ शकतात. तुम्हाला हायपोथायरॉईडीझम असल्याचे आढळल्यास, थायरॉईड संप्रेरक बदलणे फायद्याचे ठरू शकते. औषधोपचाराने तुमची थायरॉईड संप्रेरक पातळी सामान्य होण्यासाठी जवळपास १ ते २ महिने लागू शकतात. औषधोपचार सुरू केल्यावर, तुमची TSH पातळी सामान्य श्रेणीत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही ते तपासले पाहिजे. तुम्हाला दर ६ महिन्यांनी तुमची थायरॉईड टेस्ट करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:03 IST
ताज्या बातम्या