Headaches Types : डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आजार असून कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये तो दिसून येते. डोकेदुखीचे साधारण १५० हून अधिक प्रकार आहे आणि त्याची लक्षणंही वेगळी आहेत. यामुळे आयुष्यात एकदा तरी डोकेदुखीचा त्रास सतावतो. याची काही कारणे सौम्य तर काही कारणे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. डोकेदुखीचे दोन भागात वर्गीकरण केले जाते. यातील प्राथमिक डोकेदुखीत विशिष्ट कारणं आढळले नाहीतर दुय्यम डोकेदुखी कारणं समजून घेतली जातात. यात उच्च रक्तदाब, सायनुसायटिस, संसर्ग, मेंदूतील रक्ताची गुठळी, ट्यूमर इत्यादी आजारांनुसार रुग्णाचे चेकअप केले जाते.

डोकेदुखीचे नेमके कोणते प्रकार आहेत आणि त्याची लक्षणं काय आहेत, याबाबत कावेरी हॉस्पिटलच्या एमडी, डीएम (न्यूरॉलॉजी), मायग्रेन सर्टिफिकेशन (मेयो क्लिनिक), न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्टोलॉजिस्ट डॉ. सोनिया तांबे यांनी माहिती दिली आहे. जाणून डोकेदुखीचे प्रकार आणि लक्षणं…

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
Car Ridden Boys Throw Water Balloons at people on a busy in road delhi viral video
बापरे! भर रस्त्यात चालत्या कारमधून लोकांच्या अंगावर फेकले पाण्याचे फुगे, तरुणांचा संतापजनक प्रकार; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

तणावामुळे डोकेदुखी:

पुरेशी झोप, आराम न घेता सतत काम करत राहिल्याने अशाप्रकारची डोकेदुखी सतावते. ही सौम्य ते मध्यम तीव्रतेचे डोकेदुखी असते, यात अनेकदा डोक्याभोवती घट्ट पट्ट्यासारखे जड वाटते.

मायग्रेन:

मायग्रेन हा डोकेदुखीचा आजार आहे जो प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीस होत आहे. यात डोक्याची एक बाजू दुखत राहते. यावर कोणतेही औषध न घेतल्यास हे दुखणे ४ ते ७२ तासांपर्यंत जाणवत राहते. मायग्रेनमध्ये डोके खूप तीव्र दुखते, कधीकधी तीव्र प्रकाशामुळेही मायग्रेनचा त्रास होतो. काहीवेळा आवाज किंवा विशिष्ट सुगंधामुळे सुद्धा डोकं दुखू लागते. विशेषत: जेवणाच्या चुकीच्या सवयी, कमी झोप, अल्कोहोलचे सेवन, वास, सूर्यप्रकाश यामुळे मायग्रेनचा त्रास होतो.

क्लस्टर डोकेदुखी:

क्लस्टर डोकेदुखी ही सर्वात गंभीर डोकेदुखी आहे. यामुळे डोळ्यांमध्ये तीव्र वेदना आणि जळजळ होते. या वेदना खूप वेळ जाणवतात. डोक्यातही असह्य वेदना होता. यात डोळे लालसर होतात, बाहुली लहान होते आणि डोळ्यातून आणि नाकातून पाणी येत राहते.

सायनस डोकेदुखी:

सायनस डोकेदुखी हा नाकासंबंधीत आजार आहे. पण यातही कपाळ, गालात वेदना होता. यासोबत नाकातून पाणी येणे किंवा अर्धे डोके दुखते. सायनसची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच काही घरगुती उपायही यावर गुणकारी ठरतात.

दुखापतीनंतरची डोकेदुखी:

डोक्याला/मानेला झालेल्या दुखापतीनंतर ही डोकेदुखी सतावते. दुखापतीनंतर ७ दिवसांनी ही डोकेदुखी जाणवू लागते आणि काही महिन्यांपर्यंत अशीच राहते. यात डोक्यात सतत ठणके मारत राहतात.

औषधांचा अतिवापरामुळे होणारी डोकेदुखी:

डोकेदुखीचा त्रास असलेले रुग्ण वारंवार वेदनाशामक औषधांचा वापर करतात. या औषधांच्या अतिवापरामुळेही पुन्हा डोकेदुखीचा त्रास होत राहतो.

डोकेदुखीची चिंताजनक लक्षणे:

डोकेदुखीच्या काही लक्षणांना रेड फ्लॅग्स असे म्हटले जाते. यामुळे डोकेदुखीच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देत उपचार केले पाहिजेत. उच्च रक्तदाब, वय 50 वर्षांहून अधिक वय, गरोदरपण, अपुरी झोप, हात-पाय कमजोर होणे, चक्कर येणे ही डोकेदुखीची लक्षणं आहेत.