Uncontrolled diabetes can harm your foot know the diabetic foot ulcer symptoms gps 97 | Loksatta

ब्लड शुगरमध्ये कधी येते पाय कापण्याची वेळ? वेळीच जाणून घ्या Diabetic Foot ulcer ची लक्षणे

foot ulcer: डायबिटीज फूड अल्सर मध्ये, पायाला दुखापत झाल्यावर रुग्णाला वेदना होत नाहीत.

ब्लड शुगरमध्ये कधी येते पाय कापण्याची वेळ? वेळीच जाणून घ्या Diabetic Foot ulcer ची लक्षणे
photo: freepik

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. रक्तातील साखरेची पातळी आपण खातो त्यावर अवलंबून असते. आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते. इंसुलिन नावाचा संप्रेरक तुमच्या पेशींमध्ये ग्लुकोज येण्यास मदत करतो. टाइप १ मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही, तर टाईप २ मधुमेहामध्ये स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. पुरेशा इन्सुलिनशिवाय, ग्लुकोज सामान्यपणे जितक्या लवकर पेशींमध्ये प्रवेश करत नाही.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरात अनेक आजार होण्याचा धोका जास्त असतो. उच्च रक्तातील साखरेमुळे हृदयविकार, किडनी आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत रक्तातील साखरेमुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर आणि पायांवरही दिसून येतो. मधुमेहाच्या रूग्णांना पायाचा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे. जास्त काळ रक्तातील साखरेच्या संपर्कात राहिल्याने पायांच्या मज्जातंतूंना नुकसान होऊ शकते, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात.

( हे ही वाचा: चांगले कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढवण्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ बनतील औषधं; आजच वापरून पाहा)

डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, वेदना होऊ शकते. या समस्येवर वेळीच उपचार केले नाही तर पाय कापण्याची वेळ येऊ शकते. चला जाणून घेऊया डायबिटिक फुट अल्सरची लक्षणे काय आहेत?

डायबिटिक फुट अल्सरमध्ये पाय कापण्याची वेळ कधी येऊ शकते?

मेडलाइन प्लसच्या मते, मधुमेह न्यूरोपॅथीमुळे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे नसा आणि रक्तपेशींचे नुकसान होते. अशा स्थितीत तुम्हाला वेदना जाणवू शकत नाहीत. जर तुमच्या पायावर कट, फोड किंवा व्रण असेल तर तुम्हाला याची जाणीव होत नाही, ज्यामुळे जखमेत संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

पायातील संक्रमण चांगले बरे होत नाही, कारण खराब झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे तुमच्या पायांमध्ये रक्त परिसंचरण खराब होते. संसर्ग आणि खराब रक्तप्रवाहामुळे गॅंग्रीन होते. गँगरीनमुळे स्नायू, त्वचा आणि इतर ऊतींना इजा होऊ लागते. गॅंग्रीनवर योग्य उपचार न केल्यास, यामुळे पायाच्या खराब झालेल्या भागाला कापण्याची वेळ देखील येऊ शकते. डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे खराब अवयव कापतात जेणेकरून संपूर्ण शरीराला हानी पोहोचता नये.

( हे ही वाचा: यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ कडू भाजीचा रस; जाणून घ्या या चमत्कारिक भाजीबद्दल..)

डायबिटीज फूट अल्सरची लक्षणे

  • पायांच्या त्वचेचा रंग खराब होणे
  • पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे
  • पायात संवेदनशीलता कमी होणे
  • पायावर जखमा होणे कधी कधी जखमेतून पू बाहेर येणे
  • चालताना वेदना होणे
  • मधुमेही रूग्णांच्या पायात अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 15:19 IST
Next Story
चांगले कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढवण्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ बनतील औषधं; आजच वापरून पाहा