Benefits Of Eating Unprocessed Foods : तुमच्यापैकी अनेकांना मसालेदार, चविष्ट, चमचमीत पदार्थ खायला आवडतात. त्यात अनेक जण घरचे डाळ, भात नाही; पण बाहेरचा पिझ्झा, बर्गर, कोक आवडीने खातात. बाहेरच्या या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, मैदा, खाद्यरंगांचा वापर केला जातो. त्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. त्याशिवाय अनेक जण जिमला जाण्यापूर्वी किंवा आल्यानंतर एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात, जे की शरीरासाठी घातक असते; पण तरीही ते आपण खातो.

त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातही अनेक फास्ट फूडची दुकानं पाहायला मिळतात. अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही अशा फास्ट फूड खाण्याने होते. पण, विचार करा की, जर तुम्ही एक महिना पिझ्झा, बर्गर, कोक असे बाहेरचे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले, तर काय होईल? याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आहारतज्ज्ञ सुश्री वीणा यांनी सविस्तर माहिती दिली ती जाणून घेऊ…

तज्ज्ञांते काय मत आहे?

प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन करणे हे प्रकारचे व्यसन बनू शकते. अशा वेळी आपल्या शरीराला नैसर्गिकरीत्या पोट भरण्यासाठी अधिक अन्न खाण्यास प्रवृत्त केले जाते. कारण- बाहेरच्या पदार्थांमध्ये अशा काही गोष्टी टाकल्या जातात, ज्याने माणसाची खाण्याची इच्छा आणखी वाढते, असे ॲस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटल चीफ क्लिनिकल डाएटीशियन सुश्री वीणा यांनी सांगितले.

असे दिसून आले की, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ॲडिटिव्ह आणि प्रिझर्वेटिव्ह असते, ज्याने “ब्रेन केमिस्ट्री” बदलते. या पदार्थांमध्ये कॉर्न सिरपसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. त्यात फ्रुक्टोज किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG)चे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे तो पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो आणि त्यामुळे तो पदार्थ सतत खाण्याची इच्छा होते.

बाहेरील पदार्थ खाणं बंद केल्यास होईल?

पण, जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी बाहेरचे पदार्थ म्हणजे कोल्ड्रिंक्स पिझ्झा, बर्गर खाणे बंद करतात तेव्हा तुमचे शरीर या अॅडिटिव्ह्जपासून स्वत:ला डिटॉक्सिफाय करण्यास सुरुवात करते. डोकेदुखी, चिडचीड आणि थकवा अशी लक्षणे कालांतराने कमी होऊ लागतात. इतकेच नाही, तर व्यक्तीची शारीरिक ऊर्जा पातळी वाढते, पचनक्रिया सुधारते, मूड चांगला राहतो, तुमची त्वचा मुलायम आणि सुंदर दिसू लागते. त्यात फळे, भाज्या आणि घरातील इतर खाद्यपदार्थ अधिक चवदार वाटू लागतात. त्यातील नैसर्गिक चवींमुळे तुमचे मन तृप्त होते. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि त्यामुळे निरोगी आणि अधिक संतुलित जीवनशैली जगता येते.

प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बराच वेळ टिकण्यासााठी त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. हे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा पचनसंस्थेतील चांगले जीवाणू विस्थापित होतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. त्यामध्ये ट्रान्स फॅट्स आणि रिफाइंड साखरेसारखे दाहक घटकदेखील असतात. त्यामुळे हार्मोनल असंतुलन बिघडते आणि मुरुमांची समस्या जाणवते. अशाने त्वचेच्या आरोग्यावरही त्याला परिणाम दिसून येतो.

Read More Helth News : Vinesh Phogat : पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वजन कमी करणे अधिक कठीण का असते? आहारतज्ज्ञ काय सांगतात? वाचा…

तंतुमय आहारामुळे निरोगी पचनसंस्थेला चालना मिळते. तर पालेभाज्या, चरबीयुक्त मासे व सुका मेवा यांसारख्या दाहकविरोधी खाद्यपदार्थांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. निरोगी आहार, चांगली झोप यामुळे आरोग्यास दीर्घकालीन फायदे मिळतात, ज्यात लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, हृदयरोग व विशिष्ट कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो.

नाश्त्यामध्ये तृणधान्यांपासून बनवलेल्या खाद्यपदार्थ्यांचा समावेश करणे आरोग्यास तितके फायदेशीर मानले जात नाही. कारण- त्यात जास्त प्रमाणात साखर आणि कृत्रिम घटक असतात. त्याऐवजी तुम्ही ओट्समील किंवा सफेद मुसळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता.

बाहेरील प्रक्रिया केलेल्या पदार्थ्यांऐवजी खा ‘हे’ पदार्थ

पांढऱ्या तांदळाच्या जागी तुम्ही ब्राउन राईस, सोडाऐवजी हर्बल चहा, रेग्युलर बटरऐवजी नट बटर, ग्रील्ड, बेक फूड आणि इतर अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता. तुम्ही केकसारखे गोड पदार्थ घरीच चांगले पदार्थ वापरून बनवू शकता. तसेच आईस्क्रीमच्या जागी तुम्ही फ्रोझन दही खाऊ शकता. त्याशिवाय घरच्या तयार केलेल्या सॅलडचा रोजच्या आहारात समावेश करणे हादेखील उत्तम आरोग्याचा भाग आहे. तसेच बाटलीबंद सोडा, कोल्ड ड्रिंक्सच्या जागी तुम्ही नैसर्गिक आरोग्यदायी कोकम सरबत, लिंबू पाणी असे घरच्या घरी बनणाऱ्या पेयांचे सेवन करू शकता.