scorecardresearch

युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब

Uric Acid Ayurvedic Treatment: मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार जेव्हा अपचनाची समस्या नियमित जाणवते तेव्हा शरीरात युरिक ऍसिडचा स्तर वाढू लागतो.

युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब
युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह 'या' पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब (फोटो: संग्रहित)

Uric Acid Ayurvedic Treatment: शरीरात युरिक ऍसिड वाढण्याच्या समस्येला हाइपरयूरिसीमिया असे संबोधले जाते. आजकाल बहुतांश लोकांमध्ये ही समस्यां कॉमन आहे. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार जेव्हा अपचनाची समस्या नियमित जाणवते तेव्हा शरीरात युरिक ऍसिडचा स्तर वाढू लागतो. शरीरातून मलमुत्राच्यावाटे युरिक ऍसिड बाहेर फेकले जाते मात्र युरिक ऍसिड वाढल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता असते. ज्यांच्या आहारात अधिक तेलकट पदार्थ असतात त्यांना परिणामी अतिवजन कोलेस्ट्रॉलचे अधिक त्रास उद्भवतात. मात्र यामुळेच युरिक ऍसिड वाढीस लागून हृदयाचे विकार, किडनीच्या तक्रारी सुद्धा जाणवू शकतात. आज याच तक्रारीवर आपण काही साधे घरगुती आयुर्वेदिक उपचार पाहणार आहोत..

प्राप्त माहितीनुसार सामान्यतः पुरुषांमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण ३.४- ७.० मिलीग्राम तसेच महिलांमध्ये २.४ – ६.० मिलीग्राम यादरम्यान असणे आवश्यक आहे. युरिक ऍसिडचे हे परफेक्ट प्रमाण असण्यासाठी आपण खालील आयुर्वेदिक उपचार ट्राय करून पाहू शकता..

युरिक ऍसिडवर सोपे आयुर्वेदिक उपचार

१) लिंबू:

सायन्स डायरेक्ट्स मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार रक्तातील अतिरिक्त युरिक ऍसिड कमी करण्यासाठी लिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. लिंबाच्या रसाचे सेवन आपल्या शरीरातील अल्कलाईनचे प्रमाण वाढवून ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसेच लिंबातील व्हटामिन सी शरीरात युरिकचा स्तर कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते.

२) ऑलिव्ह ऑइल

एनसीबीआईच्या माहितीनुसार आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करणे युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई, लोह, ओमेगा , फॅटी ऍसिड व अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. आपण रोजच्या जेवणातही ऑलिव्ह ऑईलचा वापर सुरु केल्यास याने चव न बिघडता आरोग्य सुदृढ राखता येऊ शकते.

३) बेकिंग सोडा

युरिक ऍसिड नियंत्रणात आणण्यासाठी बेकिंग सोडा हा अत्यंत गुणकारी उपाय मानला जातो. मिशिगन स्टेट यूनिवर्सिटीच्या माहितीनुसार बेकिंग सोडा हा बद्धकोष्ठ कमी करण्यासाठी तसेच अपचन टाळण्यासाठी गुणकारी आहे परिणामी मलमूत्रमार्गे सहजरित्या युरिक ऍसिड शरीराबाहेर फेकता येते. बेकिंग सोड्यामुळे शरीरात अल्कलाईनचा स्तर वाढून युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते.

हे ही वाचा << Uric Acid: शरीरातील युरिक ऍसिड वाढवतात ‘ही’ ३ फळे; बोटांना सूज, थकव्यासह दिसून येतात ‘ही’ लक्षणे

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांवलिया यांच्या माहितीनुसार युरिक ऍसिडचा त्रास असल्यास, आपण जीवनशैलीत काही साधे बदल करणे गरजेचे आहे. मेटाबॉलिज्म वाढीसाठी आपल्याला आहारात फायबरयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करायला हवा तसेच रात्रीच्या वेळी पचनास जड असे पदार्थ खाणे टाळायला हवे. तसेच मद्यपान व मांसाहार कमी केल्यास सुद्धा युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. डॉक्टर दीक्षा यांच्या माहितीनुसार शरीराला किमान व्यायामाची गरज असते. एका दिवसात किमान ४५ मिनिटे शारीरिक हालचाल आवश्यक असते. तसेच शरीराला नेहमी ८ तास झोप गरजेची आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, आरोग्याच्या समस्या जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरेल)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 14:27 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या