High Uric Acid Can Cause Kidney Failure: युरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे घातक द्रव्य आहे. युरिक ऍसिड हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन असे वायू एकत्र येऊन तयार झालेले असते. ज्याचे प्रमाण वाढल्यास किडनीपासून मेंदू, हृदय व एकूणच शरीरावर गंभीर परिणाम होतात. किडनी शरीरातील युरिक ऍसिड, केमिकल्स, खनिज व अन्य टाकाऊ पदार्थांना फिल्टर करून मलमूत्राच्या मार्गे शरीराबाहेर फेकते. पण जेव्हा युरिक ऍसिडचे प्रमाण वाढीस लागते तेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होऊन हे घटक शरीरात क्रिस्टलच्या रूपात शरीरात जमा होऊ लागतात.

धर्मा किडनी केअरचे डॉ. प्रशांत धीरेंद्र यांचं माहितीनुसार, महिलांमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण २.४- ६.० mg/dL व पुरुषांमध्ये ३.४ ते ७.० mg/dL इतके असणे योग्य आहे. युरिक ऍसिड वाढीस लागल्यास उठण्यास- बसण्यास, साधी हालचाल करण्यासही शरीर अकार्यक्षम होऊ शकते. शिवाय किडनी निकामी होण्याचा धोका सुद्धा असतो. आज आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत जे शरीरात पचल्यावर युरिक ऍसिडचे प्रमाण वेगाने वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

आयुर्वेदिक डॉ. सलीम जैदी यांचं माहितीनुसार प्युरीनयुक्त पदार्थांच्या सेवनाने शरीरात युरिक ऍसिड वाढते. प्युरीन युक्त असे कोणते पदार्थ आपण आहारात टाळायला हवे हे आपण जाणून घेऊया..

उडीद डाळ (Avoid Urad Dal)

उडदाची डाळ ही प्युरीनचा साठा असते. जेव्हा उडीद डाळीचे शरीरात पचन होते तेव्हा प्युरीन बूस्ट होऊन युरिक ऍसिड वाढू लागते. म्हणूनच जर आपल्याला किडनीचे त्रास असतील किंवा सतत सांधेदुखीचा त्रास असेल तर उडदाचं डाळीचे सेवन निदान मर्यादेत ठेवावे

तूर डाळ (Avoid Tur Dal)

तुरीच्या डाळीत प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे जर तुम्हाला ऍलर्जीचा त्रास असेल तर तुरीच्या डाळीने पचनप्रक्रिया बिघडण्याचा धोका असतो. युरिक ऍसिडचा त्रास असल्यास तुरीच्या डाळीचे सेवन टाळावे.

पालक व अरबी (Avoid spinach and colocasia)

पालक व अरबीच्या भाजीत प्रोटीन व प्युरीनचे प्रमाण असतेअसते. यामुळे युरिक ऍसिड वाढून सांध्यांमध्ये सूज व वेदना जाणवू शकतात. आपल्यालाही किडनीचे विकार असल्यास पालक व चरबीचे सेवन डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे.

हे ही वाचा<< बदाम खाल्ल्याने वाढतो किडनी निकामी होण्याचा धोका? ‘हे’ ४ त्रास असल्यास बदामापासून दूरच रहा

बीन्स व राजमा (Avoid beans and kidney beans)

युरिक ऍसिड अधिक असल्यास बीन्स व राजमा खाणे टाळायला हवे. बीन्समध्ये प्युरीनचे प्रमाण अधिक असते. राजमा सुद्धा युरिक ऍसिड वाढवू शकतो. हे दोन्ही पदार्थ पचण्यास सुद्धा जड असतात त्यामुळे आधी त्यांना पचवण्यासाठी व मग त्यातील अनावश्यक घटक शरीरातून काढून टाकण्यासाठी किडनीवर तणाव येतो.

हे ही वाचा<< नखावर पांढरे डाग कॅल्शियम कमी झाल्याने नाही तर ‘या’ मुळे येतात; हृदय व श्वसनाचा मोठा धोका ओळखा

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)