Vijaysar Water For Diabetes: विजयसर लाकूड, याला वैज्ञानिकदृष्ट्या टेरोकार्प्स मर्स्यूपियम म्हणून ओळखले जाते. ही एक औषधी वनस्पती आहे. तिचा विविध आजारांवर उपचार म्हणून वापर केला जातो. आयुर्वेदात प्राचीन काळापासून डायबिटीज, पचन समस्या आणि त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी विजयसरचा वापर केला जात आहे. त्याचे लाकूड, साल आणि हार्टवुड हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानले जाते. त्यात फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन, अल्कलॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स सारखए जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे असतात. याचे अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी प्रभाव असतात. विजयसर लाकडापासून बनवलेल्या ग्लासमधून पाणी पिण्याची परंपरा अनेक वर्षांपासून काही भागात आहे. आयुर्वेदानुसार, या लाकडाचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.
पारंपरिकपणे लाकडापासून बनवलेल्या ग्लासमध्ये रात्रभर पाणी ठेवले जाते आणि सकाळी रिकाम्या पोटी प्यायले जाते. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते असे मानले जाते. काही प्रायोगिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विजयसर स्वादुपिंडातील बीटा पेशींच्या कार्याला समर्थन देऊ शकते आणि इन्सुलिन स्त्राव वाढवण्यास मदत करू शकते. तसंच ते मधुमेहासाठी संपूर्ण उपचार मानले जात नाही आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधाऐवजी ते वापरू नये.
संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिकारक शक्तीचे तज्ज्ञ, वैद्यकीय शिक्षक आणि क्लिनिकल प्रॅक्टिशनर डॉ. फ्रोफेसर मृदुल मेहरोत्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलतान सांगितले की, आयुर्वेदात या लाकडाचा वापर लिव्हर टॉनिक, जखमा बरे करणारे आणि जळजळ नियंत्रण औषध म्हणून केला जातो. या लाकडाचे पाणी डायबिटीज कसे नियंत्रित करते, त्याचे फायदे आणि वैद्यकीय शास्त्र याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…
विजयसर डायबिटीज कसा नियंत्रित करतो?
विजयसर लाकूड रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विजयसर लाकडात फअलेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स सारखी संयुगे असतात. प्राण्यांवर केलेल्या काही संशोधनात असे आढळून आले आहे की, ही संयुगे इन्सुलिन स्त्राव वाढवण्यास मदत करू शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, ते स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना मरण्यापासून रोखण्यास आणि त्यांच्या कार्याला समर्थन देण्यास मदत करू शकते. त्याचे सेवन केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. नियमित सेवन केल्याने शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारू शकते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर अनेक अभ्यासांनुसार, विजयसरमधील एपिकेटचिन नावाचे संयुग स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना पुन्हा सक्रिय करण्यास किंवा पुनरूज्जीवित करण्यास मदत करू शकते. या पेशी इन्सुलिन तयार करण्यास जबाबदार असतात. जेव्हा या पेशी निरोगी असतात, तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या चांगले इन्सुलिन तयार करण्यास सक्षम असते.
जर विजयसर लाकूड रात्रभर पाण्यात भिजवले तर सकाळपर्यंत पाणी नारंगी रंगाचे होते. लाकडात असलेले अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स या पाण्यात विरघळतात. सकाळी हे पाणी प्यायल्याने इन्सुलिन स्त्राव वाढतो. तज्ज्ञ सांगतात की, हे पाणी डायबिटीजवरील उपचार नाही तर एक सहाय्यक उपाय आहे.
लिव्हरसाठी देखील प्रभावी
आयुर्वेदानुसार, कडू घटक लिव्हर आणि स्वादुपिंड सक्रिय करण्यास मदत करतात. त्यामुळे चयापचय सुधारू शकतो. रात्रभर विजयसर लाकडापासून बनवलेल्या ग्लासमध्ये पाणी साठवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते प्या. ते रात्रीच्या जेवणापूर्वी देखील घेऊ शकता. कडू फायटोकेमिकल्स लिव्हरमधील एन्झाइम्स आणि पित्त स्त्रावाला आराम देऊ शकतात. पित्त चरबीचे पचन चांगले करण्यास मदत करते. विजयसपरमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिनसारखे घटक असतात. ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. हे लिव्हरच्या पेशींना संरक्षण देतात. या लाकडाचे दाहक विरोधी गुणधर्म लिव्हरची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
या लाकडातील कडू घटक जठरासंबंधी रस आणि पाचक एन्झाइमच्या स्त्रावाला उत्तेजन देऊ शकतात. त्यामुळे भूक आणि पचन सुधारते. त्याचे सेवन केल्याने हालचाली नियंत्रित करण्यास मदत होते पचन सुधारणे आणि पोषक तत्वांचे शोषण एकूणच चयापचय सुधारते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे उपाय करावे.

