Walking Benefits: दररोज ७,००० पावले चालल्यास – आठवड्याच्या शेवटी आपले फिटनेसचे उद्दिष्ट पूर्ण होते का हे आज आपण जाणून घेणार आहोत. तज्ज्ञ सांगतात की जी व्यक्ती दररोज ७,००० पावले चालण्याची सवय ठेवते, तसेच योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेते, तिला हळूहळू चांगले आरोग्य फायदे मिळू शकतात.

डॉ. ऋतुजा उगाळमुळे (कन्सल्टंट फिजिशियन, वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल) म्हणाल्या की सलग दोन महिने दररोज ७,००० पावले चालल्यास आरोग्यावर नोटिसेबल परिणाम दिसू शकतात.

“हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, वजन नियंत्रणात मदत करते, मनःस्थिती सुधारते आणि एकूण ऊर्जा पातळी वाढवते,” असे डॉ. उगाळमुळे म्हणाल्या.

“नियमित चालण्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते, रक्तदाब कमी होतो आणि सांधे व स्नायूंचे आरोग्यही चांगले राहते. जरी १०,००० पावले आदर्श मानली जात असली, तरी अनेक लोकांसाठी ७,००० पावले (वीकेंड्स पकडून) हे प्रतिदिनाचं एक वास्तववादी आणि प्रभावी लक्ष्य आहे,” असे डॉ. उगाळमुळे म्हणाल्या.

दररोज ५,००० पेक्षा कमी पावले चालणे ही एक निष्क्रिय जीवनशैली मानली जाते. जरी १०,००० पावले आदर्श मानली जात असली, तरी ७,००० पावले हा सुरुवातीसाठी चांगला पर्याय आहे, असे डॉ. एम. सुधाकर राव (कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, सर्जापूर रोड) यांनी सांगितले.

चालण्यामुळे जेवणानंतरची साखरेची पातळी कमी होते, असे डॉ. राव म्हणाले. “हे इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते. यामुळे सिस्टोलिक रक्तदाब सुमारे ५ मिमी आणि डायस्टोलिक रक्तदाब सुमारे ३ मिमीने कमी होतो. याशिवाय, एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते आणि इतर जोखमीचे घटकही घटतात,” असे डॉ. राव म्हणाले.

डॉ. अनिकेत मुळे, कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन, किम्स हॉस्पिटल, ठाणे, यांनी सांगितले की जो व्यक्ती सलग दोन महिने दररोज ७,००० पावले चालतो, त्याला मानसिक आरोग्यात सुधारणा होते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता चांगली होते.

“नियमित शारीरिक व्यायामामुळे शरीरातील कॅलरी जास्त परिणामकारकरित्या बर्न होतात आणि त्याचबरोबर सहनशक्ती वाढण्यास मदत होते. चालणे हे एक प्रभावी व्यायामाचे माध्यम आहे कारण ते शरीरावर सौम्य ताण देते आणि सर्व वयोगटातील लोक दीर्घकाळ यामध्ये सहभागी राहू शकतात,” असे डॉ. मुळे म्हणाले.

कालांतराने ही सवय मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकते, तसेच मानसिक आरोग्यासही चालना देते. “नियमित चालणे हृदयासाठी फायदेशीर ठरते कारण ते वजन नियंत्रणात ठेवते आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. चालणे हे सांध्यांच्या आरोग्यासाठी एक संरक्षणात्मक उपाय आहे आणि त्याचवेळी उच्च रक्तदाब होण्याची शक्यता कमी करते, टाईप २ मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते,” असे डॉ. मुळे म्हणाले.

डॉ. उगाळमुळे यांनी पुढे सांगितले की चालताना सुरक्षित आणि आनंददायक अनुभव मिळावा यासाठी आरामदायक व सपोर्टिव शूज घालणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज ७,००० पावले चालण्याचे काही सोपे आणि हुशार मार्ग म्हणजे लिफ्टऐवजी जिना वापरणे आणि गाडी थोडी दूर पार्क करणे. “तुम्ही वाट पाहताना चालू शकता, फिरत फिरत बोलू शकता. काम करताना थोडं इकडं-तिकडं फिरू शकता किंवा जिथे आहात त्या भागात फेरफटका मारू शकता,” असे डॉ. राव म्हणाले.