Washing Hands Frequently : आपल्या चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे हात वारंवार धुण्याची सवय लावणे महत्त्वाचे असते. पण, या सवयीचा अतिरेक आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारकदेखील ठरू शकतो. तर बंगळुरू येथील एस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलच्या कॅन्सल्टंट आणि इंटर्नल मेडिसिनच्या डॉक्टर एस एम फयाझ यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्वच्छतेच्या सवयी आणि आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे हे सांगितलं आहे.

जास्त वेळा हात धुणे (Washing Hands Frequently) बहुतेक वेळा मनोवैज्ञानिक विकारांशी जोडलेले असू शकते. जसे की, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD). जिथे हात पुन्हा पुन्हा धुण्याची इच्छा होते. हातावर जंतू किंवा आपले हात अस्वच्छ तर नाही आहेत ना, याची चिंता कमी करण्यासाठी पुन्हा पुन्हा ही क्रिया आपल्याकडून केली जाते.

young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ

जास्त वेळा हात धुण्याचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो (How can excessive handwashing affect your skin)

डॉक्टर एस एम फयाझ म्हणतात की, वारंवार हात धुणे (Washing Hands Frequently) किंवा हँड सॅनिटायझरचा जास्त वापर केल्याने त्वचेची जळजळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात. हे त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे कोरडेपणा, लालसरपणा आणि चिडचिड होऊ शकते. हात धुण्यामुळे पुरळ सहसा हातांच्या मागच्या बाजूला आणि बोटांच्यामध्ये दिसतात, ज्यामुळे त्वचेला एक्जिमा किंवा त्वचारोगसारख्या परिस्थितींचा धोका उद्भवू शकतो, ज्यामुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे आणि क्रॅक दिसू लागतात.

हेही वाचा…Sara Ali Khan : सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी प्यावे की ध्यान करावे? तुमच्यासाठी काय ठरेल फायदेशीर; वाचा डॉक्टरांचा सल्ला

दररोज किती वेळा आपले हात धुवावे (How often is it recommended to wash your hands daily) :

डॉक्टर एस एम फयाझ म्हणतात की, हाताची स्वच्छता ठेवणे आणि जंतू आणि बॅक्टेरियापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून ५ ते १० वेळा हात धुणे पुरेसे आहे. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, स्वच्छतागृह वापरल्यानंतर आणि खोकला, शिंकणे किंवा नाक पुसल्यानंतर तुम्ही हात धुतले पाहिजेत (Washing Hands Frequently) . तसेच सार्वजनिक वाहतूक किंवा दरवाजाच्या लॉकच्या (doorknobs) पृष्ठभागाला किंवा इतर वस्तूंना स्पर्श केल्यानंतर तुमचे हात जर अस्वच्छ दिसत असतील तेव्हा ते धुणेदेखील महत्त्वाचे आहे.

पण, जर हात धुण्यामुळे त्वचेला समस्या होत असेल तर हात धुण्याच्या पद्धती बदलणे आणि हातांना नेहमी मॉइस्चराइझ करणे चांगले ठरू शकते. यासाठी तुम्ही ग्लिसरीन, शिया बटर किंवा सिरॅमाइड्ससारखे घटक असलेले रिच हँड क्रीम किंवा लोशन वापरू शकता. तुम्ही हायलूरोनिक ॲसिडसारख्या हायड्रेटिंग घटकांसह हँड लोशनदेखील घेऊ शकता. याव्यतिरिक्त आपले हात गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा आणि त्यांना चोळण्याऐवजी मऊ टॉवेलने हळूवारपणे कोरडे करा.

Story img Loader