Home Made Drinks For Weight Gain: भारतामध्ये मागील काही वर्षांपासून लोक स्थूलपणाच्या समस्येचा सामना करत आहेत. देशातील असंख्य लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. ते वजन कमी करण्यासाठी नानाविध प्रकारचे उपाय करत आहेत. एका बाजूला काही लोक वाढलेल्या वजनामुळे दु:खी आहेत, तर दुसऱ्या बाजूला काहीजण वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आवश्यकतेपेक्षा कमी वजन असल्याचा प्रभाव दैनंदिन आयुष्यावर होत असतो. यामुळे घरातील, ऑफिस कामे करताना अधिकची मेहनत करावी लागू शकते. वजन वाढावे यासाठी बरेचसे लोक प्रयत्न करत असतात. औषधे, टॉनिक्स, सप्लिमेंट्स या उपायांची मदत घेत असतात. हे उपाय शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉनिक्स, सप्लिमेंट्स यांच्याऐवजी नियमितपणे या होममेड डिंक्सचे सेवन करुन वजन वाढवता येते. यांमध्ये रासायनिक घटकांचा समावेश नसल्याने यांच्या सेवनाने शरीराला नेहमी फायदा होत असतो. घरामध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून यांची निर्मिती होते. यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतात.वेट गेन करण्यासाठी उपयुक्त असलेल्या या पौष्टिक डिंक्सबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया…

बनाना शेक (Banana shake)

केळ्यामधील पौष्टिक तत्त्वांमुळे याला संपूर्ण आहार असे म्हटले जाते. यामध्ये व्हिटामिन, मिनरल्स, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांसारखे आवश्यक घटक मुबलक प्रमाणांमध्ये असतात. लवकरात लवकर वजन वाढावे यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. दोन केळी आणि एक ग्लास दूध मिक्सरमध्ये ब्लेंड करुन बनाना शेक तयार करता येतो. याच्या सेवनामुळे शरीराला फायदा होतो.

आणखी वाचा – बिनधास्त आंबे खा! त्वचेला होऊ शकतात ‘हे’ फायदे; आंब्याने पिंपल का येतात ते ही आधी जाणून घ्या

चॉकलेट शेक (Chocolate shake)

वजन वाढवण्यासाठी चॉकलेट शेक पिणे फायदेशीर ठरु शकते. चॉकलेटमध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनामुळे शरीरातील स्नायू दणकट बनतात. एक ग्लास दूध आणि डार्क चॉकलेट एकत्र करुन तयार होणाऱ्या चॉकलेट मिल्क शेकमुळे शरीराला ऊर्जा मिळते.

मॅंगो शेक (Mongo shake)

आंबा हे फळ कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन्सचे परिपूर्ण असते. मॅंगो पल्प आणि दूध एकत्र करुन मॅंगो शेक करता येतो. उन्हाळ्यामध्ये मॅंगो शेक पिणे अधिक योग्य मानले जाते. रोज नियमितपणे ठराविक प्रमाणात याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. आंब्याच्या फोडी टाकून त्याला सजवू देखील शकता.

आणखी वाचा – वजन व डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी दिवसाला किती कप चहा, कॉफी प्यावी? डॉक्टर सांगतात…

चीकू शेक (Chikoo shake)

चीकू शेक प्यायल्याने शरीरामध्ये कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन्स आणि आयर्न हे आवश्यक घटक पोहोचतात. याच्या सेवनामुळे थकवा नाहीसा होतो. दूधामध्ये चीकूच्या फोडी टाकून ते मिश्रण मिक्सरमध्ये ब्लेंड करावे आणि चीकू शेक तयार होईल. यामध्ये सेका मेवा देखील टाकू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight gain tips to increase weight include these homemade drinks in your daily diet routine know more details yps
First published on: 19-03-2023 at 12:10 IST