Weight Issues Diabetes Patients Should Eat Which Flour Wheat Or Maida Nutritionist Tells What Flour Is Better To Digest | Loksatta

गव्हापेक्षा वेगाने पचतात मैद्याच्या पोळ्या! न्यूट्रिशनिस्ट सांगतात डायबिटीज व वजन जास्त असल्यास किती करावे सेवन?

Which Flour Is Better Wheat Or Maida: न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी मैदा आरोग्यास हानिकारक असणे हा गैरसमज असल्याचे म्हंटले आहे.

Weight Issues Diabetes Patients Should Eat Which Flour Wheat Or Maida Nutritionist Tells What Flour Is Better To Digest
न्यूट्रिशनिस्ट सांगतात डायबिटीज व वजन जास्त असल्यास किती करावे सेवन? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Which Flour Is Better Wheat Or Maida: वाढते वजन, डायबिटीज, हृदयाचे विकार या अत्यंत भीषण समस्या आता अगदी सामान्य झाल्या आहेत. अगदी तरुण वयात सुद्धा अनेकजण या त्रासांनी ग्रासले असतात. अनेकदा आजारांसाठी आहारच कारणीभूत असतो. अलीकडे समस्यांसह जागरूकता वाढू लागली आहे, त्यामुळे अनेकजण हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आहाराचे प्लॅन बनवले जातात तेव्हा जे पदार्थ वगळण्याचा सल्ला दिला जातो त्यात सर्वात पहिला महत्त्वाचा पदार्थ असतो मैदा. जरी गव्हापासून तयार केलेला असला तरी ज्या रिफाईंड पद्धतीने मैदा बनतो तो आरोग्यासाठी फारसा गुणकारी नाही असे असा अनेकांचा समज असतो. पण आज आपण आहारतज्ज्ञांकडून गव्हाचे पीठ व मैद्या यातील बेस्ट पर्याय कोणता हे जाणून घेणार आहोत.

मैदा हा गव्हाच्या पिठाचा रिफाइंड प्रकार असल्याने या प्रक्रियेदरम्यान, गव्हातून अनेक पोषक घटक बाहेर पडतात. मैद्यापासून तयार पदार्थ नियमित खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवते. टाईप 2 मधुमेह, हृदयविकार, बद्धकोष्ठता, सूज येणे आणि गॅस यांसारख्या पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी मैदा आरोग्यास हानिकारक असणे हा गैरसमज असल्याचे म्हंटले आहे. गव्हाच्या पिठाच्या तुलनेत मैदा हा पचायला हलका असतो. जास्त फायबर असलेले अन्न हळूहळू पचते, म्हणून मैद्याच्या तुलनेत कोणतेही धान्याचे पीठ हळू पचायला सुरु होते. पण मैद्याचा ग्लायसेमिक इंडेस्क्स गव्हाच्या पिठाहून जास्त असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते म्हणूनच मैद्याचे सेवनसुद्धा प्रमाणात करावे.

गहू की मैदा, फायदेशीर काय?

हे ही वाचा<< ब्लड शुगर वाढवतात गव्हाच्या पोळ्या? ‘या’ ३ पिठांचा पर्याय ठरू शकतो बेस्ट; डायबिटीजमध्ये दिवसात किती पोळ्या खाव्यात?

हेल्दी पोळ्यांचे प्रकार

१) डायबिटीजच्या रुग्णांना ज्वारीची भाकरी अत्यंत लाभदायक ठरू शकते. ज्वारीत पाचक फायबर, मँग्नेशियम, प्रोटीन उपलब्ध असते त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्वारीच्या पिठात सुद्धा कमी ग्लूटेन असते.

हे ही वाचा<< योनीतुन सतत व्हाईट डिस्चार्ज होतो? ‘या’ २ आयुर्वेदिक उपायांनी तुमची रोजची अडचण सोडवा

२) नाचणीची भाकरी खाल्ल्यास आपल्याला पोट पटकन भरल्यासारखे वाटू शकते. यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीजच्या रुग्णांना फायबरयुक्त नाचणीच्या भाकरीचा फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 11:21 IST
Next Story
किडनीचे रुग्ण हळदीचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात