Exercises at Evening : सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. वेळेवर जेवण न करणे, वेळेवर न झोपणे, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे दिवसेंदिवस वजनवाढीसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. एका नवीन ऑस्ट्रेलियन अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, संध्याकाळी व्यायाम केल्याने लठ्ठपणा दूर करण्यास मदत होऊ शकते.
‘डायबिटीज केअर’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, संध्याकाळी ६ नंतर ते मध्यरात्रीदरम्यान केलेला अॅरोबिक व्यायाम (Aerobic Exercise) लठ्ठपणाशी सामना करण्यास मदत करतो. पण, व्यायामासाठी खरोखर ही चांगली वेळ आहे का? द इंडियन एक्स्प्रेसने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी आणि संध्याकाळचा व्यायाम

व्यायाम सकाळी करावा की संध्याकाळी, यावर अनेकदा वाद होताना दिसून येतो. मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या एंडोक्रायनोलॉजी येथील संचालक व पीजीआय येथील एंडोक्रायनोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. के. पी. सिंग सांगतात, “सकाळचा व्यायाम तुमची चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे दिवसभर कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी व्यायाम केल्याने फॅट्सचे ऑक्सिडेशन वाढते आणि इन्सुलिनची पातळी सुधारते. त्यामुळे फॅट्स कमी करणे, हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

जे लोक उशिरा उठतात किंवा शिफ्टमध्ये काम करतात अशा लोकांना सकाळचा व्यायाम करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी संध्याकाळी व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. संशोधनात सांगितले आहे की, स्नायूंची ताकद दुपारनंतर किंवा संध्याकाळी लवकर वाढते. त्यामुळे संध्याकाळचा व्यायाम अधिक प्रभावीपणे करता येतो.

शारीरिक क्रियांनुसार आपल्या शरीराचे तापमान दिवसभर बदलत असते; ज्याचा आपल्या व्यायामावर परिणाम होऊ शकतो. ‘अमेरिकन कॉन्सिल ऑन एक्सरसाइज’च्या मते, जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान खूप जास्त असते म्हणजेच दुपारनंतर तुम्ही व्यायाम करू शकता. सर्वसाधारणपणे २१ अंश सेल्सिअस तापमान अनेकांसाठी चांगले मानले जाते. कारण- या तापमानात जास्त उष्णता नसते आणि तुम्ही आरामात व्यायाम करू शकता.

हेही वाचा : रक्तातील साखर कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवायचयं? फक्त ‘या’ दोन गोष्टी करा; महिनाभरात दिसेल फरक

कोणी केव्हा व्यायाम करावा?

मधुमेहग्रस्त व्यक्ती : “मधुमेह असलेल्यांनी रात्री जर व्यायाम केला, तर सकाळी त्यांच्या ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते; जी चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. जर टाईप-२ मधुमेह किंवा लठ्ठपणा असेल ,तर संध्याकाळी ६ ते मध्यरात्रीदरम्यान ते व्यायाम करू शकतात,” असे मत मोहाली येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनचे संचालक डॉ. गुरप्रीत सिंग बाबरा यांनी व्यक्त केले.

हृदयविकारग्रस्त लोक : ज्यांना हृदयाशी संबंधित आजार असेल, त्यांनी सकाळी ८ ते ११ दरम्यान जेवण करावे. जर या लोकांना त्यांचा रक्तदाब कमी करण्याची इच्छा असेल किंवा स्नायू मजबूत करण्याची इच्छा असेल, तर हे लोक संध्याकाळी व्यायाम करू शकतात; परंतु त्यांनी मध्यरात्री ते सकाळी ६ पर्यंत व्यायाम करणे टाळावे. कारण- तसे केल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

चंदिगड येथील प्रगत कार्डियाक सेंटरच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक राजेश विजयवर्गीय सांगतात की, व्यायाम करताना सातत्य आणि नियमितता असणे अत्यंत गरजेचे आहे. “व्यायामासाठी वेळ काढताना आपण कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य देतो, आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे, व्यायाम करताना तुमच्यासमोर कोणती उद्दिष्टे आहेत, कामात व्यग्र असताना जुळवून घेण्याची किती तयारी आहे इत्यादी घटक महत्त्वाचे ठरतात. व्यायामानंतर आपल्याला तणावमुक्त आणि उत्साही वाटायला हवे; तसेच कामावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे.

काही लोकांना सकाळी व्यायाम केल्याने ऊर्जा मिळते; तर काही लोकांना सायंकाळी व्यायाम केल्याने तणावमुक्त झाल्यासारखे वाटते. हे लक्षात घेता, आपल्या दिनचर्येतून व्यायामासाठी वेळ काढणे आणि व्यायामाला प्राधान्य देणे अधिक गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight loss can be easier due to evening workouts know benefits of evening exercises ndj