Premium

वजन कमी केल्यामुळे कसा कमी होतो गुडघेदुखीचा त्रास; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यासाठी अधिक तेलकट, जंक फूड खाणे टाळावे.

weight loss can reduce knee pain
वजन वाढल्यामुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. (Image Credit-Freepik)

सध्या वाढणारे वजन ही खूप मोठी समस्या लोकांसमोर उभी आहे. वजन वाढल्यामुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. सुदीप्त साहा नावाचे गृहस्थ एक वर्षापासून गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसने (Osteoarthritis) त्रस्त होते. त्यांना हा त्रास होत होता. त्यांचे वय कमी असूनदेखील त्यांची स्थिती खराब झाली होती आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर झाला होता. ५ फूट ११ इंच इतकी त्यांची उंची होती. त्या उंचीसह त्यांचे वजन १३० किलोपेक्षा जास्त होते. अतिरिक्त वजन वाढल्यामुळे त्यांच्या गुडघ्यावरील ताण वाढला. त्यामुळे त्यांना चालताना किंवा हालचाल करतानाही त्रास होऊ लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”वजन कमी केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्सशी निगडित सूज कमी होते; ज्यामुळे गुडघ्यांचे आरोग्य चांगले राहते, असे मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे सल्लागार-ऑर्थोपेडिक्स डॉ. स्वप्नील केणी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. खरे तर डॉक्टर केणी यांनी साहा यांचे वजन कसे कमी करता येईल यावर अधिक लक्ष दिले. यांना सकस आहार, पोहणे, सायकलिंग करणे व गुडघ्यांना आराम मिळेल, असे काही सोपे व्यायाम करण्याचा सल्ला दिला. औषधोपचाराशिवाय उपचार करण्यावर त्यांनी भर दिला. पाच महिन्यांमध्ये साहा वाढलेले वजन आणि लठ्ठपणा गुडघ्यातील ऑस्टिओआर्थरायटिसच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. खरे तर शरीराचे वजन किती आहे ते महत्त्वाचे ठरते. कारण- गुडघे हा शरीराचे वजन सांभाळणारा प्राथमिक अवयव आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा आरोग्याच्या स्थितीमध्ये उच्च रक्तदाब, रक्तातील शर्करेची उच्च पातळी व कोलेस्ट्रॉलची पातळी यांचा समावेश होतो; ज्यामुळे गुडघ्यांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचा धोका आणखी वाढतो.

हेही वाचा : वजन कमी करायचे आहे? मोड आलेली कडधान्ये ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

तुमच्या शरीरातील बॉडी मास इंडेक्स (BMI) योग्य प्रमाणात राखणे आवश्यक आहे. जर का तुमचा बीएमआय हा १८.५ – २४.९ च्या मध्ये आहे; जे अधिक सामान्य आणि तंदुरुस्त असल्याचे समजले जाते. जर का तुमचा बीएमआय २५ पेक्षा जास्त असेल, तर वजन जास्त आहे, असे समजले जाते. तसेच बीएमआय ३० पेक्षा जास्त असल्यास त्या स्थितीला लठ्ठपणा, असे म्हटले जाते.

वजन कमी करताना आपले लक्ष्य सामान्य आणि योग्य बीएमआय राखण्याकडे असायला हवे. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यासाठी अधिक तेलकट, जंक फूड खाणे टाळावे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास कार्बोहायड्रेटचे सेवन करावे. तुम्ही व्हिटॅमिन डी आणि अँटीऑक्साईडसारख्या पोषक घटकांचे सेवन पूर्ण करीत असल्याची खात्री करावी. मासे, फ्लेक्स सीड्स व अक्रोडामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-३ फॅटी अॅसिडमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात; ज्यामुळे गुडघ्यांच्या आरोग्याला फायदा होतो.

गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या व्यक्तींसाठी कोणत्या प्रकारचे व्यायाम योग्य आहेत?

१. सर्वांत पहिल्यांदा तुम्ही सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर घेतला पाहिजे, असा सल्ला आम्ही देतो. कारण- व्हिटॅमिन डी ची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी सूर्यप्रकाश फायदेशीर ठरतो.

२. गुडघ्याचा त्रास ज्यांना कमी प्रमाणात आहे, त्यांनी हृदय अणि रक्तवाहिन्यांशी संबंधित व्यायाम करावेत; जे गुडघ्यांच्या सांध्याचे संरक्षण करण्यासाठी चांगले आहेत. विशेषतः सपाट जमीन किंवा ट्रेडमिलवर चालणे. आपला चालण्याचा वेळ आणि वेग हळूहळू वाढवावा. अॅरोबिक्स आणि पोहण्यामुळे फक्त कॅलरी बर्न होत नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

३. बाहेरील परिसरात आणि घरात अशा दोन्ही प्रकारचे सायकलिंग केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला कमी अंतराचे सायकलिंग करावे. आणि आणि हळूहळू त्याचा कालावधी आणि वेग वाढवावा.

४. गुडघ्याच्या सांध्यांभोवती असलेल्या स्नायूंना अधिक मजबूत करणाऱ्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पाय उचलणे, वॉल स्क्वॉट्स असे काही सोपे व्यायाम करावेत.

हेही वाचा : व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली ‘ही’ माहिती

वजन कमी करण्याच्या दृष्टीने आपला आहार कसा असावा यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जास्त व्यायामामुळे होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करू शकतात. गुडघ्याचे दुखणे अचानक वाढल्यास एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्यावा. अधिक लठ्ठपणामुळे त्रासलेल्या रुग्णांबाबत बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो. टोटल नी रिप्लेसमेंट (TKR) ही एक अतिशय यशस्वी शस्त्रक्रिया आहे; ज्यामुळे रुग्णाला अधिक फायदा होतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Weight loss osteoarthritic knee can relieve you from pain exercises or physical activities are suitable tmb 01

First published on: 19-09-2023 at 16:56 IST
Next Story
सकाळी तोंड न धुता, दात न घासता पाणी प्यावे का? तज्ज्ञ सांगतात करु नका ‘ही’ चूक शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान