scorecardresearch

Premium

महिनाभर एकही चॉकलेट खाल्ले नाही तर शरीरात काय बदल होतील? आहारतज्ज्ञ सांगतात….

आहारतज्ज्ञांच्या मते- तुम्ही महिनाभर चॉकलेट खाणं बंद करता तेव्हा तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात.

how bad is chocolate for health?
महिनाभर चॉकलेट न खाण्याचे फायदे. (Photo : Freepik)

लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडतं. त्यामुळे चॉकलेट खाणं सोडून देणं अनेकांना स्वप्नवत आणि अशक्य वाटू शकतं. त्यामुळे ते कायमचं सोडून देण्यापेक्षा महिनाभर खाणं बंद करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. कारण- आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांच्या मते, जेव्हा तुम्ही महिनाभर चॉकलेट खाणं बंद करता, तेव्हा तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात.

“तुमची जीभ गोड चवीसाठी अधिक संवेदनशील होऊ शकते; जे पदार्थ तुम्हाला पूर्वी खूप गोड वाटायचे. कदाचित त्या पदार्थांचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. चॉकलेटमुळे काही व्यक्तींच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात. त्यामुळे ते खाणं टाळल्यास तुमच्या त्वचेतही काही सुधारणा होऊ शकते.

Surya Mangal Yuti on Rishi Panchami 20 September Rashi Bhavishya This Zodiac Sign To Get Bappa Lakshmi Bumper Money
आज ऋषिपंचमीला सूर्य-मंगळ युती झाली शक्तिशाली! ‘या’ राशींच्या लोकांना बाप्पा व लक्ष्मी देणार धनरूपी प्रसाद
Drink Before Brushing Teeth
सकाळी तोंड न धुता, दात न घासता पाणी प्यावे का? तज्ज्ञ सांगतात करु नका ‘ही’ चूक शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान 
Vitamin D, B12 and iron deficiency
‘या’ जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे तुम्हाला होऊ शकतो संसर्गाचा धोका; कशी घ्यायची आरोग्याची काळजी? डॉक्टर सांगतात….
How_squats_can_help_you_strengthen_legs
स्क्वॅट्समुळे तुमचे पाय कसे होतील मजबूत? कसे करावे स्क्वॅट्स? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला गोड आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होणार नाही. तर डॉ अभिषेक गुप्ता, इमर्जन्सी मेडिसिन्स, रिजन्सी हॉस्पिटल यांनी सांगितलं की, काही लोकांना चॉकलेट खाणं बंद केल्यानंतर सुरुवातीला चॉकलेट खाण्याची इच्छा होणं आणि मूड बदलांचा अनुभव येऊ शकतो. कारण- त्यांच्या शरीरानं चॉकलेटच्या मूड वाढवणाऱ्या संयुगांच्या अभावाशी जुळवून घेण्यास सुरुवात केलेली असते.

हेही वाचा : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

महिनाभर चॉकलेट न खाण्याचे शरीराला काय फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊ या.

महिनाभर चॉकलेट खाणं बंद केल्याचे अनेक फायदे होऊ शकतात.डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार चॉकलेटचं सेवन कमी केल्यानं शरीरातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं. ते पुढे म्हणाले, “चॉकलेट खाणं बंद केल्यानं दात किडण्याचा धोका कमी होऊन दातांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.” तर, सिंघवाल यांनी सांगितलं, “चॉकलेटमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते खाणं टाळल्यानं कॅलरी कमी होतात; ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.”

चॉकलेट खाणे बंद केल्याची लक्षणे

काही लोक पहिल्यांदा चॉकलेट खाणं बंद करतात तेव्हा लगेचच त्यांची चिडचिड होणं किंवा चॉकलेट खाण्याची इच्छा होणं, अशी लक्षणं दिसू शकतात; परंतु ही लक्षणं वेळेनुसार कमी होतात, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. तर सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना मूड बदलणं किंवा डोकेदुखी होणं अशा लक्षणांचाही अनुभव येऊ शकतो, तसेच जर तुम्ही याआधी नियमितपणे चॉकलेट खात असाल, तर तुमच्यामध्ये ही लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसू शकतात. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला चॉकलेटला आरोग्यदायी पर्याय असणारे पदार्थ खाण्यावर भर देणं गरजेचं आहे.

चॉकलेटला आरोग्यदायी पर्यायी पदार्थ कोणते?

आहारतज्ज्ञ सिंघवाल आणि डॉ. गुप्ता यांच्या मते- चॉकलेटला अनेक आरोग्यदायी पर्याय आहेत. उच्च कोको सामग्री (७० टक्क्यांपेक्षा अधिक) असलेल्या डार्क चॉकलेटसारख्या पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता; ज्यामध्ये कमी साखर आणि जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात.

तसेच आंबा, अननस, ब्लॅकबेरी यांसारख्या नैसर्गिक गोड फळांचाही तुम्ही विचार करू शकता.

खजूर आणि नट यांसारख्या आरोग्यदायी घटकांचा वापर करून घरगुती मिठाई सेवन करू शकता.

हेही वाचा : नाश्ता न करणे ठरू शकते कर्करोगाचे कारण ! जाणून घ्या नाश्ता कधी आणि का करावा ?

चॉकलेट खाणे कोणी टाळावे?

डॉ. गुप्ता यांच्या मते, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजार (GERD) किंवा पूर्वी मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी याबाबत सावध असायला हवं. कारण- चॉकलेट्स काही प्रकरणांच्या लक्षणांमध्ये वाढ करू शकतात. तसेच जे कमी साखरेचा आहार घेतात, त्यांनी चॉकलेटच्या सेवनावर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर सिंघवाल यांनी सांगितलं की, चॉकलेट खाल्ल्यानं ज्या लोकांची वैद्यकीय स्थिती बिघडू शकते, जसे की IBS (मलमूत्र विसर्जनाच्या वेळी त्रास होणे) अशा लोकांनी ते खाणं टाळावं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What changes will happen in the body if you do not eat any chocolate for a month nutritionists say jap

First published on: 03-10-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×