scorecardresearch

Premium

कोविड-१९ चा पिरोला व्हेरिएंट नक्की आहे तरी काय? त्यापासून कशा प्रकारे काळजी घ्यायची? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगभरात करोना महामारीने थैमान घातले होते.

pirol varient of covid 19
पिरोला व्हेरिएंटची जगभरात 21 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. (Image Credit-Freepik)

दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगभरात करोना महामारीने थैमान घातले होते. अनेक नागरिकांना या महामारीमध्ये आपला जीव गमवावा लागला होता. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यात भारताचाही समावेश होता. सध्या करोना महामारीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. कोविड-१९ महामारी आपल्यापैकी अनेकांसाठी भूतकाळामधील गोष्ट बनली आहे. हा विषाणू त्याचे स्वरूप
कशा प्रकारे बदलत आहे यावर आरोग्य संस्था आणि शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. BA.2.86 चा एक नवीन व्हेरिएंट; ज्याला पिरोला (Pirola) म्हणून ओळखले जाते. या व्हेरिएंटने जगभरातील आरोग्य संस्थांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जागतिक आरोग्य संघटने (WHO)ने संपूर्ण जगभरामध्ये पिरोला व्हेरिएंटची २१ प्रकरणे नोंदवली आहेत. तथापि, ३० पेक्षा जास्त उत्परिवर्तनांमुळे, त्याचे एक व्हेरिएंट म्हणून निरीक्षण करण्यात आले होते. कारण- ते गंभीर स्पाइक प्रोटीन शरीरात प्रवेश करण्यासाठी मानवी पेशींवरील रिसेप्टर्ससह जोडणारी प्रथिने वर वाहून नेते. आरोग्य संस्था अशा प्रकारच्या रोगांचा प्रसार आणि त्याची तीव्रता यावर या व्हेरिएंटचा परिणाम निर्धारित करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात सध्या कोविड-१९ महामारीची अत्यंत किरकोळ प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि अन्य व्हायरल आजारांप्रमाणेच रुग्ण स्वतःहून बरेदेखील होत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Shortage of urea Chandrapur district
चंद्रपूर : युरियाचा प्रचंड तुटवडा, शेतकरी अडचणीत; रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे…
gold smuggle at airport, passenger arrested for gold smuggling, nagpur airport gold smuggling
नागपूर : विमान प्रवासात दोन कोटींचे सोने लपवण्याची पद्धत पाहून सर्वच थक्क…
justin_trudeau_and_narendra_modi
भारत-कॅनडा यांच्यातील तणावामुळे मसूर डाळ महागणार ? जाणून घ्या…
Kendra tirkon rajyog
३० वर्षांनंतर केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शनिदेवाच्या कृपेने प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता

हेही वाचा : औषधांप्रमाणे फळे आणि भाज्या खाण्याचं प्रमाण डॉक्टरांनी लिहून दिल्यास लठ्ठपणा, मधुमेहाची समस्या कमी होईल?

‘पिरोला’बद्दल जाणून घ्या

हा विषाणू जास्त नाही; पण मोठ्या प्रमाणात स्वतःमध्ये म्युटेशन करून बदल घडवून आणतो. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आरोग्य संस्थांनी पिरोला व्हेरिएंटची काही प्रकरणे नोंदवली आहेत. त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो का आणि त्यामुळे काही गंभीर आजार होऊ शकतो का हे ठरवण्यासाठी सध्या सापडलेली संख्या खूपच कमी आहे, असे आरोग्य संस्थांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील सीडीसी (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल)चे म्हणणे असे आहे की, अनेक देशांमध्ये अत्यंत व्हेरिएंट सापडणे काही प्रमाणात संक्रमण असल्याचे संकेत देतो. हे आतापर्यंतच्या उत्परिवर्तित प्रकारांशी विसंगत आहे; ज्याचा खरोखरच प्रसार झाला नव्हता. मात्र, एकाच ठिकाणी प्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांमध्ये हे आढळले होते.

कोणत्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे?

सध्या जगभरामध्ये पिरोला या व्हेरिएंटची प्रकरणे फारच कमी आढळून आली आहेत. मात्र, गंभीर आजार आणि मृत्यूचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. इंग्लंड देशाने या व्हेरिएंटवर नुकत्याच केलेल्या एका मूल्यांकनात म्हटले आहे की, एक व्यक्ती जर का सामान्य आजाराने आजारी होती; तसेच एका व्यक्तीमध्ये लक्षणे होती आणि एका व्यक्तीमध्ये श्वसनासंबंधीची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. आरोग्य संस्थांनी आपल्या नवीन कोविड-१९ च्या अपडेटमध्ये सांगितले, ”आजवर BA.2.86 संबंधित आढळलेल्या प्रकरणांपैकी WHO ला कोणत्याही मृत्यूबद्दल सांगण्यात आलेले नाही.” याबाबत मागील आठवड्याच्या तुलनेत जगभरातील प्रकरणांमध्ये वाढ दर्शविली गेली आहे. कोविड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी आहे. भारतामध्ये पिरोला या व्हेरिएंटशी संबंधित एकही प्रकरण नोंदवण्यात आलेले नाही. तरी या व्हेरिएंटची लक्षणे कोविड-१९ व्हेरिएंटच्या लक्षणांप्रमाणेच जसे की ताप, सर्दी व खोकल्यासारखीच असण्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतात सध्या कोरोनाच्या प्रकरणांची संख्या कमी आहे. त्यामधील काही प्रकरणे सौम्य असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. भारतात मागील २४ तासांमध्ये या संसर्गासंबंधित फक्त १८ प्रकरणे आढळून आली आहेत; ज्यात सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रामध्ये असून, ती २०० पेक्षा जास्त आहे. देशात सध्या ५०० सक्रिय केसेस आहेत.

मॅक्स हेल्थकेअरचे इंटर्नल मेडिसिनचे डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू म्हणाले यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, ”आम्ही या क्षणी कोविड-१९ ची प्रकरणे पाहत आहोत; असे लोक ज्यांच्यामध्ये फ्लू किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळून येतात. परंतु, आम्ही त्यांची टेस्ट करीत नाही आहोत. कारण- त्यातील बहुतेक जण स्वतःहून बरे होत आहेत. काही जणांना न्यूमोनियामुळे दाखल केले जात आहे; मात्र जेव्हा त्यांची टेस्ट केली जाते तेव्हा त्यांना कोविड-१९ झालेला नसतो.”

हेही वाचा : National Nutrition Week 2023: प्रजननासाठी उपचार घेताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

या व्हेरिएंटपासून आपले संरक्षण कसे करावे?

व्हेरिएंट कोणताही असला तरी काळजी घेण्याचे आणि स्वतःचे संरक्षण करण्याचे उपाय सारखेच असल्याचे डॉक्टर टिकू सांगतात. जे वयोवृद्ध नागरिक आहेत; ज्यांना अन्य काही आजार आहेत. त्यांना गंभीर आजाराचा सर्वाधिक धोका असतो. गर्दीच्या ठिकाणी वारंवार हात धुणे आणि मास्क परिधान केल्यामुळे केवळ कोविड-१९ नव्हे, तर फ्लूसह अन्य श्वसनाच्या आजारांपासूनही संरक्षण मिळण्यास मदत मिळू शकेल.

”जर का एखाद्या व्यक्तीला ताप किंवा श्वसनासंबंधीची काही लक्षणे असतील, तर त्यांनी बाहेर जाणे टाळले पाहिजे. आवश्यक असल्यास त्यांनी बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. ज्यांना गंभीर आजारांचा जास्त धोका आहे, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावला पाहिजे”,असे ते म्हणाले. पुढील काही दिवस हे सणासुदीचे असल्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What covid 19 pirola variant health wearing mask wash hand this things can keep you safe tmb 01

First published on: 04-09-2023 at 15:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×