scorecardresearch

Premium

Mental Health Special: तुमची मुलं इंटरनेटवर ‘हे’ सर्च करतात का?

Mental Health Special: आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीच्या हातात मोबाईल आहे आणि इंटरनेटचा अमर्याद . खऱ्या आणि आभासी अशा हायब्रीड जगात या दोन्ही पिढ्या जगतायेत.

what did children search on internet
इंटरनेटवर काय सर्च होतं? (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तेरा ते एकोणीस ही वर्ष अतिशय नाट्यपूर्ण असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात, मनात, शरीरात, विचारांमध्ये उलथा पालथ करणारी वर्ष. घरातल्या सुरक्षित वातावरणामधून बाहेर पडून जगाचा अनुभव घेण्याचा काळ. त्या बऱ्या वाईट अनुभवांच्या आधारे मतं बनवण्याचा काळ. याच काळात आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीच्या हातात मोबाईल आहे आणि इंटरनेटचा अमर्याद ऍक्सेस. खऱ्या आणि आभासी अशा हायब्रीड जगात या दोन्ही पिढ्या जगतायेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन जगात खूप नव्या गोष्टी त्यांना समजत असतात. ऑनलाईन जगातले अनुभव त्या मानाने मुलांसाठी, पालक आणि शिक्षक सगळ्यांसाठीच नवीन असतात. मुळात पालकांनी त्यांच्या किशोरवयात ऑनलाईन जगाचा कसलाच अनुभव घेतलेला नसल्याने त्यांचा या बाबतीतला अभ्यास कच्चा असतो. त्यामुळे अनेकदा मुलांना जे अनुभव येतायेत त्याचा अर्थ काय लावायचा हा प्रश्न मोठ्यांच्या जगात असतो. उदा. मोठ्यांच्या जगात संपर्कासाठी मोबाईल क्रमांक मागणं ही ‘नॉर्मल’ गोष्ट आहे, पण जेन झी आणि जेन अल्फा मंडळी एकमेकांची इंस्टाग्राम हॅन्डल्स मागतात. कुणीही कुणाचेही मोबाईल नंबर मागतच नाही. संवादाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत आणि मोठ्यांच्या जगाला त्याचा पत्ता नसल्याने संवादात अनेक अडथळे निर्माण होतात.

आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

A discarded bus into a functional canteen for its staff Netizens React On Bengaluru Special Project Viral Video
VIDEO: पर्यावरणाचे संरक्षण! टाकाऊ बसचे साकारले कॅन्टीन; काय असणार सुविधा? एकदा पाहाच
Man chopping huge amount of tomato in minuets Viral video
भाजी चिरण्याची निन्जा टेक्निक; मिनिटांत केले शंभरेक टोमॅटो बारीक! पाहा Video
navi mumbai, a person cheated for rupees 12 lakhs
मोबाईलवर आलेल्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक 
drinking from plastic bottle health issues
आरोग्य जपायचे तर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी नकोच! मात्र असे का? त्याची करणे जाणून घ्या…

या वयात शरीराबरोबर मन बदलत असतं. अनेक अनपेक्षित विचार मनात येत असतात. प्रचंड कुतूहल असतं. मतं आलेली असतात. आपण नक्की लहान आहोत की मोठे हे आजूबाजूच्या मोठ्यांच्या वागण्यातनं समजत नसतं. जाम ‘कन्फ्युजन’ असतं. अशा परिस्थितीत काही वेळा ‘मी कुणालाच आवडत नाही’, ‘माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही’, ‘मला कुणीच समजून घेत नाही’, ‘मी कुणालाच नकोय’, असले विचार मनात यायला लागतात. खरंतर असे विचार मनात यावेत असं काही घडलं असेलच असं नाही. पण तरीही असे विचार मनात येतात आणि त्याचवेळी ऑनलाईन जगात एखाद्या अनोळखी व्यक्तीची ओळख होते. चॅटिंग सुरु होतं. आणि आपल्याला फक्त ‘तीच’ व्यक्ती समजून घेऊ शकते असं काहीतरी वाटायला लागतं आणि गडबड होते. हे असं आणि बरंच काही जेन झी आणि जेन अल्फा पिढीच्या बाबतीत होतं असतं.

आणखी वाचा: इंटरनेटच्या सफरीवर..

वयात येताना जे अगणित प्रश्न पडतात त्यांची उत्तरं देण्याइतपत मोकळेपणा घरात नसेल, शाळेतून उत्तरं मिळतील अशी काही सोय नसेल तर टीन्स अनेकदा ऑनलाईन जगात उत्तरं शोधायला सुरुवात करतात. ही उत्तरं ते चॅट रूम्समध्ये शोधतात, पॉर्न साईट्सवर शोधतात, गुगल करुन समज गैरसमजांच्या आवर्तनात अडकतात. ही शोधाशोध करत असताना जर ते योग्य साईटवर पोचले तर बऱ्यापैकी योग्य माहिती त्यांना मिळू शकते. पण अर्धवट माहिती देणाऱ्या, चुकीची किंवा फिरवलेली माहिती देणाऱ्या साईटवर पोचले तर मात्र प्रश्नांची उत्तरं मिळण्याऐवजी गोंधळात भर पडण्याची, गैरसमजुती रुजण्याची दाट शक्यता आहे. आणि या सगळ्यात दोन अडचणी आहेत. एक, गुगलकडे असलेली सगळी उत्तरं बरोबर असतात हा या पिढीचा समज आणि दुसरं म्हणजे शोधाच्या या प्रवासात टीन्स कुठे जाऊन पोचतील हे सांगता येत नाही. कशा प्रकारच्या साईट्सवर ते त्यांचा शोध घेतील याचा काहीही अंदाज बांधता येऊ शकत नाही. एखादी साईट चुकीची, अर्धवट माहिती देते आहे हेही अनेकदा त्यांच्या लक्षात येत नाही. आणि मिळालेली माहिती योग्यच आहे असं गृहीत धरुन त्यावर मत बनवणं, वर्तन ठरवणं सुरु होतं. हा सगळा प्रकार इतका धोकादायक असतो की टीन्स आपल्याला कुठला मानसिक आजार आहे का याचा शोध वेगवगेळ्या व्यक्तिमत्व चाचण्यांमधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. इथपासून ते आयपील्स परस्पर घेण्यापासून ते सेल्फ मेडिकेशन पर्यंत अनेक गोष्टी टिनेजर्स करतात.

या वयात आपण कोण आहोत, आपला लैंगिक अग्रक्रम काय आहे, आपल्याला काय आवडतं काय नाही, दारू-तंबाखू-सिगारेट-ड्रग का करायचं नाही, ते केलं नाही तर आपण बनणार नाही का, आणि आपल्याला ग्रुपने स्वीकरालं नाही तर काय? या सगळ्याचाच शोध चालू असतो. धाडसी प्रयोग करण्याची तीव्र इच्छा असते. त्यातून मग व्हेपिंग करुन बघण्यापासून ते अगदी BDSM चे प्रयोग आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बरोबर करुन बघण्यापर्यंत आणि डार्क वेबमध्ये आर्थिक व्यवहार करुन पैसा कमावण्यापर्यंत जातो. अशा अनेक गोष्टींचा समावेश मुलांच्या आयुष्यात होतो.

एकप्रकारे त्यांचं बालपण आणि तारुण्य भलत्याच विषयात अडकून पडतं. हे सगळे प्रयोग करत असताना त्याविषयीचे कुतूहल हा जरी मुद्दा असला तरी आपण जे करतोय त्या विषयी योग्य माहिती त्यांच्याकडे असतेच असं नाही. त्यातून गुंतागुंत वाढत जाते. मागच्या एका लेखात टीन्समध्ये न्यूड्स पाठवण्याचे प्रमाण प्रचंड आहे याचा उल्लेख केलेला होता. मुळात स्वतःच्या शरीराबद्दलचे कुतूहल, सतत इंटरनेटवर निरनिराळ्या पद्धतीने हार्ड आणि सॉफ्ट पॉर्न बघून एक प्रकारची तयार झालेली असंवेदनशीलता आणि पिअर प्रेशर असे अनेक मुद्दे न्यूड्स पाठवण्याच्या वर्तनामध्ये सहभागी असतात. हे सगळे अडनिड्या वयाचे प्रश्न आहेत. ते पूर्वीच्या सगळ्याच पिढ्यांना कमी अधिक प्रमाणात होतेच, पण या पिढीत त्यात स्मार्टफोन आणि इंटरनेटने मोठी भर घातली आहे.

या वयात तयार होणारं कुतूहल योग्य पद्धतीने शमणं आवश्यक आहे. जे आत्ता होत नाहीये, पर्यायी अडनेडी वयात तयार होणारं सायबर वर्तन काहीवेळा काळजी करावं असं असतं. आणि ते वर्तन सवयीत बदलण्याची दाट शक्यता असते. त्यातूनच गेमिंग, पॉर्न, ऑनलाईन रमी, गॅम्बलिंगयांच्या व्यसनांना सुरुवात होऊ शकते. हे सगळं आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर त्यांना वेळीच सायबर साक्षर करायला हवं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What did your children search on intetnet hldc psp

First published on: 23-08-2023 at 12:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×