दारू प्यायल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता म्हणजे ‘हँगओव्हर’ अशी साधारण ओळख आहे. पण याच्यासोबत अजून एक परिणाम नजरेआड राहतो – ‘चिंता’. म्हणजे दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाणवणारी अस्वस्थता, घबराट, नकारात्मक विचार आणि मन खट्टू होणे. हे कोणते आजाराचे नाव नाही, तर दारूचा मेंदू आणि शरीरावर होणारा नैसर्गिक परिणाम आहे.

मेंदूवर दारूचा प्रभाव (How alcohol impacts your brain)

दारू थेट मेंदूतील रसायनांवर परिणाम करते. दारू पिताना GABA हा शांतता देणारा रसायनप्रभाव वाढतो आणि सतर्कता देणार्‍या ग्लुटामेटचा प्रभाव कमी होतो, म्हणूनच सुरुवातीला रिलॅक्स वाटते, भीती कमी होते आणि मूड आनंदी होतो. पण हे परिणाम तात्पुरते असतात. दारूचा प्रभाव उतरू लागला की मेंदू पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, Gamma-Amino Butyric Acid.(GABA- शांतता देणारा न्यूरोट्रान्समिटर)कमी होतो आणि ग्लुटामेट(glutamate- उत्तेजक न्यूरोट्रान्समिटर) जास्त होते. त्यामुळे जास्त चिडचिड, असुरक्षितता आणि घाबरण्याची भावना निर्माण होते – हीच पुढे ‘चिंता’.

कोर्टिसोलचा वाढलेला ताण (Alcohol vs cortisol)

दारूमुळे कोर्टिसोल म्हणजेच ताण निर्माण करणारे हार्मोन वाढतो. एकदाही जास्त प्रमाणात दारू घेतली तर दुसर्‍या दिवशी कोर्टिसोल पातळी वाढलेली असू शकते. त्यातून शरीरात तणाव, अस्थिरता आणि चिंतेसारखी लक्षणे दिसतात. त्यातच दारू प्यायल्यावर झोप नीट होत नाही, त्यामुळे मेंदूला स्थिरता मिळत नाही आणि चिंता आणखी तीव्र होते.

रक्तातील साखर घटल्यामुळे वाढणारी घबराट (Watch out for low blood sugar)

दारू यकृतातून सोडल्या जाणाऱ्या ग्लुकोजच्या मार्गात अडथळा निर्माण करते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. शरीर ते भरून काढण्यासाठी अॅड्रेनालिन सोडते आणि धडधड, घाम, कंप, थरथर, चिडचिड अशा लक्षणांमुळे चिंता वाढल्यासारखे वाटते.

आठवणी आणि अपराधीपणाचा प्रभाव (The memory effect)

दारूच्या प्रभावात बोललेली किंवा केलेली कामे दुसर्‍या दिवशी अपराधीपणा, लाज, अस्वस्थता आणि जास्त विचार सुरू होतात. ज्यांना आधीच सोशल अँझायटी किंवा चिंता असते त्यांच्यासाठी ही अवस्था अधिक कठीण ठरते.

कोणांना धोका जास्त? (Who are more vulnerable?)

ज्यांना आधीच चिंता, नैराश्य किंवा पॅनिक डिसऑर्डर आहे, नियमित किंवा जास्त दारू पिणाऱ्यांना, महिलांना, उपाशी पोटी मद्यपान करणार्‍यांना ‘चिंता’चा धोका अधिक असतो.

काय कराल? (What can help?)

चिंता टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दारू कमी करणे किंवा टाळणे. हळू पिणे, पुरेसे पाणी पिणे, पोटात काहीतरी खाणे, मर्यादा ठरवणे उपयोगी ठरते. दुसर्‍या दिवशी झोप पूर्ण घेणे, थोडेसे चालणे, विश्रांती, खोल श्वास आणि पौष्टिक आहार यानेही स्थिती सुधारते. चिंता कमी करण्यासाठी दारूचा आधार घेणे उलट धोकादायक ठरते, कारण दीर्घकाळात ती चिंता वाढवते.

चिंता म्हणजे दारू आणि मानसिक आरोग्य यांचा थेट संबंध दाखवणारे उदाहरण आहे. त्यामुळे स्वतःला समजून घेत, जबाबदारीने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.

(डॉ. राकेश गुप्ता हे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समध्ये अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार आहेत.)