सेक्स या गोष्टीबद्दल आपल्याकडे फारच गोंधळ आहे. सेक्स टॉईजबद्दल उघडपणे बोलले जात नाही. लैंगिक संबंधांदरम्यान सेक्स टॉयचा वापर केला जातो. बर्‍याच लोकांनी सेक्स टॉयबद्दल माहिती ऐकली असावी, पण कधी याचा उपयोग केला नसावा. बहुतांश लोक सेक्स टॉयचा वापर एकटे असताना करतात. पुरुष असो किंवा महिला, प्रत्येकासाठी बाजारामध्ये सेक्स टॉय उपलब्ध असतात. पार्टनरसोबत सेक्स करताना यादरम्यान आनंद वाढवण्यासाठी सेक्स टॉयचा उपयोग केला जातो.

बाजारात अनेक प्रकारचे सेक्स टॉय उपलब्ध आहेत. बरेच सेक्स टॉय मोबाइलप्रमाणे चार्जदेखील करता येतात. खरं तर हे एक उपकरण आहे, जे महिलांची योनी आणि पुरुषांच्या गुप्तांगांचा आकार लक्षात घेऊन बनवले जाते. तुमच्या गरजेनुसार आणि मनाप्रमाणे याचा वापर करता येऊ शकतो. लैंगिक जीवनात काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला जातो. पुरुष असो अथवा महिला, दोघंही सेक्स टॉयचा उपयोग करू शकतात. अनेक लोक आपलं नैराश्य दूर करण्यासाठी सेक्सदरम्यान सेक्स टॉयचा वापर करतात. पण, लैंगिक सुख मिळविण्यासाठी सेक्स टॉय वापरणे आणि त्यावरील नियंत्रण गमावणे हे कधी कधी व्यक्तीच्या चांगलेच अंगाशीही येऊ शकते.

लैंगिक खेळणी लैंगिक आनंद वाढवण्याचा एक मजेदार आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. तथापि, अपघात होऊ शकतात आणि काहीवेळा सेक्स टॉय योनी किंवा गुदाशयात अडकू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, पुढील अस्वस्थता किंवा दुखापत टाळणे. खेळणी जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने फाटणे किंवा चिडचिड होऊ शकते. गुडगाव येथील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या संचालक डॉ. चेतना जैन यांनी सेक्स टॉय गुदाशयात अडकल्यास परिस्थिती काळजीपूर्वक कशी हाताळायची याविषयी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण सविस्तर जाणून घेऊ…

(हे ही वाचा : रोज लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने रक्तातील साखर अन् कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; डाॅक्टरांकडून सेवनाची पध्दत जाणून घ्या )

सेक्स टॉय तुमच्या शरीरात अडकल्यास काय कराल?

१. शांत राहा : घाबरल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि परिस्थितीचे मूल्यांकन करा.

२. जबरदस्ती करू नका : वस्तूला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे टाळा, कारण यामुळे इजा होऊ शकते किंवा ती आणखी आत ढकलली जाऊ शकते.

३. पोझिशन्स बदला : काहीवेळा पोझिशन्स बदलल्याने तुम्हाला मदत होऊ शकते. यासाठी पोझिशन्स बदलण्याचा प्रयत्न करा

४. वैद्यकीय मदत घ्या : जर तुम्ही ती वस्तू काढू शकत नसाल किंवा त्यामुळे वेदना, रक्तस्त्राव किंवा अस्वस्थता येत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. स्त्रीरोगतज्ज्ञाशी संपर्क साधा. वैद्यकीय तज्ज्ञांकडे वस्तू सुरक्षितपणे काढण्यासाठी साधने आणि कौशल्य आहे.

५. लक्षणांचे निरीक्षण करा : तीव्र वेदना, रक्तस्त्राव, ताप किंवा संसर्गाची चिन्हे यांसारख्या कोणत्याही लक्षणांकडे लक्ष द्या आणि यापैकी काही आढळल्यास वैद्यकीय मदत घ्या.

तथापि, तुमच्या शरीरशास्त्रासाठी आरामदायक आणि योग्य असे सेक्स टॉय निवडा. लैंगिक खेळण्यांशी संबंधित जोखमींबद्दल वैद्यकीयतज्ज्ञ वारंवार सावधगिरी बाळगतात. तसेच वापरकर्त्यांनाही ते अशी खेळणी वापरताना काळजीपूर्वक वापराच्या गरजेवर जोर देतात. ते अशा वस्तू खाजगी भागात ठेवण्याचे संभाव्य धोके हायलाइट करतात, ज्यामुळे गंभीर गुंतागूंत होऊ शकते.

वरील लेख हा माहितीसाठी लिहिला आहे, जोखमीची परिस्थिती निर्माण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रास होत असल्यास याचा वापर त्वरित थांबवा.