Fasting: उपवास हा भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि प्राचीन काळापासून तो पाळला जातो. त्यामुळे मानवी शरीराला जशी भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्नाची गरज असते; तसेच या शरीरात दीर्घकाळ भूक सहन करण्याची ताकददेखील असते. अनेक तास आपले शरीर काहीही न खाताही सुदृढ राहू शकते. परंतु, हळूहळू काहीही न खाल्ल्यामुळे गंभीर शारीरिक बदल होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “जेव्हा आपण सलग तीन दिवसांहून अधिक दिवस काहीही खात नाही तेव्हा तुमच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होतात. सुरुवातीला तुमचे शरीर ऊर्जेसाठी साठवलेले ग्लुकोज वापरते. पहिल्या २४ तासांत हे ग्लायकोजेन संपुष्टात येते. मग तुमचे शरीर ग्लुकोनोजेनेसिस सुरू करते आणि अमिनो अॅसिडसारख्या नॉन-कार्बोहायड्रेट स्रोतांपासून ग्लुकोज तयार करते.”

डॉक्टरांनी सांगितले की, दुसऱ्या दिवसापर्यंत तुमच्या शरीरात केटोसिस सुरू होते आणि साठलेल्या चरबीचे विघटन करण्यास सुरुवात करते.

शरीराचे चयापचय कशा प्रकारे जुळवून घेते?

डॉ. रेड्डी यांनी सांगितले, “जसजसे आपल्या उपवासाचे दिवस वाढतात, तसतसे शरीर तुमची चयापचय, इन्सुलिनची पातळी कमी करून आणि नॉरपेनेफ्रिनची पातळी वाढवून अनुकूल होते. त्यामुळे इन्सुलिनमधील कमतरता भरून काढणे, मूत्रपिंडातून जास्तीचे मीठ व पाणी बाहेर टाकण्यासदेखील मदत होते. बहुतेकदा पाणी कमी झाल्यामुळे वजन कमी होते.”

तीन दिवसांमध्ये नॉरपेनेफ्रिनच्या वाढीमुळे तुमची चयापचय प्रक्रिया तात्पुरती वाढू शकते; परंतु शेवटी ऊर्जा वाचवण्यासाठी त्याची गती मंद होईल. कारण- शरीर अन्नाच्या कमतरतेशी जुळवून घेते.

७२ तासांच्या उपवासाचे तोटे आणि फायदे

डॉ. रेड्डी यांच्या मते तीन दिवस कोणतेही अन्न न खाण्याशी संबंधित अनेक फायदे आणि तोटे आहेत.

हेही वाचा: पनीर बनवण्यासाठी दही, लिंबू की व्हिनेगर काय वापरणं योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

उपवासाचे फायदे

१. निरोगी पेशींची निर्मिती

ऑटोफॅजी ही एक सेल्युलर क्लीनअप प्रक्रिया आहे; जी खराब झालेल्या पेशी शरीरातून काढून टाकते आणि नवीन निरोगी पेशी पुन्हा निर्माण करते.

२. वजनात घट

उपवास केल्याने वजन कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीदेखील कमी होण्यास मदत होते.

उपवासाचे तोटे

१.निर्जलीकरणाचा धोका

शरीराला कोणत्याही प्रकारे पाणी न मिळाल्यास निर्जलीकरणाचा धोका संभवतो. तो धोका टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

२. रक्तातील साखरेत घट

उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी या समस्या उदभवतात.

३. निद्रानाश

पोटात अन्न नसल्याने त्याचा परिणाम झोपेवरही पाहायला मिळतो. उपवासामुळे झोप येत नाही. त्यामुळे थकवा, चिडचिडदेखील होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens if you starve for three days in a row read expert advice sap
First published on: 23-06-2024 at 12:07 IST