Cold Water Bath Benefits : हिवाळ्याच्या दिवसात तापमान कमी होत जाते. पुढच्या दोन ते तीन आठवड्यात थंडीत जास्त वाढ झालेली दिसून येईल. अशात निरोगी राहण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. हिवाळ्यात लोक गरम पाण्याने अंघोळ करतात, तर काही जण हिवाळ्याच्या दिवसातही थंड पाण्याने अंघोळ करतात. अंघोळीसाठी तुम्ही कोणता साबण वापरता हे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे पाणी, पाण्याचे तापमान याचाही तब्येतीवर परिणाम होतो. परंतु, थंडीच्या महिन्यात थंड पाण्याने अंघोळ करणे खरोखर सुरक्षित आहे का?

आरोग्यतज्ज्ञ ईशा लाल स्पष्ट करतात की, थंड शॉवरमुळे रक्ताभिसरण सुधारणे, मानसिक सतर्कता आणि शरीरातील जळजळ कमी करणे यासह अनेक फायदे मिळू शकतात. “थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढतो.” त्यांनी असंही सांगितले की, “२०१६ च्या जर्नल ऑफ PLOS ONE मध्ये केलेल्या अभ्यासात, जे लोक थंड पाण्याने अंघोळ करतात त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं, असं समोर आलं आहे

seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
sunlight
हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…

बेंगळुरू येथील व्रुधी स्किन सेंटर अँड सर्जरी क्लिनिकचे सल्लागार आणि मुख्य त्वचाविज्ञानी डॉ. अमृता होसल्ली कर्जोल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. अमृता सांगतात की, थंड पाण्याने अंघोळ केल्याचे बरेच फायदे असले तरीही काही लोकांना याचा त्रास होऊ शकतो. जसे की, ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या आणि हृदयाची समस्या असते अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. “कधी कधी थंड पाण्याच्या शॉवरमुळे हिवाळ्याशी संबंधित त्वचेच्या समस्या, जसे की कोरडेपणा, खाज सुटणे किंवा एक्झिमा आणि सोरायसिससारख्या समस्यांनी परिस्थिती बिघडू शकते. संवेदनशील किंवा आधीच कोरडी त्वचा असलेल्यांनी हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता बिघडू शकते.” थंडीमुळे हायपोथर्मिया होऊ शकतो किंवा श्वसनाच्या समस्या वाढू शकतात, विशेषत: दमा असलेल्यांसाठी.

हेही वाचा >> दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल

हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी पाण्याचे तापमान काय असावे?

आरोग्यतज्ज्ञ ईशा लाल यांच्या मते, बहुतेक लोकांसाठी, कोमट पाणी (सुमारे ३७-४०°C किंवा ९८-१०४°F) हिवाळ्यात आदर्श असते, कारण ते स्नायूंना आराम देण्यासाठी. तुम्हाला रक्ताभिसरण सुधरवायचं असेल तर थंड पाण्याने अंघोळ करा. ईशा लाल यांनी असेही सांगितले की हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते.

Story img Loader