Does Coconut Meat Raise Blood Sugar Levels : तुम्ही शहाळ्यातील पाणी प्यायल्यानंतर त्यातील मलई खाता का? आपल्यापैकी अनेकांना शहाळ्यातील ही मलई खायला आवडते. कोकोनट मीट (Coconut meat) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाळ्याच्या आतील या मऊशार खोबर्‍याची चव अत्यंत गोड असते; पण त्याचा आपल्या रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हेच जाणून घेण्यासाठी उद्योजक करण सरीन यांनी ५० ग्रॅम शहाळ्याच्या मलईचा वापर करून रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो ते तपासले.
सरीन हे रक्तातील साखरेवर भारतीय पदार्थांचा परिणाम मोजण्यासाठी त्यांची चाचणी करतात आणि त्याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात.

करण सरीन यांच्या ग्लुकोज मॉनिटर (CGM) रीडिंगनुसार, शहाळ्यातील मलई खाल्ल्याने दोन तासांनंतर रक्तातील साखरेच्या पातळीत थोडीशी नगण्य वाढ झाली. याउलट शहाळ पाण्यामुळे लक्षणीय वाढ झाली.

“साखरेत वाढ होत नाही. एक स्थिर रेषा आहे, जो एक उत्तम परिणाम आहे,” असे सरीन यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

याबाबत क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

शहाळ्याच्या मलईची पौष्टिक रचना

१०० ग्रॅम शहाळ्याच्या मलईमध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचे अंदाजे प्रमाण खालीलप्रमाणे :
१५ ग्रॅम – कार्बोहायड्रेट्स
९ ग्रॅम – फायबर
३३ ग्रॅम – फॅट्स (प्रामुख्याने सॅच्युरेडेट फॅट्स)
३ ग्रॅम – प्रथिने
कमी ग्लायसेमिक इंडेक्स

गोयल म्हणाले, “उच्च फायबर आणि फॅट्समुळे शहाळ्यातील मलई हे कमी ग्लायसेमिक अन्न ठरते. म्हणजेच ते रक्तातील साखरेच्या पातळीत जलद वाढ करीत नाही.

शहाळ्यातील मलई खाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी का वाढवत नाही?

उच्च फायबर (विशेषतः न विरघळणारे फायबर): कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि शोषण मंदावते, ज्यामुळे रक्तप्रवाहात ग्लुकोज हळूहळू बाहेर पडते.
उच्च फॅट्सयुक्त घटक (MCTs) : शहाळ्यात मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (medium-chain triglycerides) (MCTs) भरपूर असतात, जे चयापचयासाठी इन्सुलिनशिवाय जलद ऊर्जा प्रदान करतात. हे इन्सुलिनची जलद पातळी वाढणे कमी करते, असे गोयल सांगतात

कमी निव्वळ कार्बोहायड्रेट्स (Low net carbs) : एकूण १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपैकी नऊ ग्रॅम फायबर असते. म्हणून निव्वळ पचण्याजोगे कार्बोहायड्रेट्स खूपच कमी असतात (प्रति १०० ग्रॅममध्ये सुमारे सहा ग्रॅम), जे ग्लुकोजची पातळी स्थिर करण्यास मदत करते.

मधुमेहींनी शहाळ्यातील मलई खाल्ल्यास काय होते?

मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधकता (insulin resistance) असलेल्या लोकांसाठी, शहाळ्यातील मलई एक ‘स्मार्ट स्नॅक’ असू शकते:

शरीरावर कार्बोहायड्रेट्सचा भार न टाकता ते तृप्त होण्यास मदत करते.
मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास ते रक्तातील साखरचे पातळी वाढवत नाही.

न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये २०१७ च्या अभ्यासाचा हवाला देत, गोयल यांनी नमूद केले, “उच्च फॅट्सयुक्त घटक (MCTs) समृद्ध आहार (शहाळ्यात आढळणाऱ्या घटकांप्रमाणे) इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकतो आणि वजन कमी करण्यास मदत करू शकतो. दोन्ही बाबी टाईप २ मधुमेहासाठी फायदेशीर आहेत.

पण, किती प्रमाणात सेवन करतो हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण- त्यात सॅच्युरेटेड फॅट्सदेखील जास्त असतात, असेही गोयल सांगतात.

अमेरिकन डायबेटीज असोसिएशनने मधुमेहासाठी अनुकूल स्नॅक्सच्या यादीत गोड नसलेल्या शहाळ्याचा (म्हणजेच शहाळ्यातील मलई) समावेश केला आहे. फक्त ते योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे, असे गोयल स्पष्ट करतात.

कोण सावधगिरी बाळगावी? (Who should be cautious?)

ना उच्च कोलेस्ट्रॉल किंवा गर्भावस्थेतील मधुमेह आहे, त्यांनी सॅच्युरेडेट फॅट्स मर्यादित करण्याची आवश्यकता असू शकते. शहाळ्याच्या गोड पदार्थांचे सेवन टाळा, जे साखरेचे प्रमाण वेगाने वाढवू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोड नसलेल्या स्वरूपातील शहाळ्यातील मलई रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढवत नाही. कारण- त्यात उच्च फायबर आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण असते. ” शहाळ्यातील मलई हे कमी जीआय असलेले अन्न आहे आणि ते मधुमेही, पीसीओएस रुग्ण किंवा त्यांच्या ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणाऱ्या प्रत्येकासाठी संतुलित आहाराचा भाग असू शकते; पण त्याचे मध्यम प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे,” असे गोयल स्पष्ट करतात.