ताजी काकडी, लाल टोमॅटो व गुलाबी कांदे टाकून तयार केलेले सॅलड किंवा कोशिंबीर खायला अनेकांना आवडते. ही कोशिंबीर आपल्या जेवणाची चव वाढवते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुम्ही नियमित कोशिंबीर किंवा सॅलड खात असाल, तर रोज कच्चा कांदा खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो? हे अति प्रमाणात कांद्याचे सेवन करण्यासारखे आहे का? याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला आरोग्य विशेषज्ज्ञांनी माहिती दिली आहे. “कांद्यात सल्फर संयुगे आणि क्वेर्सेटिन भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताणाचा सामना करण्यास मदत करतात, आपल्या पेशींचे संरक्षण करतात आणि दाहकता (सूज येणे किंवा लालसरपणा येणे) कमी करतात. कांद्यामधील सल्फर संयुगे हृदयाचे संरक्षणात्मक गुणधर्म आहेत, रक्तदाब नियंत्रित करतात आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात,” असे होलिस्टिक डाएटिशियन व्रीती श्रीवास्तव (Vriti Srivastav, holistic dietitian) यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा