चहा आणि कॉफी : ही सर्वांची आवडते पेये आहेत. चहा वा कॉफीशिवाय अनेकांची सकाळ सुरूच होत नाही. परंतु, एक मध्यम आकाराचा कप (किंवा दोन कप) चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण शिफारस केलेल्या या दैनंदिन प्रमाणापेक्षा जास्त चहा वा कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होऊ शकतात. तुम्ही चहा किंवा कॉफी जेव्हा जास्त प्रमाणात पिता तेव्हा काय होते ते जाणून घेऊ.

चहा आणि कॉफी या दोन्हींमधील मुख्य घटक असलेले कॅफिन हे मध्यवर्ती मज्जासंस्था उत्तेजित (central nervous system stimulant) करते. हे सुरुवातीला ऊर्जा आणि सतर्कता वाढवते; परंतु या उत्तेजक पेयाचे जास्त प्रमाणातील सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

चिंता आणि अस्वस्थता (Anxiety and nervousness) : हृदयात धडधड आणि अस्वस्थता ही सर्व अतिउत्तेजित मज्जासंस्थेची लक्षणे आहेत. कॅफिनमुळे कॉर्टिसॉल, तणाव संप्रेरक (hormon) शरीरात सोडले जाते; ज्यामुळे चिंता वाढू शकते आणि तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते.

झोपेचा त्रास : कॉफी वा चहा यापैकी कोणतेही पेय तुमच्या झोपणे व उठणे यांच्या चक्रात व्यत्यय आणू शकते; ज्यामुळे झोप लागणे आणि झोपणे अवघड होते. त्यामुळे दिवसभरात थकवा, चिडचिडेपणा येऊन एकाग्रता कमी होऊ शकते.

डोकेदुखी आणि मायग्रेन : कॅफिनमुळे होणारी डोकेदुखी ही चहा-कॉफीचे अतिसेवन करणाऱ्या लोकांची एक सामान्य तक्रार आहे. नियमित सेवनानंतर अचानक कॅफिन कमी केल्यास काही व्यक्तींना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

पाचक समस्या : कॅफिनमुळे पोटाच्या समस्या होऊ शकतात; ज्यामुळे छातीत जळजळ, पित्त उसळणे व अतिसारदेखील होतो.

उच्च रक्तदाब आणि हृदयाची धडधड : काही व्यक्तींमध्ये कॅफिनचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयाची गती तात्पुरती वाढू शकते.

अधिक चहा-कॉफीमुळे मानसिक व भावनिक आरोग्य प्रभावित

नकारात्मक परिणाम : कॅफिनवर जास्त अवलंबून राहिल्याने तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

व्यसनाधीनता आणि अवलंबून राहणे : कॅफिन हे सौम्य व्यसन म्हणून ओळखले जाते आणि नियमित अतिसेवनामुळे तुम्ही त्यावर अवलंबून राहू शकता. जेव्हा तुम्ही सेवन कमी करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला डोकेदुखी, थकवा व चिडचिड यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

तणाव हाताळण्याची क्षमता कमी होणे : एक कप कॉफीमुळे तणावातून तात्पुरती सुटका झाल्यासारखे वाटू शकते. परंतु, दीर्घकाळ कॅफिनचा वापरामुळे तुमच्या शरीराची दीर्घकाळासाठी तणाव हाताळण्याची क्षमता कमी होऊ शकते.

भावनिक नियंत्रण बिघडणे : अतिसेवनामुळे भावनिक प्रतिक्रिया बिघडू शकते; ज्यामुळे तुम्हाला राग, निराशा ही भावना जाणवण्याची अधिक शक्यता असते.

हेही वाचा – तुमच्या तणावाचा आतड्याच्या आरोग्यावर होतो परिणाम? संशोधनाबाबत काय आहे डॉक्टरांचे मत…

याबाबत आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी सहमती दर्शवीत लोकसत्ताला माहिती देताना सांगितले, “चहामधील टॅनिन व कॅफिन हे दोन्ही पदार्थ शरीराचे नुकसान करतात; ज्याला तुम्ही एखादा कप चहा पिता, तर त्याने तुमचे तितकेसे नुकसान होत नाही. पण, एकापेक्षा जास्त कप चहा किंवा कॉफी प्यायलात, तर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. जेवताना चहा किंवा कॉफी प्यायलाने तुमच्या शरीरात लोह कमी प्रमाणात शोषले जाते. मग त्यामुळे ज्यांना (विशेषत: स्त्रियांना) आधीपासून लोहाची कमतरता आहे, त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते.”

पल्लवी सावंत पटवर्धन पुढे सांगतात, “जर तुम्ही व्यायाम करीत असाल, तर तुमच्या व्यायामाचा अवधी वाढविण्यासाठी आणि आंशिक जोमाने व्यायाम करण्यासाठी तुम्हाला कॉफीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अनेक वेळा लोक असे म्हणतात की, चहा वा कॉफी प्यायलो नाही, तर सकाळी पोट साफ होत नाही. अशा लोकांच्या शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा व्यक्तींच्या शरीरात पाण्याचे प्रमाण इतके कमी असते की, सकाळी एखादा द्रव पदार्थ पोटात जात नाही तोपर्यंत त्यांचे पोट साफ होत नाही. त्यामुळे चहा वा कॉफीमुळे तुमचे पोट साफ होते, असे नाही, तर तुम्ही दिवसभरात कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचे पोट साफ होत नाही.”

चहा वा कॉफी सोडण्याऐवजी शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात न पिणे योग्य

तुम्हाला तुमचा आवडता चहा किंवा कॉफी पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे संयम राखा. प्रौढांसाठी शिफारस केलेले कॅफिनचे दैनिक सेवन ४००एमजी इतके आहे साधारणपणे हे प्रमाण चार कप कॉफीच्या समतुल्य आहे. तरीही प्रत्येक व्यक्तीची संवेदनशीलता वेगळी असू शकते आणि काही लोकांना कॉफीच्या कमी प्रमाणातील सेवनामुळेही नकारात्मक परिणाम जाणवू शकतात.

हेही वाचा – मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे

चहा-कॉफी पिण्यावरील नियंत्रणासाठी संयम आवश्यक

तुमच्या किती प्रमाणात चहा-कॉफी पीत आहात याकडे लक्ष द्या. तुम्ही दररोज किती चहा किंवा कॉफी पिता याची नोंद ठेवा. त्यामुळे तुमच्या सवयींबद्दल अधिक जागरूक होता येईल आणि चहा-कॉफीचे सेवन कुठे टाळता येईल ते लक्षात येईल.

डिकॅफिनचा पर्याय : डी-कॅफिन(कॅफिनचे प्रमाण कमी असलेले) पर्याय निवडा किंवा तुमच्या नियमित पेयामध्ये कॅफिनचे प्रमाण हळूहळू कमी करा.

चहा-कॉफीऐवजी पर्यायी पेय :ग्रीन टीसारख्या नैसर्गिक ऊर्जा वाढविणाऱ्या पर्यायांचा विचार करा.

भरपूर प्रमाणात पाणी : दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने कॅफिनमुळे कमी होणारी पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

झोपेला प्राधान्य : तणावाचे नियंत्रण करण्यासाठी आणि कॅफिनचा शरीराला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

लक्षात ठेवा, फक्त स्वत:वर नियंत्रण ठेवा; पण चहा किंवा कॉफीचा आनंद घ्यायला विसरू नका. आपल्या शरीराची गरज ओळखा आणि संयम राखा. तुम्ही आरोग्यासह तडजोड न करता, या पेयांचे फायदे घेऊ शकता.

त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला एक-दोन कपांपेक्षा जास्त चहा-कॉफी घेण्याची इच्छा होईल तेव्हा थोडा वेळ थांबा आणि तुमच्या शरीराच्या गरजा विचारात घ्या. विचार न करता, चहा-कॉफी घेण्यापेक्षा सजग राहा आणि त्याचा आनंद घ्या.