pineapple water every morning: आपल्यापैकी अनेक जणांना अननस मोठ्या प्रमाणात आवडतो. चवीला गोड-आंबट असणारे हे फळ शरीराकरिता मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. पण, तुम्हाला माहितीये का एक वर्षभर दररोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात.. एक वर्षभर रोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारणे, वजन कमी होणे, तसेच तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यावर डॉक्टरांनी अभ्यास केला आणि त्यात काय समोर आले आपण जाणून घेऊयात.

व्हायरल पोस्टमध्ये नमूद केले आहे की, अननसाचे पाणी नैसर्गिक डिटॉक्स म्हणूनदेखील कार्य करते, जळजळ कमी करते, थायरॉईड कमी करण्यासाठी मदत करते आणि कर्करोगाचा धोका कमी करते. यावर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी “द इंडियन एक्स्प्रेस”शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महिनाभर दररोज अननसाचे पाणी प्यायल्याने तुमच्या एकूण आरोग्यासाठी उल्लेखनीय फायदे मिळू शकतात. शर्मा म्हणाल्या, “अननस पचन सुधारण्यास मदत करते आणि सूज कमी करते.” शर्मा यांच्या मते, अननस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते. शिवाय, अननसाच्या पाण्यात असलेले ब्रोमेलेन निरोगी आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

याव्यतिरिक्त अननसाच्या पाण्याचे दाहकविरोधी गुणधर्म संपूर्ण शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात, सांधेदुखी आणि सूज कमी करतात. शर्मा यांनी नमूद केले की, अननसमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते. अननसात भरपूर फायबर असते, जे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देते; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करणे. खरं तर अननसाच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि वजनदेखील नियंत्रणात राहते.

अनेकदा उलट्यांची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत अननसाच्या सेवनाने आराम मिळू शकतो. यामध्ये असलेले गुणधर्म मोशन सिकनेस दूर करतात आणि शरीर निरोगी ठेवतात. बर्‍याच वेळा लोकांना पोटात जंत होण्याची समस्या असते, अननसाचा आहारात समावेश करून तुम्ही पोटातील जंतांपासूनही सुटका मिळवू शकता.

हेही वाचा >> Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या

अननसाचे पाणी प्यायल्याने दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच, थायरॉइड असणाऱ्यांनाही हे फायदेशीर आहे. शिवाय, अननसातील अँटिऑक्सिडंट पेशींचे नुकसान होण्यापासून आणि काही प्रमाणात कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. दरम्यान, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की अननसाचे पाणी असंख्य आरोग्य फायदे देते, परंतु यासोबतच संतुलित आहार आणि जीवनशैली योग्य असणे गरजेचे आहे.