scorecardresearch

वजन करण्यासाठी High Protein घेतल्याने तुमची किडनी निकामी होऊ शकते; दिवसाला किती प्रोटीन घ्यावे? जाणून घ्या

अनेक वेळा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत काही लोक अशी चूक करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या इतर भागांवर त्याचा वाईट परिणाम होतो. अशीच एक चूक म्हणजे उच्च प्रथिनांचे सेवन करणे. यामुळे तुमची किडनी खराब होण्याची देखील शक्यता असते.

high protein causes kidney failure
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. भारतातील बहुतेक लोक त्यांच्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करून उच्च प्रथिनेयुक्त आहार घेत आहेत. पण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्याने त्यांची किडनी खराब होऊ शकते. ज्यांना आधीच किडनी संबधित आजार आहे त्यांच्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार अधिक धोकादायक ठरू शकतो. याबद्दल आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया…

दररोज किती प्रोटीन घेतले पाहिजे

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्स मधील किडनी रोगाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. तरुण कुमार साहा, त्यांच्या एका लेखात प्रोटीनशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीने दररोज ०.८३ ग्रॅम प्रति किलो प्रोटीनचे सेवन केले पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीराच्या एक किलो वजनावर एवढीच प्रथिने घेतली पाहिजेत. उच्च प्रथिनांमध्ये, लोक प्रति किलो १.५ ग्रॅम प्रथिने घेतात. वजन कमी करण्यासाठी, बहुतेक लोक उच्च-प्रथिनेयुक्त आहार घेतात, ज्याला अनेक पोषणतज्ञ योग्य मानतात, परंतु आता हे समोर आले आहे की त्याचा किडनीवर नकारात्मक परिणाम होत आहे.

उच्च प्रथिने किडनीसाठी धोकादायक का आहेत?

डॉ. तरुण पुढे सांगतात की ज्या लोकांना आधीच किडनीचा काही आजार आहे, जर ते वजन कमी करण्यासाठी जास्त प्रथिने घेत असतील तर त्यांच्या किडनीला जास्त धोका असतो. त्यामुळे शरीरात अॅसिड जास्त प्रमाणात तयार होऊ लागते आणि किडनी ते पूर्णपणे फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे हे ऍसिड शरीराच्या बाहेर पडत नाही आणि शरीरात जमा होऊ लागतो. त्यांनी सांगितले की, वनस्पतींपासून मिळणारे प्रथिने हे प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांपेक्षा जास्त धोकादायक असतात. त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो. याचे कारण असे की प्राण्यांच्या प्रथिनांमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते.

( हे ही वाचा: हिरवी किंवा काळी नाही तर लाल द्राक्षे खा; नसांमध्ये जमलेले खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होईल)

जिममध्ये जाणारे बहुतेक लोक, हाय सप्लीमेंट हा त्यांच्या आहाराचा एक भाग आहे. त्यांनी याचे मर्यादेतच सेवन करावे. जिममध्ये जाणारे लोक स्नायू वाढवण्यासाठी उच्च प्रथिनांचा वापर करतात, परंतु त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. याचे सेवन केल्याने लघवीतून बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि किडनीवरचा भार वाढतो. किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका असतो. म्हणून, जर तुम्ही प्रथिने घेत असाल, तर दररोज फक्त २५-५० ग्रॅम घ्या.

तुमची किडनी अशा प्रकारे निरोगी बनवा

जर तुम्हाला तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही दररोज १.५ ग्रॅम प्रति किलो प्रोटीनपेक्षा जास्त सेवन करू नये. लक्षात ठेवा की ही प्रथिने नैसर्गिक स्रोतातून घेतली जात आहेत. जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आहार शक्यतो टाळा. भरपूर ताज्या भाज्या आणि फळे खा. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी आणि इतर द्रवपदार्थ घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 11:46 IST