Idiot Syndrome Symptoms And Preventions : प्रश्न कोणताही असो; पण त्याच्या उत्तरासाठी आपण लगेच गूगल करतो. कारण- अजिबात डोके न वापरता, अगदी अवघ्या काही सेकंदांत उत्तर मिळले. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे इंटरनेटवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे गूगलच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते, त्यावर आपण कसलाही विचार न करता, आंधळेपणाने विश्वास ठेवतो. अनेक जण मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांवरही गुगलवरून माहिती घेत, ती खरी मानून त्यानुसार उपचार सुरू करतात किंवा सुरू असलेले उपचार थांबवतात. जर तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुम्ही इडियट आहात. होय, तुम्ही इडियट आहात… अनेकांना हा आपला अपमान वाटू शकतो; पण हा अपमानजनक शब्द नाही, तर तो एक आजार आहे. ‘इडियट सिंड्रोम’ असे या आजाराचे नाव आहे. पण हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणे काय आणि त्यावर कोणते उपाय आहेत का? सविस्तर जाणून घेऊ…

इडियट सिंड्रोम म्हणजे काय?

इडियट सिंड्रोम ही अशी वैद्यकीय स्थिती आहे; ज्यामध्ये एखादी व्यक्ती आरोग्याशी संबंधित माहितीसाठी डॉक्टरांपेक्षा इंटरनेटवर अधिक विश्वास ठेवते. अशा व्यक्ती त्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर पूर्णपणे अवलंबून राहतात, याच बाबीला ‘इडियट सिंड्रोम’, असे म्हणतात. मात्र, यातील इडियटचा अर्थ जरा वेगळा आहे; ज्याला डिराइव्ड इन्फॉर्मेशन ऑब्स्ट्रक्शन ट्रीटमेंट (Internet Derived Information Obstruction Treatment) असे म्हणतात. सध्याच्या काळात अनेक लोक त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे अनेक वेळा एखादी व्यक्ती डॉक्टरांचे सुरू असलेले उपचार थांबवत, इंटरनेटवरून त्या आजाराबाबत चुकीची माहिती घेते आणि त्यानुसार उपचार सुरू करते; जे काही वेळा घातक ठरू शकते. अशा लोकांचा इंटरनेटवरील वैद्यकीय माहितीवर अधिक विश्वास असतो.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने (WHO) या परिस्थितीला ‘इन्फोडेमिक’, असे म्हटले आहे; ज्यामुळे आरोग्य सेवेमध्ये एक जटिल परिस्थिती निर्माण झाली आहे.

PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आयडीओटी सिंड्रोम हा आजार इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आजारांविषयीच्या जास्तीच्या माहितीचा परिणाम आहे; ज्यामुळे लोकांच्या मनात आरोग्य तज्ज्ञांबाबत अविश्वास निर्माण झाला आहे.

इडियट सिंड्रोम किंवा सायबरकॉन्ड्रिया हा इंटरनेटशी संबंधित फोबिया आहे; जो ऑनलाइन आरोग्य माहितीच्या वापरामुळे होतो. त्यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट आजाराबाबत अतिशय किंवा अवास्तव भयभीत असते.

‘इडियट सिंड्रोम’ची लक्षणे काय आहेत?

१) यामध्ये व्यक्ती एखाद्या आजाराविषयीची माहिती शोधण्यासाठी इंटरनेटवर जास्त वेळ घालवते.

२) आजाराची इंटरनेटवरील माहिती खरी मानत ते त्यासंबंधित तज्ज्ञ डॉक्टरांवर कमी विश्वास ठेवू लागतात.

३) आजाराची माहिती मिळाल्यानंतरही तो त्या पद्धतीने उपचार करून बरा झाला नाही, तर व्यक्ती तो आजार मानू लागतो.

४) इंटरनेटवर आजाराबद्दल वेगळी माहिती मिळाल्यावर व्यक्ती चिंताग्रस्त होऊ लागते आणि नैराश्यात जाते.

५) चुकीच्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाल्यासारखे वाटू लागते.

‘इडियट सिंड्रोम’बाबत तज्ज्ञांचे काय मत आहे?

‘इडियट सिंड्रोम’वर अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते, कोणत्याही आजाराचे निदान, उपचार पद्धती इंटरनेटवर कुठे आणि कशी शोधायची याविषयी शिक्षण देण्याची मागणी वाढत आहे.

या अहवालात असे म्हटले आहे की, ‘इडियट सिंड्रोम’मुळे रुग्णांच्या डॉक्टरांकडून अपेक्षा वाढत आहेत. परिणामी डॉक्टर आणि परिचारिकांवर त्याचा ताण येत आहे.

‘इडियट सिंड्रोम’पासून दूर राहण्यासाठी काय करावे?

१) कोणत्याही आजाराविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर कमी विश्वास ठेवा.

२) इंटनेटवरून मिळविलेल्या माहितीच्या आधारे, आजारावर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३) कोणत्याही आजारावर परस्पर इंटरनेटच्या माहितीच्या आधारे उपचार करू नका.

४) ऑनलाइन वाचलेल्या माहितीवर प्रश्न विचारा. चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त होण्यापूर्वी वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५) आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवा.

६) कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.