scorecardresearch

Premium

Health Special: आर्थरायटिस आणि वेदना

Health Special: आर्थरायटिस हा आजार सर्वपरिचित आहे, मात्र याची संपूर्ण माहिती लोकांमध्ये अजूनही नाही. आर्थरायटिस आणि वेदना यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.

arthistis pain
आर्थरायटिस आणि वेदना (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सप्टेंबर महिना हा पेन अवरेनेस मंथ आहे. याच महिन्यात झालेल्या वर्ल्ड फिजिओथेरपी डेची (जागतिक भौतिकपचार दिन) यावर्षीच थीम आर्थरायटिस आहे. आर्थरायटिस हा आजार सर्वपरिचित आहे, मात्र याची संपूर्ण माहिती लोकांमध्ये अजूनही नाही. आर्थरायटिस आणि वेदना यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आर्थरायटिससंदर्भात काही तथ्यं नमूद केली आहेत. 2019 मधे 528 दशलक्ष लोक osteoarthritis ने ग्रस्त होते, हे प्रमाण 1990 च्या संख्येपेक्षा 113% अधिक आहे. गुडघ्याच्या आर्थरायटिस च प्रमाण सर्वाधिक आहे (365 दशलक्ष)


येत्या काही वर्षात माणसाची आयुमर्यादा वाढल्यमुळे, तसच स्थूलतेचं प्रमाण वाढल्यामुळे osteoarthritis ची टक्केवारी जगभरात वाढणार आहे
या अनुषंगाने एकंदरीत आर्थरायटिस आणि त्यामधे होणार्‍या वेदना याबद्दल जाणून घेणं आपली क्वालिटी ऑफ लाइफ निश्चितपणे वाढवणार आहे. योग्य महितीमुळे आर्थरायटिस रुग्णांना उपचारांशी आणि इतरांना आर्थरायटिसच्या प्रतिबंधात्मक उपचारांशी ओळख करून घेता येणार आहे. यामुळे आर्थरायटिसमुळे समाजावर आलेला शारीरिक, आर्थिक आणि भावनिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

Symptoms of Depression
Depression Symptoms : तुमचा जोडीदार डिप्रेशनमध्ये आहे का? कसे ओळखाल? जाणून घ्या ही लक्षणे….
Viral of Dhol Vadak
”लग्नासाठी मुलगी पाहिजे पण आई…” ढोलवादकाने हटके स्टाइलमध्ये घातली लग्नाची मागणी, अट एकच; VIDEO तुफान व्हायरल
a advertisement of ceiling fans company
शंभर पंख्यांचा वापर करून साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
parineeti-chopra
लग्नामध्ये ‘या’ डिझायनरच्या लेहंग्यामुळे खुलणार परिणीती चोप्राचं सौंदर्य; कपड्यापासून दागिन्यांपर्यंतची माहिती समोर

आणखी वाचा: Health Special: वेदना आपल्या संरक्षणासाठी असते, म्हणजे काय?


आर्थरायटिस हा सांध्याशी निगडीत आजार आहे. यात सांध्याला सूज येणं, सांधे दुखणं, सांधे स्टीफ होणं, यासारखी लक्षणं जाणवतात, कधी कधी सांध्यातून कटकट आवाज येतो. आर्थरायटिसचेचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. डिजनरेटिव आर्थरायटिस आणि इन्फलमेटरी आर्थरायटिस. आधी आपण डिजनरेटिव म्हणजेच वयानुरूप होणार्‍या आर्थरायटिसबद्दल जाणून घेऊया.


डिजनरेटिव आर्थरायटिस हा वयानुसार सांध्यामध्ये होणार्‍या बदलांमुळे होतो. साहजिकच हा शरीराच्या वजन पेलणार्‍या सांध्यामध्ये होतो. (उदाहरणार्थ गुडघा, खुब्याचा सांधा). डिजनरेटिव आर्थरायटिसला Osteoarthritis असं संबोधलं जातं.

आणखी वाचा: Health special: तुम्हाला होणाऱ्या वेदनेची तीव्रता कशावर ठरते?


Osteoarthritis म्हणजे काय?
जगभरात सगळ्यात जास्त आढळणारा Osteoarthritis चा प्रकार म्हणजे गुडघ्याचा osteoarthritis (Knee Osteoarthritis) आपण त्याबद्दल समजून घेऊया. सांधा दोन हाडं (मांडीचं हाड आणि पोटरी च हाड) आणि त्यांच्यावर असलेलं आवरण म्हणजेच कार्टीलेज याने तयार होतो. कार्टीलेज हा एक प्रकारचा कनेक्टिव टिशू आहे, थोडक्यात एक संरक्षक आवरण आहे. ज्यामुळे दोन हाडं एकमेकांवर सुरळीतपणे (घर्षण) न होता फिरू शकतात किंवा ग्लाइड होतात. हांडाच्या एकमेकांवर ग्लाइड होण्यामुळे आपल्या रोजच्या हालचाली सहज शक्य होतात.
पायर्‍या चढणं, उतरणं, चालणं, उकिडवं बसणं, खाली बसून उभं राहणं अशा हालचाली हाडांच्या स्मूथ (घर्षण विरहित) होणार्‍या ग्लायडिंगमुळे शक्य होतात. कार्टीलेज बरोबर अजून एक घटक जो या हालचाली सुलभ करतो तो म्हणजे सायनोवियल फ्लूईड. हे एक अशा प्रकारच द्रव्य आहे जे सांध्या मधे वंगण म्हणून काम करत. कार्टीलेज मधे कोनड्रोसाइट नावाचा एक घटक असतो. या घटकाचं मुख्य काम कार्टीलेज ची झालेली झीज भरून काढणं आणि नवीन कार्टीलेज तयार करणं हे आहे. निरोगी गुडघ्यामध्ये हे कोनड्रोसाइट आपलं काम अव्याहतपणे आणि प्रामाणिकपणे करतात. पण खाली दिलेल्या एका किंवा अनेक कारणांमुळे या कोनड्रोसाइटस च्या कामात अडथळा येतो, त्यामुळे कार्टीलेज ची झालेली झीज भरून निघत नाही आणि नवीन कार्टीलेज तयार होण्याची प्रक्रिया देखील मंदावते.

वय, स्थूलत्व, सांध्याचा अतिवापर, पोषण मूल्यांची कमतरता, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, क्वचितप्रसंगी सांध्याला झालेली इजा या कारणांनी कोनड्रोसाइटसचं काम तितक्या प्रभावी पणे होत नाही. झालेली झीज भरून न निघल्यामुळे आणि नवीन कार्टीलेज निर्मिती न झाल्यामुळे हळूहळू कार्टीलेज मऊ पडतं, त्यातली लवचिकता कमी होते आणि ते विरून जायला सुरुवात होते. हाडांचा पृष्ठभाग उघडा पडतो. रोजच्या आयुष्यातील हालचाली करताना हे हाडांचे पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात आणि त्यामुळे वेदना होतात.

क्रमश:

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the relation between arthritis and pain hldc psp

First published on: 26-09-2023 at 18:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×