scorecardresearch

Premium

Health Special: हृदयाच्या आरोग्यासाठी काय आहार असावा?

Health Special: तुमच्या शेजारी कोणी धूम्रपान करत असेल तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये त्यांचा संचार होऊन तुमची हृदयाची कार्यक्षमता २% इतकी दर आठवड्याला कमी होऊ शकते.

diet for healthy heart
हृदयाच्या आरोग्यासाठी काय करावं? (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

या आठवड्यात जागतिक हृदय दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण हृदयाच्या आरोग्याविषयी जाणून घेणार आहोत. आपला दैनंदिन आहार आणि हृदयाचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे . समतोल आहाराचे पथ्य पाळताना हृदयाच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घेता येईल हे जाणणे आवश्यक आहे. शरीराला मिळणारी विश्रांती , योग्य स्निग्ध पदार्थांचे पूरक प्रमाण ,शरीराला मिळणारी विश्रांती यांचा रक्ताभिसरण क्रिया विनासायास पार पाडण्यासाठी उपयोग होतो.

हृदयविकाराचे धोके कसे ओळखावेत?
खूप थकवा येणे
हृदयाचे ठोके अचानक वाढणे
लठ्ठपणा / स्थूल शरीरयष्टी
उच्च रक्तदाब असणे
कुटुंबामध्ये आई किंवा वडील याना किंवा त्यांच्या थेट परिवारामध्ये हृदयरोग असणे
मधुमेह असणे
मानसिक आरोग्य बिघडणे
वजन कमी करण्यासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला न घेता औषधे घेणे.
व्यायाम न करणे
शरीरातील फॅट्स /कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे
योग्य प्रमाणात झोप न येणे
अति ताण असणे

Gold-Silver Price
Gold-Silver Price on 7 October 2023: सोन्या-चांदीच्या किमतीत जोरदार उसळी, भाव पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Daily Horoscope 7 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या कामातून होणार फायदा, पाहा १२ राशींचे भविष्य
khajoor laddu recipe
३० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजुराचे लाडू, सोपी रेसिपी लगेच नोट करा
Tenant defrauded landlord of Rs 15 lakhs
भाडेकरुच्या निष्काळजीपणामुळे घरमालकाचे १५ लाखांचे नुकसान, प्रकरण वाचून घर भाड्याने देताना शंभर वेळा विचार कराल

हृदय रोगांपासून दूर राहण्यासाठी गेली अनेक वर्ष आहारशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रयोग आणि संशोधन होत आहे मेडिटेरिनिअन आहार , हाय फायबर आहार , लो फॅट/ नो फॅट आहार यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहार पद्धतींवर अनेक वर्ष संशोधन होत आले आहे.

आणखी वाचा: Health Special: हृदयरोग आणि मनाचा काय संबंध असतो?

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमची जीवनशैली , शरीरयष्टी आणि तुमच्या दिवसभरातील खाण्याचे प्रमाण !
विशेषतः आजच्या जगात बराच वेळ मोबाईल पाहत राहण्यात १ ते २ तास कधी कधी त्याहून जास्त वेळ देखील माणसं फक्त बसून असतात आणि यात लहानांपासून थोरांपर्यंत सगळे वयोगट समाविष्ट आहेत. यामुळे स्थूल होत जाणारे शरीर आणि येणारी सुस्ती हे दोन्ही हानिकारक आहेत.

वाढलेलं वजन उच्च रक्तदाब मधुमेह किंवा वाढलेली अतिरिक्त चरबी यांचे प्रमाण तुमच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदयाच्या आरोग्यावर होते. अनेकदा हृदयरोगाची सुरुवात ही लठ्ठपणाने होते आणि त्यानंतर शिस्तीचा येणार कंटाळा किंवा वजनामुळे येणारं नैराश्य या दोन्ही गोष्टी हृदयाच्या आरोग्यासाठी घटक ठरतात. हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि हे सगळे होत असताना पोषणमूल्यांचा देखील ऱ्हास होऊ लागतो . गेली अनेक वर्षे अनेक तज्ज्ञ् पोषणमूल्यांचा कमतरतेवर विशेष भर देतात कारण पोषणमूल्यांचा ऱ्हास हृदयरोगाला आमंत्रण देऊ शकतो.

आणखी वाचा: रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी किती तासांची झोप घ्यावी?

गेल्याच महिन्यात एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये २४ वर्षाच्या तरुणाचा ह्रदयरोगाने मृत्यू झाल्याची घटना घडली. मानसिक ताण आणि विस्कटलेल्या जीवनशैलीला हा तरुण बळी पडला होता. जीवनशैलीचा विचार करताना योग्य वेळी न जेवणे , अपुरी झोप, दारू पिणे , धूम्रपान करणे यांचा शरीरावर परिणाम होत असतो. धूम्रपान करताना म्हणजेच सिगारेट किंवा बिडी ओढताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्हीचे दुष्परिणाम होतात. म्हणजे तुमचा मित्र किंवा तुमच्या शेजारी कोणी धूम्रपान करत असेल तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये त्यांचा संचार होऊन तुमची हृदयाची कार्यक्षमता २% इतकी दर आठवड्याला कमी होऊ शकते.

दारू पिताना अतिरेकी दारू सेवनामुळे शरीरातील मुख्य पोषणघटकांचे विघटन होताच नाही. हृदयाला क्षणाक्षणाने निकामी करणाऱ्या या सवयींपासून शक्य तितके अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे.

(क्रमशः )

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What should be diet for healthy heart hldc psp

First published on: 25-09-2023 at 15:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×