what should be the level of uric acid in men On going above this severe symptoms start appearing in the body | Loksatta

पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची पातळी किती असावी? पातळी ओलांडल्यास शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

यूरिक ॲसिड वाढल्यामुळे संधिरोग, सांधेदुखी, किडनी स्टोन आणि लघवीशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात

uric acid normal range for male
युरिक ॲसिडची समस्या महिला आणि पुरुष दोघांमध्ये उद्भवू शकते. (Photo : Freepik)

युरिक ॲसिडच्या समस्येकडे अनेकदा महिलांची समस्या म्हणून पाहिलं जातं. मात्र ती समस्या त्या प्रकारची नाही. कारण युरिक ॲसिडची समस्या महिला आणि पुरुष कोणालाही होऊ शकते. आज आपण पुरुषांमधील युरिक ॲसिड वाढण्याच्या समस्येबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. युरिक ॲसिड हे एक प्रकारचे टाकाऊ पदार्थ आहे जे प्युरीन असलेल्या पदार्थांमधून बाहेर पडते.

तर युरिक ॲसिड तयार झाल्यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होते, ज्यामुळे हाइपरयुरिसीमिया (hyperuricemia) नावाची स्थिती उद्भवते. पुरुषांमध्ये ही स्थिती त्यावेळी उद्भवते जेव्हा युरिक ॲसिडची पातळी शरीरात वाढते. अशा स्थितीत सांधे दुखणे, हाडे लाल होणे अशी अनेक गंभीर लक्षणे दिसतात. त्यामुळे पुरुषांच्या शरीरात युरिक ॲसिड किती असायला हवं त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

हेही वाचा- शरीरात लोह कमी झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणं; पाहा वयानुसार तुम्हाला किती लोह गरजेचं आहे

पुरुषांमध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण किती असावे –

पुरुषांमध्ये युरिक ॲसिड 3.4-7.0 mg/dL पर्यंत असायला हवे. जेव्हा यूरिक अॅसिडची पातळी 7mg/DL वर वाढते तेव्हा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत हे युरिक ॲसिड शरीरात जमा झाल्यामुळे संधिरोगाची समस्या निर्माण होऊ शकते. पुरुषांमध्ये यूरिक ॲसिड वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, जास्त प्रमाणात प्युरीनयुक्त पदार्थ खाल्याने होऊ शकते. याशिवाय लघवी थांबवणे आणि जास्त दारू पिणे यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

पुरुषांमध्ये यूरिक ॲसिड वाढण्याचे कारणे –

हेही वाचा- चिकन किंवा वांगी खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास शरीरावर पांढरे डाग पडतात का? जाणून घ्या

पुरुषांमध्ये यूरिक ऍसिड वाढण्याची लक्षणे –

पुरुषांमध्ये यूरिक ॲसिड वाढल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये संधिरोग, सांधेदुखी, किडनी स्टोन आणि लघवीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे असा त्रास जाणवायला लागल्यावर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटायला हवं आणि त्यावर योग्य तो उपचार करणं गरजेचं आहे. शिवाय या समस्येचा त्रास उद्भवला तर तुम्ही जास्त पाणी पिऊ शकता तसंच या परिस्थित दारू पिऊ नये आणि जास्त प्युरीन असलेले पदार्थ खाणेही टाळायला हवं. शिवाय आहारात हेल्दी आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.

(टीप: वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित असून गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:54 IST
Next Story
दात घासण्याआधी करा हे एक काम; केसाचे स्प्लिट एंड्स आणि त्वचेचा ड्रायनस होईल गायब