scorecardresearch

Premium

वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

जन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करताना काही लोकांना वारंवार आपले वजन सध्या किती आहे, हे तपासण्याची खूप उत्सुकता असते. पण, अशा लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, वजन तपासण्याचीसुद्धा एक ठरावीक वेळ असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे.

When is a right time to check weight
वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… (Photo : Loksatta)

When is a right time to check weight : वजनवाढ ही खूप मोठी समस्या आहे. चुकीची जीवनशैली अनेकदा वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात; पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करताना काही लोकांना वारंवार आपले वजन सध्या किती आहे, हे तपासण्याची खूप उत्सुकता असते. पण, अशा लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, वजन तपासण्याचीसुद्धा एक ठरावीक वेळ असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘Know Your Body’ या मालिकेत वजन तपासण्याचा योग्य मार्ग आणि वेळ याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी उपाशीपोटी वजन तपासणे केव्हाही चांगले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना फूड थेरपिस्ट डॉ. रिया बॅनर्जी सांगतात, “सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतर पाणी, औषध, चहा, असे काहीही न घेता, जर तुम्ही वजन तपासत असाल, तर ते तुमचे योग्य वजन असते.”

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
are you trying for weight loss try right way to eat food mini meals can help in portion control
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत….
How To Control Diabetes Sugar level Blood sugar control made easy
Blood sugar control: रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम…शुगर राहील नियंत्रणात
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

पुढे डॉ. रिया सांगतात, “सकाळचे वजन किती असणार हे प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असते, हे समजून घेणेही गरजेचे आहे. जे लोक दररोज ४५ मिनिटे ते एक तास व्यायाम करतात, त्यांचे वजन संध्याकाळी थोडे जास्त असते. कारण- त्यांच्या वजनामध्ये जेवण आणि पाण्याचा समावेश असतो; पण जे क्रीडापटू शारीरिकदृषट्या नेहमी सक्रिय असतात, त्यांचे वजन संध्याकाळी कमी असते. त्यामुळे खरे वजन नेमके किती, हे फक्त सकाळी जाणून घेता येऊ शकते.

हेही वाचा : उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज दोन कप कॉफी प्यावी की ग्रीन टी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात …

कितीदा वजन तपासावे?

“वजन तपासण्याची योग्य वेळ ही सकाळी असली तरी नियमित वजन तपासण्याची आवश्यकता नाही”, असे डॉ. रिया सांगतात.

डॉ. रिया पुढे सांगतात, “महिन्यातून एकदा उपाशीपोटी वजन तपासणे, सर्वांत चांगले आहे; पण तुम्ही वजन तपासण्यासाठी नियमित उत्सुक असाल, तर आठवड्यातून एकदा तुम्ही वजन तपासू शकता. पण, हे लक्षात ठेवा की, आदल्या दिवशी आपण किती खाल्ले आहे, दिवसभर किती पाणी प्यायलो, नवीन औषधी किंवा दिवसभरातील शारीरिक हालचाली यांनुसार वजन कमी-जास्त दिसू शकते.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When is a right time to check weight morning noon evening or night how often should check weight weight loss news healthy lifestyle ndj

First published on: 12-09-2023 at 11:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×