लहान आतडे आणि मोठे आतडे (Gut) हे आपल्या शरीराच्या पचनसंस्थेतील महत्त्वाचे अवयव आहेत. कारण- ते पचनसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या अन्नातून निरोगी आणि पौष्टिक गोष्टींचे पचन करणे हे आतड्यांचे कार्य असते; पण शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे कामही ते करतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुदृढ राखणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल, तर आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते; पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि आरोग्याच्या समस्या स्वत:हून अंगावर ओढवून घेतो. आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आता काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेक जण सजग आहेत. या पार्श्वभूमीवर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण कसे जेवावे हे माहीत असणेही गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या आतड्यांसंबंधीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आजच्या घडीला ही वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कारण- बहुतांशी लोक घराबाहेरील अन्न अधिक प्रमाणात खाताना दिसून येतात आणि असे अन्न शरीरासाठी अत्यंत अपायकारक आणि घातकसुद्धा ठरत आहे. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य वेगाने धोक्यात येत असल्याचे दिसून येते. त्याचसोबत मद्यपान आणि धूम्रपान यांमुळेही अशाच समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे चांगला आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणते पदार्थ तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, या विषयावर नवी दिल्ली येथील पोषणतज्ज्ञ कनिका नारंग यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण ती माहिती सविस्तर जाणून घेऊ.

निरोगी आतडे योग्य पचनाशी संबंधित आहे. जेव्हा आपली आतडी निरोगी असतात तेव्हा वजन नियंत्रणात राखणे खूप चांगल्या प्रकारे शक्य होते. एकंदरीत आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या रोजच्या आहारात काही आरोग्यदायी बदल करून हे शक्य होऊ शकते.

(हे ही वाचा : पावसाळ्यात दूर राहा ‘या’ ७ पदार्थांपासून; आहारतज्ज्ञ म्हणतात, अन्यथा मिळेल अनेक आजारांना आमंत्रण!)

१. दही

दही एक प्रो-बायोटिक आहार आहे; ज्यामध्ये आतड्यांसाठी अनुकूल जीवाणू असतात. दही आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढविण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर अनारोग्यास कारणीभूत ठरणारे प्रतिकूल जीवाणू काढून टाकण्यासाठीही दही उत्तम स्रोत आहे.

२. कच्ची केळी

कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्यदायी आंत मायक्रोबायोम वाढण्यास मदत होते. ते प्रतिरोधक स्टार्चने समृद्ध असतात आणि रक्तातील साखरेचे नियमन करू शकण्यासह इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकतात.

३. अळशी

विरघळणारे फायबर आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् यांनी समृद्ध असलेली आळशी आतड्यांची जळजळ कमी करते आणि हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते. दररोज आपल्या आहारात एक-दोन चमचे अळशीचा समावेश करा.

४. अॅव्होकॅडो

विरघळणाऱ्या फायबरव्यतिरिक्त यात निरोगी चरबी असते. त्यामुळे पोषक शोषण क्षमता सुधारते आणि निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला समर्थन देते. दिवसाकाठी अर्धा अॅव्होकॅडो चांगला आहे.

५. ग्लुटेनमुक्त ओट्स

ग्लुटेनमुक्त ओट्स हा विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे आणि त्यामुळे आतड्यांच्या आरोग्यास मदत मिळते. तसेच त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होऊन, हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन लाभते. दररोज ३० ग्रॅम (एक वाटी) शिजविलेले ग्लुटेनमुक्त ओट्स सेवन करण्याचे लक्ष्य ठेवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which foods can reset your gut health know from expert pdb