Acidity Remedies: जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे. पित्ताचे एकूण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अचानक व कधी काळी उठणारे पित्त. याला Acute Urticaria असे म्हणतात. या प्रकारात पित्त एखाद्या वेळेस उठते. ते एक-दोन आठवडे राहते व जास्तीत जास्त सहा आठवड्यांच्या आत निघून जाते. तर दुसरे म्हणजे जुनाट पित्त ( Chronic Urticaria ) यात, कधी कधी तर काही महिने किंवा काही वर्षेदेखील पित्त उठतच राहते. पित्ताचे मुख्य कारण म्हणजे आहारातील अनियमितता व पदार्थ. याशिवाय धूळ, सतत बदलणारे हवामान, जंतुसंसर्ग यांसारख्या गोष्टी सुद्धा पित्ताचे कारण ठरू शकतात. काहींना त्वचेवर पित्त उमटू लागल्यावर प्रचंड वेदना होतात तर काहींना त्वचेला खाज येणे, जळजळ होणे असेही त्रास जाणवू शकतात. आज आपण या पित्तावरील काही घरगुती उपाय व वैद्यकीय सल्ला जाणून घेणार आहोत.

त्वचातज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांच्या माहितीनुसार, ज्यांना अडगळीतल्या धुळीमुळे पित्त उठण्याची शक्यता वाटते त्यांनी अडगळीत झाडलोट करताना चेहऱ्यावर मास्क लावावा व जे शक्य आहे ते ओल्या फडक्यांनी पुसावे, जेणेकरून धूळ हवेत उडणार नाही.

pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Major Itching On Skin Acid Reflux Pitta Dosha On skin Can Be Caused Due To Stress How Stress Rash Looks Remedies For Dry Skin
त्वचेला खाज सुटणे, पित्त उमटणे यामागे अस्वच्छताच नाही, ‘हे’ असतं मुख्य कारण; ताणाने येणारं पुरळ कसं दिसतं?
hives pitta skin problem
Health Special: तुम्हालाही पित्ताचा त्रास सतावतोय? कारण, लक्षणे व उपचार सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा

ज्यांचे पित्त संध्याकाळी वाढतं व मुख्यतः बाहेर जाऊन आल्यानंतर वाढतं त्यांना पराग कणांची ॲलर्जी असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी बाहेर जाताना नाकातोंडावर मास्क लावावा.

ज्यांना भौतिक कारणामुळे पित्त उठत असेल त्यांनी शक्य असल्यास ते कारण टाळावे. पोटात एच पायलोरा जिवाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी व्यक्तिगत स्वच्छता, खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन टाळणे या गोष्टी आवश्यक आहेत.

अचानक पित्त उठल्यास थंड पाण्याने अंघोळ करावी किंवा थंड पाण्याने अंग टिपून घ्यावे.

याशिवाय पित्तावर कॅलॅमाइन लोशन लावावे. तात्पुरता उपाय म्हणून मोठ्या रुग्णांनी एखादी Avil 25 mg ची गोळी घ्यावी.

हे ही वाचा<< वयानुसार गर्भधारणेची शक्यता किती असते? IVF साठी साधारण खर्च किती? वंध्यत्वविषयी प्रश्नांवर तज्ज्ञांनी दिली उत्तरे

अनेकदा पित्त अति झाल्याने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वारंवार तुम्हालाही असा त्रास होत असल्यास शरीरात द्रवपदार्थ मुबलक असतील याची खात्री करा. पाणी पिणे हा अनेक आजारांवरील उत्तम उपचार ठरू शकतो. याशिवाय जेवणाच्या वेळा नीट ठरवून घ्या.