Oil For Cooking : चांगल्या जीवनशैलीसाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. पौष्टिक जेवणासाठी आपण ते कसे बनवतो यावर अवलंबून असते. विशेषत: जेवण करताना कोणते तेल वापरावे, हा खूप मोठा प्रश्न पडतो. याविषयी आहारतज्ज्ञ लॅवलीन कौर सांगतात, “जेवणात शक्यतो कमी तेल वापरावे. पदार्थ तयार करताना तेलाऐवजी इतर पर्यायांचा वापर करावा, जसे की पोळी किंवा रोटीवर देशी तूप घ्या. पराठ्यावर तूप लावा. डाळी किंवा भाज्यांना तडका देण्याऐवजी मोहरी, तीळ किंवा शेंगदाण्याचे तेल वापरा. कॅनोला, सूर्यफूल, करडई यांसारखे रिफाईंड तेल वापरू नका.”

याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी काही तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. नारायण हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट सल्लागार डॉ. मुन्ना दास सांगतात, “सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स मोनोअनसॅच्युरेटेडऐवजी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स घेणे आपल्या हृदयासाठी चांगले आहे. जेवण तयार करण्यासाठी उष्णकटिबंधीय भाज्यांचे तेल (Non-tropical vegetableS) तुम्ही वापरू शकता. हा एक चांगला पर्याय आहे. वनस्पती किंवा खोबऱ्याच्या तेलाचा वापर करणे टाळावे, कारण यामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असतात.”

Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. दिलीप गुडे सांगतात, “सर्व प्रकारच्या तेलांमध्ये काही चांगले आणि वाईट गुणधर्म असतात. कोणतेही तेल एकमेकांपेक्षा चांगले किंवा वाईट नाही. केव्हा कोणत्या तेलाचा वापर करावा, हे समजून घेणे गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे कमी प्रमाणात तेलाचा वापर करणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे.”

डॉ. गुडे पुढे सांगतात, “करडईच्या तेलात सॅच्युरेटेड फॅट्स खूप कमी असतात आणि त्यामुळे तुम्ही स्वयंपाकासाठी हे तेल वापरू शकता, पण हे तेल योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात वापरल्यास करडईचे तेल रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि त्वचेच्या समस्या दूर करू शकतात.

“सोयाबिन तेल, कॅनोला तेल, द्राक्षाच्या बियांचे तेल, तीळ आणि कॉर्न तेल आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात. तळण्यासाठी आणि बेकिंगसाठी ॲव्होकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल चांगला पर्याय आहे. जेव्हा ऑलिव्ह ऑइल तुम्ही गरम करता, तेव्हा त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. जेव्हा तुम्ही कोणतेही तेल खूप जास्त गरम करता तेव्हा त्यात रेडिकल्स निर्माण होतात. जेव्हा तुम्ही गरम केलेले तेल पुन्हा पुन्हा वापरतात, तेव्हा तेलात ट्रान्स-फॅट्स तयार होतात, जे आरोग्यासाठी धोकादायक असतात. विशेषत: हृदयाच्या आरोग्यासाठी हे चांगले नाही”, असे डॉ. गुडे सांगतात.

हेही वाचा : गरम केलेले मध खावे की नाही? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

डॉ. गुडे सांगतात, “सूर्यफुलाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. इतर तेलांसारखे हे तेलसुद्धा जास्त प्रमाणात वापरल्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स किंवा कोलेस्ट्रॉल जमा होते, यालाच ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
डॉ. गुडे यांनी तेलांऐवजी लोणी पौष्टिक असल्याचे सांगितले आहे. लोणीमध्ये जीवनसत्त्वे अ, ई आणि क सारखी अनेक पोषक तत्त्वे असतात, पण नियंत्रित प्रमाणात याचे सेवन करावे.

डॉ. मुन्ना दास सांगतात, “कोणीही ऑलिव्ह ऑईल वापरू शकतात. हा स्वयंपाकासाठी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवातात आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. या तेलात खूप जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा मिळू शकतो. याशिवाय ॲव्होकॅडो तेलसुद्धा खूप चांगले आहे. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात, जे स्वयंपाकासाठी उत्तम आहे.

डॉ. दास पुढे सांगतात, “जेव्हा तुम्ही तेल गरम करता तेव्हा त्यातून धूर बाहेर पडू नये याची काळजी घ्यावी. कारण तेलातून धूर निघत असेल तर तेल खराब होऊ शकतो. सूर्यफूल, कॅनोला आणि इतर वनस्पती तेलांपेक्षा ऑलिव्ह ऑईल किंवा ॲव्होकॅडो तेल वापरावे. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि याचा हृदयाच्या आरोग्यावर चांगला फायदा होतो.”