Gas Prevent Tips In Marathi: थंडीच्या महिन्यांत सूप (hearty soups) आणि चवळी (ब्लॅक-आयड बीन्स) त्यांच्या अष्टपैलुत्व, आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जातात. पण,यांचे सेवन करताना एका समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे पोटफुगी. तर या संदर्भातला उपाय एक उपाय डिजिटल क्रिएटर Ivy Odom Aponte ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. डिजिटल क्रिएटरला हा हॅक तिच्या आईने सांगितला आहे. तिने सांगितले की, चवळी (ब्लॅक-आयड बीन्स) शिजवताना त्यात गाजर टाकल्यास पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध घालता येतो (Gas Prevention Tips). तर हा उपाय खरोखर काम करेल का? यात काही नुट्रीशनल विज्ञान आहे का? तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणतात की, बहुतेक शेंगांप्रमाणेच, चवळीमध्ये ऑलिगोसॅकराइड्स नावाचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात, जे पचायला जड असतात आणि आपल्या आतड्यांतील बॅक्टेरियामुळे आंबवले जातात, यामुळे गॅस तयार होतो; त्यामुळे चवळी रात्रभर भिजवून मऊ झाल्यानंतर शिजवण्याचा सल्ला दिला जातो (Gas Prevention Tips).

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
how to get rid of shoe smell instantly
तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर

क्लिनिकल आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा यांनी सुद्धा सहमती दिली की, oligosaccharides फ्लॅट्युलेंसची समस्या निर्माण करतात, कारण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे हे प्रकार आपल्या शरीरात सहज पचत नाहीत, म्हणून ते मोठ्या आतड्यात पोहचतात जेथे जीवाणू त्यांच्यावर कार्य करतात.

चवळी शिजवताना गाजर टाकल्याने गॅसपासून बचाव होऊ शकतो का? (Gas Prevention Tips)

गाजराचा गॅस कमी करण्यावर परिणाम होतो की नाही हे माहिती नसले तरीही होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणतात की, गाजरमध्ये विरघळणारे फायबर असते, त्यामुळे ते घटक शोषून घेतात, ज्यामुळे गॅस कमी होऊ शकतो (Gas Prevention Tips). विरघळणारे फायबर आपल्या आतड्यात वायू (गॅस ) निर्माण करणाऱ्या कार्बोहायड्रेट्सला अधिक प्रभावीपणे तोडण्यास मदत करून पचन प्रक्रियेत मदत करू शकतात. चवळीमध्ये असणारे अघुलनशील फायबर किंवा कॉम्प्लेक्स कर्बोदकांमुळे जीवाणूंचा संपर्क कमी होण्यास किंवा विलंब होण्यास मदत होते. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सवर लहान आतड्यात कार्य केले जाते आणि मोठ्या आतड्यात पचलेल्या कर्बोदकांमधे बॅक्टेरियाचा संपर्क कमी करण्यात मदत होते.

क्लिनिकल आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा म्हणतात की, भारतीय सामान्यत: मसाले आणि हिंगसारखे मसाले जेवणात घालतात, जे पोट फुगणे आणि गॅस किंवा फ्लॅट्युलेंसची समस्या व्यवस्थापित करण्यास मदत करतात. म्हणून चवळीमध्ये शक्यतो गाजर घालण्याची गरज नाही.

चवळी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

चवळी पौष्टिक घटकांनी युक्त असते आणि अनेक आरोग्य फायदेसुद्धा देते. चवळीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, लोह समृद्ध प्रथिनयुक्त पदार्थ आणि सॅटिएटी व्हॅल्यूदेखील असते, जे सतत भूक लागण्यापासून प्रतिबंध घालू शकतात. अर्धा कप शिजवलेले वाटाणे सुमारे ६ ते ८ ग्रॅम प्रथिने आणि ४ ते ५ ग्रॅम फायबर देतात. त्याचप्रमाणे चवळी फोलेट (व्हिटॅमिन बी ९) ने समृद्ध आहे, जो सेल डिव्हिजन, डीएनए संश्लेषणामध्ये गुंतलेला एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. चवळीमधील बी जीवनसत्त्वे उर्जा स्त्रोत म्हणून काम करतात. त्याचबरोबर चवळी पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्लायफेनॉलसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांनीदेखील समृद्ध आहे, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात (Gas Prevention Tips) ; असे होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणतात.

क्लिनिकल आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा म्हणतात की, चवळी आणि गाजर दोन्हीमध्ये फायबर असते, जे पाचन आरोग्य, वजन, हृदयाचे आरोग्य व्यवस्थापित करण्यास मदत करते आणि कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंधित करते. गाजर व्हिटॅमिन एसारखे अँटिऑक्सिडेंट प्रदान करून योगदान देऊ शकते, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहे.

होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव यांनी पोटातील गॅस कमी करण्यासाठी (Gas Prevention Tips) चवळीमध्ये जिरे आणि दालचिनीसारखे मसाले किंवा ओवा घालण्याचा सल्ला देतात. चवळी रात्रभर भिजत ठेवा आणि त्यातले पाणी टाकून द्या. पुन्हा ताज्या पाण्याने धुवा. ते मऊ होईपर्यंत उकळवा. चवळी असलेल्या जेवणात दही घाला. कोथिंबीर आणि पुदिना चटणी चवळीबरोबर खा, कारण दोन्ही औषधी वनस्पती पचनास मदत करतात, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Story img Loader