आदर्श ‘किस'(चुंबन) किती वेळेचा असावा? याबाबतची मते व्यक्तिशः वेगवेगळी असू शकतात. परंतु, एक लोकप्रिय कल्पना अशी आहे की, “तो किमान सहा सेकंदांचा असावा.” प्रसिद्ध ‘कपल एक्सपर्ट’ असलेल्या डॉ. जॉन गॉटमन यांच्या संशोधनानुसार, कारण- ‘किस’ करताना सहा सेकंदांच्या या काळात ‘ऑक्सिटोसिन’ नावाचा ‘बाँडिंग हार्मोन’ शरीरात सोडला जातो. गॉटमन सुचवतात, “मनापासून आणि दीर्घकाळाचा ‘किस’ केल्यानं जोडप्यांमध्ये अधिक जवळीक आणि विश्वास निर्माण होतो.”
याबाबतच्या पुष्टीसाठी, दी इंडियन एक्स्प्रेसने कॅडबॅम्स माईंडटॉकच्या सल्लागार मानसशास्त्रज्ञ व नातेसंबंध तज्ज्ञ डॉ. नेहा पराशर यांच्याशी संपर्क साधला.
नात अधिक दृढ करण्यासाठी किमान सहा सेकंदांचा’किस’ असायला हवा का?(Should a kiss really be a minimum of six seconds long to foster bonding?)
डॉ. पराशर यांनी पुष्टी केली, “हो, हे खरं आहे की, सहा सेकंदांचा ‘किस’ ऑक्सिटोसिन हार्मोन सोडण्यास मदत करतो.” ऑक्सिटोसिन हा एक न्यूरोकेमिकल आहे, जो नाते तयार करण्यास, विश्वास ठेवण्यास आणि जवळीक वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. “जेव्हा तुम्ही किमान सहा सेकंदांचा अर्थपूर्ण ‘किस’ करता, तेव्हा तुमच्या मेंदूला ‘फील-गुड’ रसायनांचा (आनंद निर्माण करणारे हार्मोन) एक संमिश्र मिश्रण सोडण्याचा संकेत मिळतो, ज्यात ऑक्सिटोसिनही असतो.”
डॉ. पराशर पुढे स्पष्ट करतात, “सहा सेकंदांचा ‘किस’ हा रोजच्या धावपळीतून आवर्जून घेतलेली छोटी विश्रांती आहे, ज्यामुळे जोडीदार सर्व काही विसरून पूर्णपणे एकमेकांकडे लक्ष देतात.. “घाईघाईत पटकन गालावर दिला जाणारा हलका ‘किस’ हा असा परिणाम देत नाही. कारण- तो तुमच्या मेंदूला शक्तिशाली बाँडिंग रसायनं सोडण्यास पुरेसा वेळ देत नाही.”
डॉ. पराशर यांच्या मते, ऑक्सिटोसिन मनातील सर्व भीती, शंका आणि चिंता बाजूला सारतो, ज्यामुळे तुम्ही जोडीदाराशी अधिक विश्वासू आणि जवळीक अनुभवू शकता. “हेच हार्मोन्स गळाभेट घेतल्यावर (हगिंग), आलिंगन दिल्यानंतर( कडलिंग), बाळाच्या जन्माच्या वेळी आणि स्तनपानाच्या वेळीसुद्धा मुक्त होतात, जे नात्यांचे बंध आणखी मजबूत करतात. “रोमँटिक नात्यात हे हार्मोन्स तुमच्या भावनिक संबंधांना अधिक घट्ट करतात आणि तुमचं नातं तुमच्या जोडीदाराबरोबर अधिक जुळतं आणि तुम्हाला प्रेमात असल्याची भावना जाणवते.” म्हणजेच सहा सेकंदांचा ‘किस’ फक्त शारीरिक क्रिया नाही. हा जैविक पातळीवर प्रेम, स्नेह व नात्याची बांधिलकी व्यक्त करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.
‘किस’ किती वेळासाठी केला जातो हे नात्यातील समाधान, जवळीक या घटकांवर किती परिणाम करते?(How much does kiss duration impact relationship satisfaction, bonding, and intimacy?)
‘किस’ किती वेळासाठी केला जातो हे महत्त्वाचे आहे; परंतु तो एकमेव घटक नाही. “याला तुम्ही फक्त तुमच्या नात्यातील छोटा, पण शक्तिशाली साधन समजू शकता”, असे डॉ. पराशर सांगतात.
शास्त्रानुसार, जे जोडपे जास्त वेळा ‘किस’ करतात, त्यांना अधिक आनंद आणि एकमेकांशी जोडले गेल्याची भावना जाणवते. पण, डॉ. पराशर यांचा असा इशारा आहे,”गुणवत्ताही तितकीच महत्त्वाची आहे. “सहा सेकंदांचा ‘किस’ हा खात्री करण्याचा सोपा मार्ग आहे की, तुम्ही फक्त भावनेच्या आहारी जाऊन कृती करीत नाही; तर त्यात तुमचे प्रेम आहे, जे प्रत्येक ‘किस’ला अर्थपूर्ण बनवते.
‘किस’ हा नात्याच्या आरोग्याचा ‘बॅरोमीटर’ (barometer) ठरू शकतो. ‘किस’ची वारंवारिता किंवा गुणवत्तेत घट झाली, तर तो नात्यातील अंतर किंवा भावनिक कमतरतेचा संकेत देऊ शकतो. उलट, जाणीवपूर्वक दीर्घ, आवेगपूर्ण (passionate) ‘किस’ केला गेल्यास नात्यातील जोश पुन्हा जिवंत होतो आणि त्यामुळे भावनिक, तसेच लैंगिक समाधान वाढते.
डॉ. पराशर पुढे स्पष्ट करतात, “जरी सहा सेकंदांचा ‘किस’ एक मार्गदर्शक असला तरी आदर्श कालावधी जोडप्यांसाठी वेगवेगळा असू शकतो आणि परिस्थितीनुसार तो बदलू शकतो. तुम्ही तो क्षण अनुभवण्यासाठी पूर्णपणे एकमेकांवर लक्ष देणे आणि जोडीदाराशी भावनिकरीत्या जोडलेले असणे महत्त्वाचे आहे. कधी कधी दीर्घ, सावध व हळूहळू घेतला जाणारा ‘किस’देखील तुम्हाला अगदी योग्य वाटू शकतो; तर कधी लहान, पण स्नेहपूर्ण किंवा प्रेमळ ‘किस’ अधिक योग्य ठरतो. ‘किस’मागील उद्देश आणि भावना या खऱ्या महत्त्वाच्या बाबी असतात.”
आदर्श ‘किस’ ची कालमर्यादेबाबात प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा सांस्कृतिक परंपरेनुसार बदलू शकतात का?(Can the ideal kiss duration vary by individual differences or cultural norms?)
डॉ. पराशर यांचा असा विश्वास आहे की, ‘किस’ची आदर्श कालमर्यादा प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. “लोकांच्या आरामाची पातळी वेगळी असते. काहींना दीर्घ, आवेगपूर्ण (passionate) ‘किस’ करणे आवडते; तर काही जणांना लहान, वारंवार स्नेहपूर्ण किंवा प्रेमळ ‘किस’ करणे आवडते. व्यक्तिमत्त्व, भूतकाळातील अनुभव, नात्यात प्रेम व जवळीक व्यक्त करण्याच्या शैलीवर हे सर्व महत्त्वाचे घटक अवलंबून आहेत.”
याबाबत सांस्कृतिक फरकही आहेत. अनेक पश्चिमी संस्कृतींमध्ये ओठांवरचा ‘किस’ सामान्य रोमँटिक प्रेम दर्शवतो, तर काही पूर्व आणि मध्य पूर्वीच्या संस्कृतींमध्ये सार्वजनिक ‘किस’ करणे दुर्मीळ असते किंवा ते शक्यतो टाळले जाते.
किती वेळ करावा याची वेळ ठरवणे मनावर ताण निर्माण करू शकते का?(Could turning kissing into a timed ritual cause stress?)
डॉ. पराशर इशारा देतात की, ‘किस’ किती वेळ करायचा याबाबत जास्त विचार केल्यास तो तणावदायक ठरू शकतो. “सचेतपणे (Consciously) सेकंद मोजणे तुम्हाला त्या क्षणातून बाहेर काढते आणि दबाव व चिंता निर्माण करते. ‘किस’ नैसर्गिक असावा, त्यात नाटकी प्रदर्शन नसावे. तो अचानक व स्वाभाविकपणे केला जाणे महत्त्वाचे आहे. जबरदस्तीने वेळ निश्चित करून ‘किस’ केल्यास खरी भावना कमी होऊ शकते आणि ‘किस’ करणे एक काम असल्यासारखे वाटू शकते. याबाबत जास्त विचार केल्यास दोघांमध्ये जवळीक निर्माण होत नाही.
त्या पुढे सल्ला देतात की, भावनेवर लक्ष केंद्रित करा. नैसर्गिकरीत्या ‘किस’ करा. तुम्हाला काय आवडते हे तुमच्या जोडीदाराशी शेअर करा. स्पष्ट संवाद राखणे हे समाधानी नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
